दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:48 IST2025-10-16T15:44:29+5:302025-10-16T15:48:34+5:30

Diwali 2025 Dream Signify: कुलदेवता, कमळाचे फूल, सोने-चांदीचे दागिने स्वप्नात दिसणे नेमके कोणते संकेत मानले जातात? जाणून घ्या...

diwali 2025 did you see mahalakshmi devi in your dream these things signifies prosperity fortune auspiciousness and profit | दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!

दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!

Diwali 2025 Dream Signify: आनंदाचा, सुख-समृद्धीचा सण म्हणजे दिवाळी. वसुबारस ते भाऊबीज या कालावधीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या दीपोत्सवात सर्व दिवसांचे महत्त्व वेगळे आहे. यंदा २०२५ मध्ये १७ ऑक्टोबर २०२५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत दिवाळी साजरी होत आहे. संपूर्ण वर्षात दिवाळी हा मोठा सण मानला जातो. अनेक नवीन गोष्टी या काळात खरेदी केल्या जातात. लक्ष्मी देवीची मनोभावे पूजा केली जाते. 

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो, असे सांगितले जाते. समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. रात्री झोपल्यानंतर स्वप्नात अनेक गोष्टी दिसतात. काही गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात, तर काही गोष्टी डोळे उघडले की, क्षणात विसरायला होतात. ज्योतिषशास्त्राचीच एक शाखा असलेल्या स्वप्नशास्त्रात रात्री झोपल्यावर दिसणाऱ्या स्वप्नाचे संकेत नेमके काय असतात, याबाबत सांगितले जाते. 

लक्ष्मी देवीच्या आगमनाचा, धनवृद्धीचा शुभ संकेत

दिवाळीच्या दिवसात लक्ष्मीपूजनाला अधिक महत्त्व आहे. लक्ष्मी देवीची शुभ व कृपादृष्टी पडल्यास सुख, समृद्धी, धन-धान्य, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते, असे म्हटले जाते. लक्ष्मी देवी प्रसन्न झाल्यास आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्याचे संकेत मिळतात. रात्री झोपल्यानंतर स्वप्नात दिसणाऱ्या काही गोष्टी याबाबतचे संकेत मानले जातात. स्वप्नात नेमके काय दिसेल, हे आपल्या हातात नसते. मात्र, स्वप्नात काही गोष्टी दिसल्यास तो लक्ष्मी देवीच्या आगमनाचा आणि धनवृद्धीचा शुभ संकेत असल्याचे सांगितले जाते.

स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले?

दिवाळीच्या दिवसांत रात्री झोपल्यानंतर स्वप्नांत कुलदेवता, महालक्ष्मी किंवा लक्ष्मी देवीच्या स्वरुपांचे दर्शन होणे हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ लवकरच आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. नजीकच्या काळात लवकरच आपल्याला चांगली नोकरी मिळू शकते किंवा मनासारखा जोडीदार लाभू शकतो. कुलदेवतेचे स्वप्नात दर्शन होणे कार्यसिद्धिचा संकेत असल्याचे मानले जाते. स्वप्नात मंदिराचे दर्शन होणे शुभ मानले जात असून, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले महत्त्वाचे कार्य पूर्ण होऊ शकते, असे सांगितले जाते.

स्वप्नात कमळ आणि गुलाबाचे फूल दिसणे

रात्री झोपल्यानंतर स्वप्नात कमळ आणि गुलाबाचे फूल दिसणे शुभ मानले जाते. व्यापारी आणि नोकरदार वर्गाला अशा प्रकारचे स्वप्न पडले, तर ते शुभ फलदायी असल्याचे सांगितले जाते. आपल्या हातात कमळाचे पुष्प घेतले आहे, असे स्वप्न पडल्यास लवकरच आपल्या हातात भरपूर पैसा येणार आहे. व्यापारी वर्गाला मोठा फायदा वा नफा मिळणार असल्याचे ते सूचक मानले जाते. गुलाबाचे फूल स्वप्नात दिसणे म्हणजे लक्ष्मी देवीचा शुभाशिर्वाद आपल्यावर आहे, असा संकेत असल्याचे मानले जाते. लक्ष्मी देवीला गुलाबाचे फूल अत्यंत प्रिय आहे. नजीकच्या काळात लवकरच आपल्या मनोकामना पूर्ण होतील, याचे ते सूचक असल्याचे म्हटले जाते.

स्वप्नात स्वस्तिक चिन्ह दिसणे

रात्री झोपल्यानंतर स्वप्नात स्वस्तिक चिन्ह दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ आपल्या कुटुंबात लवकरच चांगली वार्ता मिळू शकते. आनंद, उत्साह, सकारात्मकतेचा संचार होऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांमधील नाते दृढ होऊ शकेल. स्वप्नात एखाद्या मोठ्या महालाचे दर्शन झाल्यास लवकरच अच्छे दिन येणार आहेत. मोठा करार वा प्रकल्प मिळू शकतो. धनलाभाचे योग जुळून येणार असल्याचा हा संकेत असल्याचे सांगितले जाते.

भेटवस्तू म्हणून सोने-चांदीचे दागिने दिसणे

रात्री झोपल्यानंतर स्वप्नात आपल्याला भेटवस्तू म्हणून दागिने मिळाल्याचे दिसल्यास ते शुभ मानले जाते. याचा अर्थ लवकरच शुभवार्ता मिळू शकते. ज्या कामासाठी अनेक दिवस प्रयत्नशील आहात. ते पूर्णत्वास जाऊ शकते. त्याचप्रमाणे स्वप्नात गाय आणि वासरू दिसणे किंवा एखाद्या व्यक्तीला गायीचे दूध काढताना पाहणे, असे स्वप्न पडल्यास लवकरच सुख, समृद्धी, धनवृद्धी होणार असल्याचा हा संकेत असल्याचे सांगितले जाते.

स्वप्नात अमृत कलश दिसणे

रात्री झोपल्यानंतर स्वप्नात अमृत कलश किंवा हातात अमृत कलश घेतलेल्या धन्वंतरीचे दर्शन झाल्यास तो शुभ संकेत असल्याचे मानले जाते. तसेच संपूर्ण कुटुंबाला लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होणार असल्याचा हा संकेत आहे. त्याचप्रमाणे धान, गहू यांची आनंदाने डोलणारी पिके स्वप्नात दिसणे चांगले मानले जाते. यामुळे नजीकच्या काळात लवकरच धनलाभाचे योग जुळून येऊन प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

 

Web Title : दिवाली २०२५: सपने में लक्ष्मी दर्शन? समृद्धि के संकेत!

Web Summary : दिवाली में देवताओं, कमल के फूलों या स्वस्तिक का सपना देखना सौभाग्य, धन और इच्छा पूर्ति का प्रतीक है। ये दर्शन समृद्धि, नए अवसरों और सकारात्मक पारिवारिक समाचारों का संकेत देते हैं।

Web Title : Diwali 2025: Seeing Lakshmi in dreams? Signs of prosperity!

Web Summary : Dreaming of deities, lotus flowers, or Swastik during Diwali signifies good fortune, wealth, and wish fulfillment. These visions suggest prosperity, new opportunities, and positive family news are coming soon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.