ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:32 IST2025-09-12T13:31:45+5:302025-09-12T13:32:23+5:30

Dnyaneshwari Jayanti 2025: शनिवार १३ सप्टेंबर रोजी ज्ञानेश्वरी जयंती आहे, त्यानिमित्त या ग्रंथांशी संबंधित ही महत्त्वपूर्ण गोष्ट जाणून घेऊया. 

Dnyaneshwari Jayanti 2025: Do you know the original name of Dnyaneshwari? It was given by female saints! | ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

प.पु. स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी अलीकडेच एका कार्यक्रमात ज्ञानेश्वरी बाबत खुलासा केला आहे, जो भागवत धर्मातील अनेक भाविकांना परिचायाचा असेलही! मात्र सर्वसामान्य लोकांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून १३ सप्टेंबर, ज्ञानेश्वर जयंतीचे औचित्य साधून 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथांच्या मूळ नावाबद्दल जाणून घेऊ. 

संत ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून ती ज्ञानेश्वरी, असा जर तुमचा आजवरचा समज असेल तर तुम्ही चुकताय! कारण, ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाला कधीही ज्ञानेश्वरी म्हटले नाही की ज्ञानदेवी म्हटले नाही, तर त्यांनी आपल्या ग्रंथाला नाव दिले होते - भावार्थदीपिका! श्रीकृष्णाने भगवद्गीतेत जसे सांगितले, तसे अनुवादन ज्ञानेश्वरांनी या ग्रंथात केले आहे. हा भावार्थ दीपाप्रमाणे आपले आयुष्य उजळून टाकणारा आहे. 

Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

१३ सप्टेंबर रोजी भाद्रपद कृष्ण षष्ठी आहे, ही तिथी श्री ज्ञानेश्वरी जयंती(Dnyaneshwari Jayanti 2025) म्हणून ओळखली जाते. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी शके १२१२ अर्थात् इ. स.१२९०-९१ मध्ये श्रीक्षेत्र नेवासे येथील श्रीमोहिनीराजाच्या मंदिरात श्री ज्ञानेश्वरी प्रथम सांगितली. पण ती कोणत्या तिथीला लिहायला सुरवात केली व कोणत्या तिथीला पूर्ण केली हे इतिहासाला ज्ञात नाही.

ज्ञानेश्वरीमध्ये भाग्वद्गितेचे सार सोप्या शब्दात आणि उदाहरणांसह विस्तृत करून संगितले आहे. म्हणून संत नामदेव म्हणतात, 'एक तरी ओवी अनुभवावी!' म्हणजेच, केवळ वाचून विसरून जाऊ नका तर त्याचं चिंतन करा, अनुभूति घ्या अस ते सांगताहेत. नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी केला आहे, मग ज्ञानेश्वरी हा शब्द आला कुठून? तर....

पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

 महिला संत आणि नामदेवांची शिष्या जनाबाई यांनी भावार्थदीपिकेला 'ज्ञानेश्वरी' संबोधून या ग्रंथाचा गौरव केला. हा शब्द एवढा रूढ झाला की आता कोणीही भाविक भावार्थदीपिका असे न संबोधता ज्ञानेश्वरी असेच म्हणतात आणि भाद्रपद कृष्ण षष्ठीचा दिवस भावार्थदीपिका जयंती म्हणून साजरा न करता 'ज्ञानेश्वरी जयंती' म्हणून साजरा करतात. 

ग्रंथांचीही जयंती साजरी करणारी आपली दिव्य संस्कृती खरोखरीच महान म्हटली पाहिजे, बरोबर ना?

Web Title: Dnyaneshwari Jayanti 2025: Do you know the original name of Dnyaneshwari? It was given by female saints!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.