स्वप्नं आणि दूरदृष्टी... दृष्टीपलीकडे करा प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 10:19 AM2020-04-24T10:19:42+5:302020-04-24T10:22:59+5:30

काही लोकांनी काही वेळा स्वप्नांचा वापर ज्यामध्ये सामान्यतः त्यांना प्रवेश असतो, मनाच्या त्यांच्या अशा वेगवेगळ्या अयामात प्रवेश करण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे तेथे प्रवेश करण्यासाठी स्वप्न हे त्यांच्यासाठी एक उपयुक्त साधन असते.

The Difference Between Dreaming and Having Vision SSS | स्वप्नं आणि दूरदृष्टी... दृष्टीपलीकडे करा प्रवेश

स्वप्नं आणि दूरदृष्टी... दृष्टीपलीकडे करा प्रवेश

googlenewsNext

सद्‌गुरु - आपण जेव्हा असे म्हणतो की एखाद्या व्यक्तीकडे दूरदृष्टी आहे, तर हल्ली “दूरदृष्टी” हा शब्द मोठी स्वप्ने या अर्थाने समाजात वापरला जात आहे. नाही, दूरदृष्टी म्हणजे स्वप्न नव्हे. दूरदृष्टी म्हणजे आपली भविष्यात डोकावून पाहण्याची क्षमता. बहुतांश लोकांना दिसू न शकणारी एखादी गोष्ट जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपण म्हणतो, “अरे, हा द्रष्टा आहे. म्हणजे तो अशी एखादी गोष्ट पाहत आहे जे इतर लोक पाहण्यास असमर्थ आहेत.” त्याची स्वप्ने जर तुमच्या स्वप्नांपेक्षा मोठी असतील, तर तो एक दृष्टा माणूस होऊ शकत नाही – तो एक अधिक मोठी समस्या बनेल.

मुजफ्फर अली - तो एक शोषणकर्ता बनतो.

सद्‌गुरु - जर माझे एखादे असे मोठे स्वप्न आहे, जे इतर कोणाच्याही स्वप्नांशी मिळते जुळते नाही, तर मी त्या सर्वांना माझ्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्यास भाग पाडेन. अशा स्वप्नांचा काय उपयोग?

मुजफ्फर अली - तर मग आपले स्वप्न काय आहे?

सद्‌गुरु - मी स्वप्नं पाहात नाही. मी जीवन जगतो. मी फक्त पूर्णपणे जीवन जगतो.

मुजफ्फर अली - पण स्वप्ने पाहणे चांगले आहे, नाही का? अन्यथा, प्रत्येकजण आपल्याला स्वप्नं बघू नका, मोठे व्हा, सुशिक्षित व्हा आणि जीवन जागा असेच सांगतात. परंतु केवळ स्वप्नच एक अशी गोष्ट आहे, जी आपल्याला शुद्ध ठेवते, नाही का?

सद्‌गुरु - बहुतांश लोकांसाठी स्वप्ने ही सहसा वाईट असतात! सर्वजण चांगलीच स्वप्ने पहातात असे तुम्हाला वाटते का? मला तुम्हाला हे सांगायला हवं, गेल्या पंचवीस वर्षात, मला एकही स्वप्न पडलेले नाही. मी जेव्हा झोपतो, तेव्हा मी अतिशय गाढ झोपतो. मला जेव्हा जाग येते, तेव्हा मी संपूर्णतः जागृत असतो. कारण मी माझा वेळ रात्री स्वप्ने पाहण्यात वाया घालवत नाही, माझ्या आयुष्यातील गेली पंचवीस वर्षे बहुतेक वेळा मी रात्री फक्त अडीच ते तीन तास झोपलो आहे. हल्ली, मी थोडा आळशी होत चाललो आहे आणि चार ते साडेचार तास झोप घेत आहे.

