Falgun Purnima 2024: फाल्गुन पौर्णिमेला उघडणार 'या' ३ राशींचे भाग्य; आर्थिक स्थितीत होणार लक्षणीय बदल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 15:56 IST2024-03-23T15:56:03+5:302024-03-23T15:56:33+5:30
Falgun Purnima 2024: ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला अतिशय शुभ योग तयार होत आहे. अशा स्थितीत तीन राशीच्या लोकांना मिळणार आहे विशेष लाभ!

Falgun Purnima 2024: फाल्गुन पौर्णिमेला उघडणार 'या' ३ राशींचे भाग्य; आर्थिक स्थितीत होणार लक्षणीय बदल!
हिंदू धर्मात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. होलिका दहन देखील फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होते. हिंदू पंचांगानुसार २४ मार्च रोजी फाल्गुनी पौर्णिमा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमेला अतिशय शुभ योग तयार होत आहेत. जो आर्थिक स्थिती आणि करिअरमधील प्रगतीसाठी पूरक आहे. ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर केतू आणि चंद्र मीन राशीत असतील. यासोबत राहू, बुध आणि सूर्य मीन राशीत आणि गुरू मेष राशीत असेल. यासोबतच मंगळ, शुक्र आणि शनि कुंभ राशीत राहतील. ग्रहांच्या अशा स्थितीनुसार फाल्गुन पौर्णिमेचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खूप खास असू शकतो. जाणून घ्या या राशींबद्दल...
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी फाल्गुन पौर्णिमा शुभ ठरू शकते. या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा होईल, ज्यामुळे त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नशिबाने साथ दिल्यानेत्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्याबरोबरच संपत्तीतही वाढ होईल. व्यवसायात भरघोस यशासोबतच भरपूर नफाही मिळेल. जर तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ लाभदायी ठरेल. कुटुंबाशी चांगले संबंध प्रस्थापित होतील आणि सर्व प्रकारच्या भांडणांपासून मुक्तता मिळेल. पैशाशी संबंधित समस्याही संपुष्टात येतील. आपण बचत करण्यात यशस्वी व्हाल.
कन्या : कन्या राशीच्या लोकांसाठीही फाल्गुन पौर्णिमेचा दिवस चांगला आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र या राशीत असेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद वार्ता येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकेल. जुने मित्र भेटू शकतात. यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
धनु : धनु राशीच्या लोकांसाठीही फाल्गुन पौर्णिमेचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला आता मिळू शकेल. यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसायात प्रचंड यश मिळून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कर्जातून मुक्ती मिळू शकते. त्यामुळे जीवन आनंददायी होईल. आर्थिक स्थिती भक्कम होईल. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तसे करणे फायदेशीर ठरू शकते.