स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:35 IST2025-10-10T16:26:15+5:302025-10-10T16:35:49+5:30
Swapna Shastra: स्वप्न ठरवून पाहता येत नाहीत, पण ती पडतात आणि त्याबरोबर शुभ अशुभ संकेतही दर्शवतात, स्वप्नशास्त्रात दिलेला या विषयाचा अर्थ जाणून घेऊ.

स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
'मनी वसे ते स्वप्नी दिसे' असे म्हणतात. याचा अर्थ ज्याचे तुम्ही चिंतन करता, ज्या गोष्टींचा ध्यास घेता, ज्यांच्या सहवासात तुम्ही असता, त्या व्यक्ति, ते विषय तुम्हाला स्वप्नात दिसू शकतात. अशाच एका विषयाबाबत या लेखात जाणून घेऊ.
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
रात्री शांत झोपेत असताना अनेक लोकांना विविध प्रकारची स्वप्ने पडतात. सकाळी उठल्यावर काही स्वप्ने आठवतात, तर काही विसरली जातात. स्वप्न शास्त्रानुसार (Swapna Shastra) झोपेत पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी गहन अर्थ असतो आणि ही स्वप्ने आपल्या भविष्याचे संकेत (Future Signs) देत असतात. काही स्वप्ने शुभ फळ देतात, तर काही मोठ्या अडचणी येण्याचा इशारा देतात.
स्वप्नात दिसणारी व्यक्ती आणि घटना आपल्या वर्तमान आणि भविष्याशी जोडलेल्या असतात. स्वप्नात सुंदर स्त्री दिसणे हे शुभ असते की अशुभ, हे स्वप्न शास्त्र नेमके काय सांगते, हे पाहूया.
स्वप्नात सुंदर स्त्री दिसणे (Seeing Beautiful Woman in Dream):
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नामध्ये सुंदर आणि नटलेली स्त्री दिसणे हे शुभता आणि समृद्धीचे (Auspiciousness and Prosperity) प्रतीक मानले जाते. हे स्वप्न सूचित करते की, तुमच्या आयुष्यात लवकरच धन, सुख आणि समृद्धी येणार आहे. असे मानले जाते की, लवकरच तुमच्या घरी माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे. यामुळे तुमचे नशीब पालटण्याची शक्यता असते.
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
विविध प्रकारची स्वप्नं आणि त्यांचे अर्थ : सुंदर स्त्री कशा स्थितीत दिसली, यावरही स्वप्नाचा अर्थ अवलंबून असतो!
१. स्वप्नात दागिने घातलेली महिला दिसणे :
जर तुम्हाला स्वप्नात अलंकार (दागिने) धारण केलेली स्त्री दिसली, तर याचा अर्थ आहे की, तुमची अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत. हे स्वप्न सूचित करते की, तुम्हाला लवकरच सफलता मिळणार आहे. जर हे स्वप्न तुम्हाला दिवाळीच्या आसपास पडले, तर ते तुमच्यासाठी सोने पे सुहागा ठरू शकते.
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
२. स्वप्नात महिलेसोबत बोलणे :
जर तुम्हाला स्वप्नात एका सुंदर महिलेसोबत गप्पा मारताना (संभाषण करताना) दिसले, तर हे देखील खूप शुभ मानले जाते. हे स्वप्न सूचित करते की, समाजात तुमचे मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठा वाढणार आहे. तसेच, तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत, याचाही हा संकेत आहे.
३. सकाळच्या स्वप्नांचे महत्त्व :
स्वप्नांच्या संकेतांना वेळेनुसार अधिक महत्त्व असते. स्वप्न शास्त्रानुसार, पहाटे ४ ते ६ च्या दरम्यान पडलेली स्वप्न अनेकदा खरी होतात आणि त्यांचा तुमच्या जीवनावर चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो.
जर तुम्हाला स्वप्नात सुंदर स्त्री दिसली असेल आणि ते स्वप्न सकाळी पडले असेल, तर येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात निश्चितच मोठे आणि सकारात्मक बदल होण्याची शक्यता असते.