Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:39 IST2025-10-14T12:37:43+5:302025-10-14T12:39:16+5:30

Diwali 2025: दिवाळीत पैसे खर्च होतात मान्य, पण ते दुप्पट करण्याची संधी म्हणजे मनी प्लांट; पण ते दिवाळीत कोणत्या दिवशी खरेदी करावे ते जाणून घ्या!

Diwali 2025: Money Plant's 'Double Boom'! Buy on 'this' day of Diwali, get double the benefits! | Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!

Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!

दिवाळी आधी समस्त नोकरदारांच्या बँक खात्यात बोनस जमा होतो. हे धन वृद्धिंगत व्हावे म्हणून धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनही केले जाते. त्याला वास्तु शास्त्राची जोड म्हणून मनी प्लांट खरेदीचा सल्ला दिला जातो. त्याचे नियम, लाभ आणि योग्य ती काळजी याबाबत सविस्तर जाणून घेऊ. 

Shani Gochar 2025: शनि देवाची खास दिवाळी भेट: २० ऑक्टोबरपासून 'या' ८ राशींच्या तिजोरीत होणार धनवृद्धी!

१७ऑक्टोबरपासून वसुबारसेने (Vasu Baras 2025) दिवाळी (Diwali 2025) सुरू होत आहे, त्यांनंतर धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज हे सण ओघाने आलेच. विशेषत: शनिवार १८ ऑक्टोबर धनत्रयोदशी (Dhan Teras 2025) आणि मंगळवार २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan 2025) या दिवसात धनपूजा आपण करणार आहोतच. या दिवशी मनी प्लांटची केलेली खरेदी अधिक लाभदायी ठरेल. पण त्याबरोबरच जाणून घ्या महत्त्वाचे नियम! 

वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra)घरामध्ये झाडे लावणे खूप चांगले मानले जाते. घरामध्ये हिरवी रोपे ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढतो, ज्यामुळे सुख-समृद्धी वाढते. अशा अनेक वनस्पती सांगितल्या आहेत, ज्या लावल्याने सौभाग्य वाढते आणि आनंद मिळतो. यापैकी एक म्हणजे मनी प्लांट! मनी प्लांटचा वापर बहुतेक घरांमध्ये दिसतो. पण मनी प्लांट लावताना वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन होणेही गरजेचे आहे. कारण या रोपट्याचा संबंध थेट आर्थिक बाबीशी आहे.त्याची नीट निगा राखली गेली नाही तर मनी प्लांट पैसा कमाईचे साधन बनण्याऐवजी पैसा गमवण्याचे साधन बनेल. यासाठी पुढे दिलेले नियम कायम लक्षात ठेवा.

Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!

मनी प्लांट ठेवण्यासाठी उत्तम जागा (Best Place to keep Money plant at home): 

मनी प्लांट हे इन डूअर प्लांट अर्थात घराच्या आत लावण्याचे झाड आहे. पण ते कुठेही ठेवून चालणार नाही तर आग्नेय कोनात (पूर्व-दक्षिण) ठेवावे. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. यासोबतच आर्थिक स्थिती भक्कम होते.

वास्तूनुसार आग्नेय कोनात मनी प्लांट ठेवल्याने ग्रहस्थितीही सुधारते. मुख्यतः शुक्र ग्रह बलवान होतो. कारण या दिशेचा स्वामी श्रीगणेश आहे. जो सर्व प्रकारच्या संकटांचा नाश करतो. शुक्र ग्रह आपल्या जीवनात रसिकता आणून जीवन आनंदमयी बनवतो. 

मनी प्लांट कोणत्या दिशेने ठेवू नये?

मनी प्लांट कधीही उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशेला लावू नये. या दोन्ही दिशा वृक्षारोपणासाठी निषिद्ध पूर्वेला प्रकाशाचा थेट स्रोत असल्याने वृक्ष, झाडं, रोपटी यांच्यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबू नये, हा त्यामागचा उद्देश असतो. अशा स्थितीत मनी प्लांट या दिशेला लावल्यास अशुभ फळ मिळेल. पैशांचा ऱ्हास होईल. 

याच दिवशी मनी प्लांट लावा : 

वास्तुशास्त्रात रोप लावण्यासाठीही विशेष तिथी सांगण्यात आली आहे. यानुसार शुक्ल पक्षातील अष्टमीपासून कृष्ण पक्षातील सप्तमी तिथीपर्यंत मनी प्लांट  लावल्यास शुभ फळ मिळते. दिवाळीतले धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाचे मुहूर्त खास ठरतात. 

Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!

याची काळजी घ्या :

>> मनी प्लांटचे रोप वेलीसारखे वाढते. त्यामुळे त्याची वेल नेहमी वरच्या दिशेने वाढली पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा. जमिनीला स्पर्श करत असल्यास, ते वरच्या दिशेने आधार देऊन वाढवा किंवा कापून टाका. मनी प्लांटची वर वाढणारी वेल समृद्धी वाढवणारी मानली जाते.

>> मनी प्लांटचे कोणतेही पान सुकले किंवा पिवळे पडले असेल तर ते ताबडतोब काढून टाकावे. असे मानले जाते की अशी पाने सुख आणि समृद्धीमध्ये अडथळा बनतात.

>> एवढी काळजी घेतली तरच मनी प्लांट लावण्यामागचा हेतू सफल होईल. तुम्ही निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग तुमची काळजी घेईल. 

Web Title : Diwali 2025: इस दिन मनी प्लांट खरीदें, मिलेगा डबल फायदा!

Web Summary : दिवाली पर धनतेरस या लक्ष्मी पूजन जैसे शुभ दिनों में मनी प्लांट खरीदें और धन में वृद्धि करें। इसे दक्षिण-पूर्व दिशा में रखें, उत्तर-पूर्व से बचें और समृद्धि के लिए स्वस्थ विकास सुनिश्चित करें। वित्तीय लाभ के लिए वास्तु टिप्स का पालन करें।

Web Title : Diwali 2025: Buy Money Plant on This Day for Double Benefits!

Web Summary : Boost wealth this Diwali by buying a money plant on auspicious days like Dhanteras or Laxmi Pujan. Place it in the southeast direction, avoid the northeast, and ensure its healthy growth for prosperity. Follow Vastu tips for financial gains.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.