शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

भडक शीर्षक, सनसनाटी चित्रणं नि प्रक्षोभक वर्णनं अशी रोगट स्पर्धा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 2:19 AM

हजार फटाक्यांची माळ एका फाटाक्यानं पेटते नि मग काहीवेळ नुसतं कर्णकटू ठो ठो आणि फाट फाट, त्याचबरोबर विषारी धूर आजूबाजूचं वातावरण ग्रासणारा.

- रमेश सप्रेयापूर्वी अनेक विषाणूंना मानवानं यशस्वीपणे तोंड दिलंय. त्यासाठी काही किंमतही मोजली आहे. पण यावेळचं प्रकरण नि प्रकार काही निराळाच दिसतोय. हजार फटाक्यांची माळ एका फाटाक्यानं पेटते नि मग काहीवेळ नुसतं कर्णकटू ठो ठो आणि फाट फाट, त्याचबरोबर विषारी धूर आजूबाजूचं वातावरण ग्रासणारा.विषाणूच्या प्राणघातक प्रसारासंबंधी एवढ्या उलट सुलट, अतिरंजित, भ्रम पसरवणाऱ्या, अफवा असणाºया इतक्या गोष्टी दूरचित्रवाणीच्या अनेकानेक वृत्तवाहिन्यांवरून नि व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुकसारख्या समाजमाध्यमातून पसरवल्या जाताहेत की कुणाचाही चक्रव्यूहात सापडलेला अभिमन्यू व्हावा.इथंही ‘वेचक-वेधक’ हे सूत्र वापरलं तरच निभाव लागू शकेल. भडक शीर्षक, सनसनाटी चित्रणं नि प्रक्षोभक वर्णनं यात जी रोगट स्पर्धा सुरू आहे त्यातून आपणच विचार करून, खºया माहितगार व्यक्ती वा जबाबदार संस्थांकडून आवश्यक ती मार्गदर्शनपर माहिती मिळवणं आवश्यक बनलंय.वेचून काढण्याच्या कृतीला वेचणूक असं म्हणतात. यात खरं-खोटं, योग्य-अयोग्य, साधक-बाधक, तारक-मारक अशा गोष्टीतून हितकारक, कल्याणकारी जे असेल ते वेचून काढायचं असतं. यासाठी हवी असते विवेक बुद्धी. तिचं शिक्षण मुलांना लहानपणापासूनच घरी नि शाळेत दिलं गेलं पाहिजे. यासाठी मुलांना विविध पर्याय असलेले दैनंदिन जीवनातील प्रश्न विचारले पाहिजेत. पुढे मोठं झाल्यावर समाजासमोरील समस्यांनी अनेक अंगांनी चर्चा केली पाहिजे, काहीतरी नवी दिशा दाखवणारे वादविवाद आयोजित करायला हवेत. त्यातून त्या प्रश्नांचा वेध घेण्याची नि योग्य ते वेचण्याची सवय मुलांना लागेल.आपल्या जीवनात आपल्या चौरस्त्यांवर (क्रॉसरोड्स) आणणाºया घटना नेहमी घडत असतात. निश्चित कोणता रस्ता निवडायचा याचा निर्णय करणं खूप महत्त्वाचं असतं. सध्याची एकूण समाजस्थिती पाहिली तर ‘उडदामाजी काळेगोरे। काय वेचणार वेचणारे?।’ अशी अवस्था आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या