Diwali 2025: घराच्या मुख्य प्रवेश द्वाराला उंबरठा का हवा? लक्ष्मी पूजेआधी करा 'हे' बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 15:17 IST2025-10-15T15:06:30+5:302025-10-15T15:17:51+5:30

Diwali 2025 Laxmi Puja: यंदा १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे आणि २१ ऑक्टोबरला लक्ष्मी पूजन; लक्ष्मी कृपेसाठी वास्तु नुसार घराच्या उंबरठ्याबाबत दिलेले बदल करून घ्या.

Diwali 2025: Why is there a threshold at the main entrance of the house? Make 'this' change before Lakshmi Puja! | Diwali 2025: घराच्या मुख्य प्रवेश द्वाराला उंबरठा का हवा? लक्ष्मी पूजेआधी करा 'हे' बदल!

Diwali 2025: घराच्या मुख्य प्रवेश द्वाराला उंबरठा का हवा? लक्ष्मी पूजेआधी करा 'हे' बदल!

Diwali 2025 Laxmi Puja: धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजन हे आर्थिक वृद्धीसाठी दोन महत्त्वाचे दिवस. या दिवशी देवी लक्ष्मीला आपण आपल्या घरी आवाहन करतो पण ती आल्या पावली निघून जाऊ नये यासाठी काही वास्तु टिप्स महत्त्वाच्या ठरतील. यंदा  १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी (Dhanteras 2025) आहे आणि २१ ऑक्टोबरला लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan 2025) आहे, त्यादृष्टीने दिलेली माहिती वाचून आवश्यक पूर्व तयारी करा. 

Diwali 2025: वसुबारसेला कामधेनुची मूर्ती घराच्या 'या' दिशेला ठेवल्याने होणारे फायदे वाचून अवाक व्हाल!

अलीकडच्या काळात आपण पाहिले असेल, की आधुनिक घरांना उंबरठा नसतो. परंतु, उंबरठा ही केवळ एक सीमारेषा नाही, तर दाराची चौकट पूर्ण करणारी बाब आहे. म्हणून पूर्वापार हिंदू संस्कृतीनुसार घरांना उंबरठा असे. वास्तुशास्त्रात त्याला अतिशय महत्त्व आहे. 

>> घरात श्रीलक्ष्मी नांदावी, ती बाहेर जाऊन नये, तिला घरात थांबवून ठेवता यावे, म्हणून उंबरठा बांधला जातो. तिन्ही सांजेला लक्ष्मी घरी येते. तिचे उंबरठ्यावर स्वागत करून तिला घरात ये म्हणून प्रार्थना केली जाते. 

>> उंबरठ्याला महत्त्व एवढे, की पूर्वी घराघरातून रोज सकाळी त्याची पूजा होत असे. अंगणाबरोबर उंबरठ्याशी रांगोळीची दोन बोटं काढली जात असे. तिन्ही सांजेला उंबरठ्यापाशी दिवा लावला जात असे. 

Guru Gochar 2025: १८ ऑक्टोबरपासून गुरूचे अतिचारी भ्रमण; स्वामीकृपेने डिसेंबरपर्यंत शुभ काळ!|

>> नव्या नवरीच्या पायगुणाने घरात धन धान्य समृद्धी घेऊन यावी, म्हणून आजही गृहप्रवेश करताना तिला उंबरठ्यावर माप ओलांडून आत घेतले जाते. 

>> अतिथी असो किंवा अन्य कोणीही व्यक्ती घरात थेट प्रवेश करू नये, म्हणून त्याला उंबरठा ही सीमारेषा आखून दिलेली असते. घरातल्या व्यक्तीची अनुमती असेल, तरच ती व्यक्ती घराचा उंबरठा ओलांडून आत येऊ शकते. 

>> त्याचप्रमाणे घरातील सदस्यांना वेळेचे, संस्काराचे, कुळाचे कायम स्मरण राहवे, त्यांच्याकडून चुकीचे पाऊल उचलले जाऊ नये, म्हणून पूर्वी 'सातच्या आत घरात' ही शिस्त लावलेली असे. सात नंतर घरातील कोणीही सदस्य कामाशिवाय घराचा उंबरठा ओलांडत नसे. आज काळ बदलला आहे. आताच्या व्यस्त जीवनशैलीमुळे सात च्या आत घरात हा नियम लागू करणे शक्य नाही, तरीदेखील घराचा उंबरठा आजही घराची शिस्त, संस्कार यांची आठवण करून देतो. 

>> बाहेरची कितीही नकारात्मक शक्ती असेल, तरी ती घरात प्रवेश करू शकत नाही. कारण घराचा उंबरठा वाईट लहरी, वाईट शक्ती, वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो, अशी पूर्वापार श्रद्धा आणि लोकांना आलेला अनुभव आहे. 

Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!

>> उंबरठ्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली, तर वास्तूत सुख, समृद्धी नांदते, असे वास्तुशास्त्रज्ञ सांगतात. 

म्हणून घराच्या आतील खोल्यांना उंबरठा नसला तरी चालेल, परंतु प्रवेश द्वाराला उंबरठा अवश्य बनवून घ्या. 

Web Title : दिवाली 2025: घर के मुख्य प्रवेश द्वार पर उंबरठा क्यों जरूरी है?

Web Summary : दिवाली 2025, खासकर धनतेरस (18 अक्टूबर) और लक्ष्मी पूजन (21 अक्टूबर) के लिए, उंबरठा महत्वपूर्ण है। यह लक्ष्मी का स्वागत करता है, उनकी विदाई को रोकता है, और परंपरा, अनुशासन और नकारात्मक ऊर्जाओं से सुरक्षा का प्रतीक है।

Web Title : Diwali 2025: Why your house entrance needs a threshold?

Web Summary : For Diwali 2025, especially Dhanteras (Oct 18) and Laxmi Pujan (Oct 21), a threshold is crucial. It welcomes Lakshmi, prevents her departure, and signifies tradition, discipline, and protection against negative energies.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.