Diwali 2025: वसुबारसेला कामधेनुची मूर्ती घराच्या 'या' दिशेला ठेवल्याने होणारे फायदे वाचून अवाक व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:58 IST2025-10-15T12:56:04+5:302025-10-15T12:58:42+5:30

Diwali 2025 Vasubaras: दिवाळीची सुरुवात १७ ऑक्टोबर रोजी वसुबारसेने होणार आहे, त्यादिवशी कामधेनुची मूर्ती घरी आणल्याने होणारे लाभ वाचा आणि आजच खरेदी करा.

Diwali 2025: You will be speechless after reading the benefits of keeping the idol of Vasubarsela Kamdhenu in 'this' direction of the house! | Diwali 2025: वसुबारसेला कामधेनुची मूर्ती घराच्या 'या' दिशेला ठेवल्याने होणारे फायदे वाचून अवाक व्हाल!

Diwali 2025: वसुबारसेला कामधेनुची मूर्ती घराच्या 'या' दिशेला ठेवल्याने होणारे फायदे वाचून अवाक व्हाल!

पौराणिक मान्यतेनुसार कामधेनूची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली. कामधेनू गायीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. तिची छबी किंवा मूर्ती घरात ठेवल्याने सुख, समृद्धी आणि संततीचा लाभ होतो. तसेच घरात सकारात्मकता राहते. म्हणून वास्तुशास्त्राने घरात गायीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी असा आग्रह धरला आहे. १७ ऑक्टोबर रोजी दिवाळीची(Diwali 2025) सुरुवात वसुबारसेने(Vasu baras 2025) होणार आहे. त्या मुहूर्तावर कामधेनु ठेवण्याची योग्य दिशा कोणती ते जाणून घेऊ. 

Guru Gochar 2025: १८ ऑक्टोबरपासून गुरूचे अतिचारी भ्रमण; स्वामीकृपेने डिसेंबरपर्यंत शुभ काळ!

गावाकडे ज्या घराच्या बाहेर गोठा असतो अशा घरात सुबत्ता नांदत असते. शहरात तसे करणे शक्य नाही. त्यावर उपाय आहे मूर्ती किंवा प्रतिमेचा! वास्तु तज्ज्ञांच्या मते, कामधेनू योग्य दिशेने ठेवल्यास अनेक फायदे होतात. असे मानले जाते की ज्या घरात कामधेनू गाईचे वासराचे छायाचित्र लावले जाते ते घर सुखाने भरलेले राहते. वासरासह कामधेनू गाईचा फोटो कोणत्या दिशेला लावावा आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.

असे मानले जाते की घरामध्ये कुठेही वास्तुदोष असल्यास त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी वासरासह कामधेनू गायीचा फोटो लावल्यास फायदा होतो.

- घरातील कामात स्थिरता राखण्यासाठी कामधेनूचा वासरासह फोटो दक्षिण पश्चिम (नैऋत्य) दिशेला लावा. लवकरच फायदा होईल.

- घराच्या आग्नेय दिशेला कामधेनूची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवल्याने घरातील स्त्रिया आनंदी राहतात. स्त्री आनंदित असेल तर कुटुंबही आनंदी राहते. 

- वास्तु तज्ज्ञांच्या मते, घराच्या पूर्व दिशेला गाईचा फोटो लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते. घरात लक्ष्मी वास करू लागते. 

- उत्तर-पूर्व दिशेला गायीची वासरासह असलेली प्रतिमा लावल्याने संतती प्राप्त होते. 

Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!

- घराच्या उत्तर दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने कुबेराची कृपा प्राप्त होते आणि घरात समृद्धी वाढू लागते.

- पश्चिम कोनात गायीचा फोटो ठेवल्यामुळे घरातील वातावरण अनुकूल राहते. व्यक्तीचे उत्पन्न वाढते. आध्यात्मिक वातावरण तयार होते. 

- घरात मुले नसतील किंवा मुले मान देत नसतील तर कामधेनू गाईचे चित्र ईशान्य कोपर्‍यात लावावे आणि नंतर नियमित प्रार्थना करावी.

- घरातील धन आणि अन्नाची कमतरता दूर करण्यासाठी आणि सुबत्ता कायम ठेवण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला कामधेनूचे चित्र लावावे.

- त्याचबरोबर प्रकृती ठीक नसेल तर गोमातेचा फोटो दक्षिण दिशेला लावावा. लवकरच फायदा होईल.

Web Title : Diwali 2025: कामधेनु को घर में रखने के फायदे जानकर चौंक जाएंगे!

Web Summary : घर में कामधेनु की मूर्ति रखने से सुख, समृद्धि और सकारात्मक ऊर्जा आती है। पूर्व में रखने से आर्थिक सुधार, दक्षिण-पूर्व में महिलाओं की खुशी और उत्तर-पूर्व में संतान प्राप्ति होती है।

Web Title : Diwali 2025: Kamdhenu placement benefits for home prosperity revealed!

Web Summary : Placing Kamdhenu idol at home brings prosperity, happiness, and positive energy. Different directions offer specific benefits like financial improvement in the east, happy women in the southeast, and progeny in the northeast.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.