रवि प्रदोष २०२६: मनोकामना पूर्ण होतील, अनामिक भीती दूर होईल; ‘असे’ करा रवि प्रदोष व्रत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 13:16 IST2026-02-28T13:09:01+5:302026-02-28T13:16:49+5:30

Ravi Pradosh Vrat 2026: रवि प्रदोष व्रत म्हणजे काय? या व्रतात शिवपूजन कसे करावे? जाणून घ्या...

falgun ravi pradosh march 2026 know vrat puja vidhi shiv mantra and wishes will be fulfilled unknown fear removed | रवि प्रदोष २०२६: मनोकामना पूर्ण होतील, अनामिक भीती दूर होईल; ‘असे’ करा रवि प्रदोष व्रत!

रवि प्रदोष २०२६: मनोकामना पूर्ण होतील, अनामिक भीती दूर होईल; ‘असे’ करा रवि प्रदोष व्रत!

Ravi Pradosh Vrat 2026: मराठी वर्षातील शेवटचा फाल्गुन महिना सुरू आहे. फाल्गुन महिन्यात होळी हा मोठा सण साजरा केला जातो. संपूर्ण देश विविध रंगात रंगून जातो. तत्पूर्वी रवि प्रदोष व्रताचरण अवश्य करावे. प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते. प्रदोष व्रतमहादेवांना समर्पित आहे. रवि प्रदोष म्हणजे काय? हे व्रत कसे करावे? जाणून घेऊया...

प्रदोष हे शंकराला समर्पित व्रत असून, यामुळे मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात सुख, समृद्धी वृद्धी होऊ शकते. शत्रूंपासून बचाव होऊ शकतो. यासह अनेकविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. रविवारी प्रदोष तिथी आली असता, तिला रवि प्रदोष असे म्हटले जाते. यंदा, ०१ मार्च २०२६ रोजी रवि प्रदोष आहे. 

‘असे’ करा रवि प्रदोष व्रत

प्रदोष व्रत हे प्रदोष काळी म्हणजेच सायंकाळी दिवेलागणीला केले जाते. प्रदोष तिथीला शंकराचे पूजन केले जाते. काही पौराणिक उल्लेखानुसार, प्रदोष काळात शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटे दूर होऊ शकतात. भोलेनाथ हे महादेव, महाकाल, त्रिकालदर्शी आहेत. शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. सुख, ऐश्वर्य, वैभव, सौभाग्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

रवि प्रदोष व्रत शिवपूजन विधी

प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला, दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक जण या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. 

रवि ग्रहाशी संबंधित उपाय अवश्य करा

रवि प्रदोष व्रत करताना कुंडलीतील रवि म्हणजेच सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी काही उपाय अवश्य करावेत, असे सांगितले जाते.  रवि म्हणजेच सूर्य, आदित्य. जिथे, जिथे नेतृत्व आहे, तिथे तिथे रविचा काही ना काही संबंध असतो, असे मानले जाते. कारण रवि हा नेतृत्व, पुढारीपणा यांचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रात रविला पित्याचा दर्जा आहे. प्राचीन काळापासून रविपूजन केले जात आहे. रामायणात प्रभू श्रीरामांनीही सूर्योपासना केल्याचे सांगितले जाते. जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम । तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम ।। हा नवग्रह स्तोत्रातील रविचा मंत्र आहे. या मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते. ॐ आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयत।।, हा रविचा गायत्री मंत्र आहे. याचा जप किंवा नामस्मरण करणे उपयुक्त मानले जाते. अर्घ्य अर्पण करण्यासह आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. पठण करणे शक्य नसेल, तर या स्तोत्राचे श्रवण करावे, असे सांगितले जाते. 

- मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा किंवा पूजेच्या वेळी  भोलेनाथांना ॐ नमः शिवाय म्हणत बिल्वपत्र अर्पण करा. या उपायाने तुमची जी काही इच्छा असेल ती शिवाच्या कृपेने पूर्ण होईल.

- जर तुम्हाला अज्ञात भीती वाटत असेल, शरीर शक्तीहीन वाटत असेल, आत्मविश्वासाची कमतरता असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिव पंचाक्षरी मंत्र ॐ नमः शिवाय १०८ वेळा जप करावा. मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष किंवा चंदनाच्या माळा वापरा. तुम्हाला लाभ होईल.

- जर तुमच्या कुटुंबात कलह असेल किंवा सुख-समृद्धी नसेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेच्या वेळी भगवान शंकराला ज्वारीचे पीठ अर्पण करा. नंतर त्यापासून भाकरी बनवून बैल किंवा गाय वासराला खाऊ घाला. तुमची इच्छा पूर्ण होईल, असे मानले जाते.

॥ ॐ नमः शिवाय ॥

॥ हर हर महादेव ॥

 

Web Title : रवि प्रदोष 2026: मनोकामना पूर्ति और भय निवारण के लिए व्रत।

Web Summary : 1 मार्च, 2026 को रवि प्रदोष व्रत करें, जो भगवान शिव को समर्पित है, मनोकामना पूर्ति, समृद्धि और शत्रुओं से सुरक्षा के लिए। उपवास रखें, प्रदोष काल में शिव की पूजा करें, मंत्रों का जाप करें और प्रार्थना करें। कुंडली में सूर्य की स्थिति को मजबूत करें और भय दूर करें।

Web Title : Ravi Pradosh 2026: Fulfill desires, dispel fear with this Vrat.

Web Summary : Perform Ravi Pradosh Vrat on March 1, 2026, dedicated to Lord Shiva, for wish fulfillment, prosperity, and protection from enemies. Observe the fast, worship Shiva during Pradosh Kaal, chant mantras, and offer prayers. Strengthen Sun's position in your horoscope and overcome fear.