गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:11 IST2025-10-01T15:01:34+5:302025-10-01T15:11:30+5:30

Dasara 2025 Vijay Shubh Muhurat: दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. रामायण, महाभारतासह अनेक विजयादशमी कथा पुराणात आढळून येतात, असे सांगितले जाते.

dussehra 2025 date rahu kaal know about auspicious vijayadashami 2025 vijay muhurat and greatness of dasara 2025 in marathi | गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

Dasara 2025 Vijay Shubh Muhurat: नवरात्रोत्सवाची सांगता विजयादशमी म्हणजेच दसऱ्याला केली जाते. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचे नवरात्र  असते. याची समाप्ती या दिवशी होते. शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला व नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले. दशमीला महिषासुराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला, म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करतात. यंदा दसऱ्याला जुळून येणारे अद्भूत योग, दसऱ्याचा विजय मुहूर्त, महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया...

३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!

गुरुवार, ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन शुद्ध विजयादशमी दसरा आहे. अश्विन शुद्ध दशमी श्रवण नक्षत्राच्या योगावर ‘विजयादशमी’ होते. ही विजयादशमी श्रवण नक्षत्रयुक्त आणि सूर्योद्यव्यापिनी असल्यास सर्वोत्तम मानली जाते. या दशमीलाच आपण ‘दसरा’ म्हणतो. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ह्या दिवशी कुठल्याही कार्यासाठी वेगळा मुहूर्त बघावा लागत नाही. अपराण्हकाळी म्हणजे दुपारी एक ‘विजयमुहूर्त’ असतो. 

दसऱ्याला ४ विधींचे अत्याधिक महत्त्व । Dussehra 2025 Significance

दसऱ्याला शेतीतील पहिले पीक वाजतगाजत घरी आणून आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आजही गावोगावी पाळली जाते. ह्या नव्या धान्याच्या काही लोंब्या, झेंडूची फुले आणि आंब्याची पाने ह्यांनी बनविलेल्या तोरणात बांधतात. हे सुखसमृद्धीचे प्रतीक आहे. ह्या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितादेवीची पूजा आणि शस्त्रपूजा हे चार विधी पूर्वी राजेरजवाडे, सरदारदरकदार करीत असत.

Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Facebook, Insta, WhatsAp

विजयादशमी दसरा कथा । Dasara 2025 Katha

अज्ञातवासात असताना पांडवांनी आपली शस्त्रे शमी वृक्षावर लपवून ठेवली होती, अशी कथा महाभारतात आहे. त्यामधून दसऱ्याला शमी वृक्षाखाली शस्त्रपूजा करण्याची प्रथा सुरू झाली, असे म्हटले जाते. तर रामाने रावणाशी युद्ध करण्यासाठी विजयादशमीला प्रस्थान ठेवले होते, हे कारणही सीमोल्लंघनासाठी महत्त्वपूर्ण ठरले, असे सांगितले जाते. तसेच कौत्साने दक्षिणा म्हणून कुबेराकडून सुवर्णमुद्रा मिळविल्या. त्यापैकी गुरुदक्षिणा देऊन उरलेल्या सुवर्णमुद्रा कौत्साने शमीच्या वृक्षाखाली आणून ठेवल्या, तो दिवसही विजयादशमीचाच होता, अशी कथा आढळून येते. त्याची आठवण म्हणून आजही आपण दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून देतो. ह्या दिवशी अधिककरुन राजेरजवाडे, पराक्रमासाठी निघालेल्या मंडळींसाठी व्रतविधी सांगितलेले आहेत. आपण तो ‘सण’ म्हणून साजरा करतो.

विजयादशमी दसरा शमीची किंवा आपट्याच्या झाडाची पूजा । Dasara 2025 Puja Vidhi

या दिवशी शमीची किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करतात. शमी वृक्षाजवळच भूमीवर अपराजिता देवीची मूर्ती रेखाटून तिचीही पूजा करतात. रावणाचा वध करण्यासाठी रामाने याच दिवशी शमीचे पूजन करून प्रस्थान ठेवले. अर्जुनाने अज्ञातवास संपवून याच दिवशी शमीचे पूजन केले व आपली शस्त्रे पुन्हा हातात घेतली. कौत्सास चौदा कोटी सुवर्णमुद्रा देण्यासाठी रघुराजाने कुबेरावर स्वारी केली. त्यामुळे भयग्रस्त होऊन कुबेराने याच दिवशी शमीच्या झाडावर सुवर्णवृष्टी केली. आवश्यक तेवढे सोने रघुराजाने कौत्सास देऊन बाकीचे त्याने नागरिकांना वाटले अशी कथा स्कंदपुराणात आहे. या दिवशी सोने लुटण्याच्या प्रथेचा संबंध या कथेशी दिसतो. 

