Dussehra 2021 : वास्तुदोष जाऊन लक्ष्मी दीर्घकाळ आपल्या घरात नांदावी असे वाटत असेल तर चाणक्यनीती वापरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 05:01 PM2021-10-14T17:01:02+5:302021-10-14T17:01:44+5:30

Vijayadashami 2021: आपणही श्री लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपली वास्तू सज्ज करूया, वास्तूदोष घालवूया.

Dussehra 2021: If you want to remove vastudosha from home and wanted mata laxmi to stay home them use chanakyaniti | Dussehra 2021 : वास्तुदोष जाऊन लक्ष्मी दीर्घकाळ आपल्या घरात नांदावी असे वाटत असेल तर चाणक्यनीती वापरा!

Dussehra 2021 : वास्तुदोष जाऊन लक्ष्मी दीर्घकाळ आपल्या घरात नांदावी असे वाटत असेल तर चाणक्यनीती वापरा!

googlenewsNext

आपले संपूर्ण आयुष्य पैसा जोडण्यात आणि संग्रही करण्यात खर्च होते. तरी वेळ प्रसंगी कधी पैसे कमी पडतात, तर कधी उसने घ्यावे लागतात. अशा वेळी वाटते, की लक्ष्मीची कृपा आपल्यावर असेल, तर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सहज तोंड देता येईल. परंतु लक्ष्मी चंचल असते. ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही असे म्हणतात. मात्र, धनाढयांकडे पाहिले असता, प्रश्न पडतो, हे वैभव आपल्या वाट्याला कधी आणि कसे येईल? यावर आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती मध्ये म्हटले आहे, 

मूर्खा यत्र न पूज्यते धान्यं यत्र सुसंचितम्। 
दंपत्यो कलहं नास्ति तत्र श्री: स्वयमागत:॥

Dussehra 2021 : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जुळून येत आहेत आणखी तीन शुभ मुहूर्त, जाणून घ्या त्यांचे महत्त्व!

ज्या घरात मूर्ख माणसांना जागा नसते, ज्या घरात अन्न धान्याची नासाडी होत नाही, ज्या घरात भांडणं होत नाहीत, अशा घरात लक्ष्मी दीर्घकाळ वास्तव्य करते. म्हणजेच, आपले घर लक्ष्मीच्या वास्तव्यासाठी अनुकूल बनवायचे असेल तर आपण गुणी माणसांचे आदरातिथ्य केले पाहिजे. घरात केवळ धन धान्याची साठवण न करता, वेळप्रसंगी दानधर्म केला पाहिजे आणि अन्न वाया जाऊ देता कामा नये. नवरा बायकोत कलह होत असेल, तर त्या घरात शांतता कधीच नांदत नाही. यासाठी दोघांमध्ये सुसंवाद असला पाहिजे आणि दोघांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. तरच लक्ष्मी प्रसन्न मनाने गृहप्रवेश करते. 

Dussehra 2021 :दसऱ्याला तुळशीच्या किंवा बेलाच्या पानांऐवजी आपट्याचीच पाने का देतात? जाणून घ्या कारण... 

चला तर मग, आपणही श्री लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपली वास्तू सज्ज करूया, वास्तूदोष घालवूया. म्हणजे लक्ष्मी तर येईलच, पाठोपाठ लक्ष्मीपती अर्थात नारायण भगवान देखील येतील. 

Web Title: Dussehra 2021: If you want to remove vastudosha from home and wanted mata laxmi to stay home them use chanakyaniti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.