मनाच्या पलिकडे

स्वप्न ही अचेत अवस्थेत केलेली कल्पना आहे. काही लोकांनी काही वेळा स्वप्नांचा वापर ज्यामध्ये सामान्यतः त्यांना प्रवेश असतो, मनाच्या त्यांच्या अशा वेगवेगळ्या अयामात प्रवेश करण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे तेथे प्रवेश करण्यासाठी स्वप्न हे त्यांच्यासाठी एक उपयुक्त साधन असते. विशेषतः ऑस्ट्रेलियामधील अबॉरजीन संस्कृतीत, आणि उत्तर अमेरिकन आदिवासींमध्ये स्वप्नांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे, परंतु या स्वप्नांचा वापर करून त्यांनी फक्त गूढता निर्माण केली. खराखुरा गुढवाद निर्माण होऊ शकला नाही. भारतामधील गूढ प्रक्रिया एखादी गोष्ट घडवून आणण्यासाठी कल्पनाशक्तीचा फार प्रभावीपणे करतात. अनेक लोकं गूढशक्तींचा वापर लोकांना हानी पोहोचवण्यासाठी करत आहेत, परंतु गूढ शक्तींच्या मदतीने अनेक सुंदर गोष्टी देखील निर्माण करता येतात.

स्वप्न हे केवळ तुमच्या मनाचे आणखी एक आयाम आहे. आपण जेंव्हा ते पार करून पुढे जाऊ, तेव्हा आपण आज ज्याला गूढत्व या नावाने ओळखतो, त्याला स्पर्श करतो. गूढत्व म्हणजे अशी एखादी गोष्ट ज्याला तुम्ही तुमच्या भौतिक शरीराने किंवा मनाने स्पर्श करू शकत नाही. तुमचे मन तसे करण्यास असमर्थ आहे. आपले शरीर तसे करण्यास असमर्थ आहे. त्या आयामाला स्पर्श करण्यासाठी तुमच्यात आणखी एक आयाम जागृत होणे आवश्यक आहे. आपण त्याची तशी व्याख्या करणे अधिक चांगले ठरेल. अन्यथा लोकं पहात असलले प्रत्येक स्वप्न आणि कल्पना गूढवादी होतील.

स्वतःमधले खोटे जग

स्वप्ने हे एक प्रकारचे साधन आहे, परंतु ते अतिशय अस्थिर, निसरडे साधन आहे. त्यापेक्षा अधिक चांगली साधने वापरासाठी उपलब्ध आहेत, परंतु त्यांचा वापर करून घेण्यासाठी मानवाने आपल्या आत अधिक संघटितपणे प्रस्थापित असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मी जर असा आहे, जर मी माझे डोळे मिटून घेतले, तर माझ्यासाठी जग विरून जाते. लोक म्हणतात, “हे कसे शक्य आहे?” ती तर डोळ्यांच्या पापणीची किमया आहे. त्या तुम्हाला त्यासाठीच दिल्या गेल्या आहेत. आपण जर त्या बंद करून घेतल्यात, तर सारे काही दिसेनासे व्हायला पाहिजे. आपल्या घराला एक खिडकी असते. आपण जर ती बंद केली, तर येवढा महान सूर्यदेखील झाकोळला जातो. जेंव्हा एखादी खिडकी हे करू शकते, तर आपल्या डोळ्यांच्या पापण्या तसे का करू शकत नाहीत?

त्या तसे करत नाहीत कारण तुम्ही तुमच्या आत एक खोटे जग निर्माण केले आहे. तुम्ही तुमचे डोळे बंद केले की बाह्य जग नाहीसे होते. पण तुमच्या आत तुमचे स्वतःचे एक खोटे जग आहे जे सतत कार्यरत असते. तुमच्याकडे तुमचे स्वतःचे खोटे जग नसेल, आणि तुम्ही फक्त याच वास्तविक जगात जगलात, आणि तुम्ही तुमचे डोळे मिटले, तर ते क्षणार्धात नाहीसे होते. मी जर पाच किंवा सहा दिवस एका जागी स्तब्ध बसून राहिलो, तर माझ्या मनात एकही विचार फिरकत नाही, स्वप्न तर खूप दूरची गोष्ट आहे. एकही विचार नाही, कारण माझे डोके रिकामे आहे. म्हणूनच ते हलके आहे, खूपच हलके.

Web Title: The Difference Between Dreaming and Having Vision SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.