१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!

- पूर्वी मंडळी आवर्जून एकमेकांच्या घरी जाऊन आपट्याचे सोने देत-घेत असत. शमी वृक्ष हा सर्वत्र उपलब्ध होऊ शकत नाही ह्याची कल्पना असल्यामुळे शमी वृक्ष नसल्यास आपटयाच्या वृक्षाची पूजा करावी, असा धर्मशास्त्रीय संकेत आहे. परिणामी आपट्याच्या पानांचे ‘सोने’ एकमेकांना देण्याची गोड प्रथा सुरु झाली. मुळात शमी वृक्षाच्या समिधा यज्ञकर्मात अग्नी प्रदीप्त करण्यासाठी होत असल्याने त्याच्या संवर्धनाची गरज लक्षात येऊन आपल्या पूर्वजांनी धर्मकार्याला त्याची सांगड घालून हे वृक्ष वाचविण्याचे फार मोठे कार्य केले. त्या कार्याचे आपण हे ‘सोने’ दसऱ्याला एकमेकांना देऊन ‘सोने’ करणे गरजेचे आहे, असे सांगितले जाते. 

संपूर्ण भारतात दसरा विजयादशमीचे वैविध्य । Dussehra 2025 India Celebration

भारतात सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. उत्तर भारतात या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात. कुलू खोऱ्यातील लोक आपल्या रघुनाथ या देवतेचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी साजरा करतात. रघुनाथाची रथयात्रा, नृत्य, बलिदान इ. विधी करतात. महाराष्ट्रात या दिवशी सीमोल्लंघन करून आपट्याची पूजा करतात व त्याची पाने सोने म्हणून परस्परांना देतात. ऐतिहासिक काळात या दिवशी सीमोल्लंघन करून मराठा सरदार नव्या मोहिमेवर निघत. म्हैसूर संस्थानाचा दसऱ्याचा उत्सव भारतात प्रसिद्ध आहे. चंडीने किंवा चामुंडेने महिषासुराचा वध म्हैसूरजवळ केला, असे मानले जाते. राजस्थानातही या दिवशी राजपूत राजे आपल्या गुरूच्या दर्शनास जात आणि तेथे शमीचे पूजन करीत. ठाकूर स्त्रिया या दिवशी दसरानृत्य करतात.

विजयादशमी दसरा शुभ विजय मुहूर्त । Vijayadashami 2025 Shubh Dasara 2025 Vijay Muhurta 

यंदा विजयादशमी दसरा विजय मुहूर्त ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ०२ वाजून २७ मिनिटांपासून ते ०३ वाजून १४ मिनिटांपर्यंत आहे. तर राहु काळ याच कालावधीत दुपारी दीड ते तीन दरम्यान आहे. यंदा अत्यंत शुभ योगात श्रवण नक्षत्रावर विजयादशमी आली आहे. या दिवशी बुधादित्य राजयोग, भद्र महापुरुष राजयोग, सूर्य-यम नवपंचम योग, गुरू-शुक्र अर्धकेंद्र योग, शनिचा केंद्र त्रिकोण राजयोग, राहु-केतु शुक्र समसप्तक योग, शनि-रवि बुध समसप्तक योग जुळून आले आहेत. 

 

Web Title : दशहरा 2025: शुभ मुहूर्त, महत्व और अनुष्ठान

Web Summary : दशहरा 2025 2 अक्टूबर को है। यह दिन बुराई पर दुर्गा की विजय का प्रतीक है। अनुष्ठानों में शमी के पेड़ों की पूजा और सोने का प्रतीक आपटा के पत्तों का आदान-प्रदान शामिल है। शुभ समय और त्योहार का महत्व बताया गया है।

Web Title : Dussehra 2025: Auspicious Time, Significance, and Rituals Explained

Web Summary : Dussehra 2025 falls on October 2nd. The day celebrates Durga's victory over evil. Rituals include worshipping शमी trees and exchanging आपटा leaves symbolizing gold. Auspicious timings and the significance of the festival are highlighted.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.