Falgun Masik Shivratri Vrat March 2026: मराठी वर्षातील शेवटचा फाल्गुन मास सुरू असून, अवघ्या तासांनी या महिन्याची सांगता होणार आहे. १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा आहे. या दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे. तत्पूर्वी, फाल्गुन महिन्यातील मासिक शिवरात्रि व्रत आहे. सोम प्रदोष आणि मासिक शिवरात्रि व्रत सलग आल्यामुळे वर्षाची सांगता शिव उपासनेने करण्याची सर्वोत्तम संधी प्राप्त झालेली आहे. जाणून घेऊया...
मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी फाल्गुन शिवरात्रि आहे. संपूर्ण वर्षात झालेली शिवकृपा, महादेवांचे लाभलेले शुभाशिर्वाद यासाठी अवश्य कृतज्ञता व्यक्त करावी. यानंतर लगेचच नववर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्ष अधिक चांगले, सुखाचे, समृद्धीचे, भरभराटाचे जावे, अशी विनंती शिवाचरणी करावी, असे म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात शिवरात्रीचे व्रत असते. शिवरात्रीला महादेव शिवशंकराचे विशेष पूजन केले जाते. शिवरात्रि ही महादेवांना समर्पित असलेले व्रत आहे. फाल्गुन महिन्यातील मासिक शिवरात्रि व्रत या मराठी वर्षातील शेवटचे शिवरात्रि व्रत आहे. यानंतर काही तासांत मराठी नववर्ष सुरू होणार आहे.
प्रत्येक मराठी महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्रि
प्रत्येक मराठी महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्रि असते. अनेकांचे आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन, उपासना केली जाते. शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष अशी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते.
मासिक शिवरात्रि व्रत पूजन विधी
शिवरात्रिच्या दिवशी सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. या दिवशी मनोभावे शिवपूजन करावे. पंचोपचाराने महादेवांचे पूजन झाल्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. त्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. या दिवशी रुद्राभिषेक, जलाभिषेक, दुग्धाभिषेक करणे पुण्य फलदायी मानले गेले आहे. शक्य असल्यास १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत.
शिव मंत्रांचा यथाशक्ती जप करावा
मासिक शिवरात्रिला महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते. 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥
Web Summary : Observe Falgun Shivratri on March 17, 2026, to express gratitude and seek blessings for a prosperous new year. Worship Lord Shiva with devotion, chant mantras, and perform rituals for divine grace and fulfillment of wishes. It marks the year's final Shivratri.
Web Summary : 17 मार्च, 2026 को फाल्गुन शिवरात्रि मनाएं, कृतज्ञता व्यक्त करें और समृद्ध नए साल के लिए आशीर्वाद लें। भक्ति के साथ भगवान शिव की पूजा करें, मंत्रों का जाप करें और दिव्य कृपा और इच्छाओं की पूर्ति के लिए अनुष्ठान करें। यह वर्ष की अंतिम शिवरात्रि है।