शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
2
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
3
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
4
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
5
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
6
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
7
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
8
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
9
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
10
भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
11
वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
12
मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले!
13
“१ कोटींची नुकसान भरपाई द्या”; SIR प्रकरणी RSS संबंधित संघटनेची मागणी, ECI आयुक्तांना पत्र
14
“न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही”; नीलम गोऱ्हे यांनी घेतली गौरी पालवे कुटुंबीयांची भेट
15
तुमचा पैसा नाही, सन्मान पाहिजे; दिव्यांगांसाठी विशेष शो करा, सुप्रीम कोर्टाचे समय रैनाला आदेश
16
WPL 2026 Auction : DSP दीप्ती शर्मा ठरली सर्वात महागडी खेळाडू! RTM सह UP वॉरियर्सनं मोजले एवढे कोटी
17
ठाण्याचा तरुण अडकला! दोघांनी रस्त्यात अडवले, वार करत पैसे लुटले; दुसऱ्या दिवशी म्हणाला, "घरच्यांना धडा..."
18
बाजाराची सपाट क्लोजिंग! 'या' कारणामुळे गुंतवणूकदारांचे ५३,००० कोटींचे नुकसान! टॉप गेनर-लूजर्स कोण?
19
रिझवानचा मित्र परवेझला अटक, पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, भाऊ आहे सैन्यात
20
Nagpur Crime: 'लव्ह ट्रॅगल'चा हादरवून टाकणारा शेवट! तेजस्विनीने अमनसोबत ब्रेकअप केलं आणि अमितसोबत...; कशी केली गेली हत्या?
Daily Top 2Weekly Top 5

Datta Jayanti 2025: गुरुचरित्र वाचायची इच्छा आहे, पण वेळ नाही? ९ दिवस म्हणा 'हे' कवन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:49 IST

Datta Jayanti 2025: यंदा २७ नोव्हेंबर रोजी दत्त नवरात्र सुरू झाले असून ४ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीला समाप्ती होईल, या काळात हे कवन जरूर म्हणा.

यंदा २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दत्त नवरात्र(Datta Navratri 2025) असणार आहे आणि ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती(Datta Jayanti 2025) . अनेकांना या कलावधीत दत्त उपासना म्हणून गुरु चरित्राचे वाचन करावेसे वाटते. परंतु त्यासाठी पुरेसा वेळ, वातावरण, संबंधित नियम या गोष्टींचे पालन करता येईलच असे नाही. अशा वेळी मनोभावे केलेली दत्त प्रार्थना सुद्धा गुरुचरित्र वाचनाची अनुभूति देईल, असे लेखक रवींद्र वासुदेव गाडगीळ यांनी नमूद केले आहे. याबाबत ते त्यांच्या दत्त मंदिरातील आठवण आणि दत्त कवन दत्त भक्तांसाठी देत आहेत. 

Astro Tips: शुक्रवार आणि दुर्गाष्टमी: धनवृद्धीसाठी २ शुभ तिथींचा महायोग आणि ज्योतिषीय उपाय!

आमच्या शिरपूर येथील दत्तमंदिरातील दर गुरुवारची संध्याकाळ, दिवेलागणीची वेळ, पंचपदी म्हणून भजन संपवून भक्त महिला भजनी मंडळ घरी जायला म्हणून उठू लागत तेंव्हा माझी आई श्रीमती. विजया वासुदेव गाडगीळ, आपल्या गोड स्वरात हा झरा हमखास म्हणायची. ऐकायला अतिशय गोड असा हा झरा. खरेच दत्ताला तन मन धनाने विनवणी करून जात असे. की डोळ्यातून झर झर अश्रूंची धार लागे. आजही, आत्ताही.

“अनसूयेच्या सूता, दत्ता, तुझाची रे आसरा, सद्गुरू राया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा ।। कपट वेष धरूनी गुरु तुम्ही, अत्री घरी आले, पतीव्रतेच्या पुण्याईने बाळ तिथे झाले, भक्तासाठी जन्मही तुमचा, भक्ता  उद्धारा ।। वांझेची ती भक्ति पाहुनी, दिधले संततीला, दुग्ध फोडिले भिक्षेसाठी, वृद्धची महीषाला, वेल उपटोनी  कुंभ अर्पिला, भक्ताला द्विजवरा ।। अन्न अल्पची तुझ्या कृपेने, सहस्त्र द्विज जेविले, मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले, अष्टही रुपे दीपवाळीला, दाविले शिष्यवरा ।। अल्पमतीने पुष्प गुंफिले, साक्ष पटाया जरा, विनवू अनंता दर्शन द्यावे, जोडूनी आपले करा, अंत नका हो बघू, नका मुळी या हो या सत्वरा ।।

किती पवित्र भक्तीने ओथंबलेले शब्द, साधेच परंतु प्रभावी. गीतकार अनंत वैद्य यांनी अगदी मनापासून रचिले आहे जीव ओतून. त्याला गायले व संगीत दिले आहे ह.भ.प.कीर्तंनसूर्य श्री नारायणबुवा काणे यांनी. गुरुचरित्राचे सारच. सर्व अध्यायांची दखल घेतलेले अद्भुत मिश्रण. जणू दत्त बावनीच. 

स्वप्न शास्त्र: चांगले स्वप्न पडताच स्वप्नशास्त्रात दिलेले 'हे' नियम पाळा, तरच होईल प्रत्यक्षात लाभ!

मनाचा ठाव घेणारे हे काव्य. अवीट गोडीचा निर्मल श्रवणानंद. ते वातावरण पवित्र, मंगलमय होऊन जात असे. ही आळवणी अगदी मनापासून असल्याने वेगळी प्रार्थना करायलाच नको, एक दिव्य अनुभव. गुरूंच्या चरणाशी मन एकरूप होते. भक्तीने भरलेले व भारावलेले ते सुर. किती सुंदर ही स्वरपूजा. सर्वांग मोहरून आल्याशिवाय राहणार नाही. “कृतज्ञतेने भरल्या हृदया, शिष झुकवूनि  ठेवितो पाया, अगणित वंदन तुज सद्गुरूराया”

परीक्षा ही ज्याची घ्यायची त्याच्या नकळत घ्यायची असते हे भान न विसरता आपण आपली ओळख पुसून वेगळ्याच वेशात येऊन वेगळीच अभूतपूर्व मागणी करून भोजन मागितलेत परंतु ते मागतांना भिक्षेकर्‍याच्या सवाईप्रमाणे आपण ” माते भिक्षांदेही” म्हणालात आणि फसलात. पतिव्रता व व्रतस्थ असलेल्या त्या पवित्र, शुद्ध सतचरित्र असलेल्या असूया नसलेल्या स्त्रिने आपले इंगित ओळखले आणि आपली ईच्छा पूर्ण केली आपल्याला बालके व स्वतःला माता समजून. नाहीतरी तिला मातृयोग हवाच होता. जो तुम्ही पुरवलात. आणि तिची बाळे झालात. ह्याच धोरणी वृत्तीला लोक चमत्कार म्हणतात आणि नतमस्तक होतात. संकटकाळी न डगमगता त्या संकटाला तोंड देणे म्हणजेच निभावून नेणे हे केवळ एक स्त्रिच करू जाणे. पुराणाचे वा इतिहासाचे दाखले तेच सांगतात. अशा वेळी पुरुष लटपटतात. स्त्री निभावून नेते.  

दत्त नवरात्र २०२५: दत्त नवरात्र कधीपासून? कशी करावी उपासना आणि कशाने मिळेल सर्वाधिक फळ? 

ज्या भक्तांना गुरुचरित्र वाचण्याची आस आहे, पण वेळ नाही, त्यांनी केवळ एकदाच हा झरा म्हंटला तरी डोळ्यासमोरून सर्व अध्याय झरझर एखाद्या चित्रपटाप्रमाणे येतील आणि वाचण्याचे अपूर्व समाधान लाभेल. पुण्यही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 

English
हिंदी सारांश
Web Title : Datta Jayanti 2025: No time for Gurucharitra? Recite this prayer!

Web Summary : During Datta Navratri 2025, those lacking time for Gurucharitra reading can recite this 'Datta Kawan'. Reciting it once provides the spiritual benefits of reading the entire Gurucharitra, says Ravindra Gadgil.
टॅग्स :datta jayantiदत्त जयंतीshree datta guruदत्तगुरुshree gurucharitraसंपूर्ण श्री गुरुचरित्र अध्यायPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीspiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सण