दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 16:35 IST2025-12-01T16:34:59+5:302025-12-01T16:35:22+5:30

Datta Jayanti 2025: दत्त महाराजांच्या उपासनेत अनेकविध स्तोत्रे, आरत्या, श्लोक, मंत्रपठण केले जाते.

datta jayanti 2025 do you recite shri datta atharvashirsha regularly you receive eternal grace and attain virtue | दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!

दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!

Datta Jayanti 2025: गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे. यंदा २०२५ मध्ये गुरुवारी दत्त जयंती येणे विशेष योग मानला जात आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. देशभरातील अनेक ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काही ठिकाणी दत्त नवरात्र साजरे केले जाते. तर विशेष करून दत्त जयंतीनिमित्ताने गुरुचरित्राचे पारायणही केले जाते. दत्त महाराजांच्या उपासनेत अनेकविध स्तोत्रे, आरत्या, श्लोक, मंत्रपठण केले जाते. यात ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ला विशेष मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

अत्रि-अनसूया या दांपत्याचा पुत्र मानल्या गेलेल्या दत्तात्रेयाचा जन्म ब्रह्मा-विष्णू-महेश यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा सुपरिचित आहे. या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रेयाची त्रिमुखी आणि सहा हातांची सगुणमूर्ती सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, मुळात पुराणात एकमुखी आणि द्विभुज अथवा चतुर्भुज अशा दत्ताचे वर्णन आढळते. विशेष म्हणजे दत्तोपासनेत ध्यानासाठी त्रिमुखी दत्ताचे सगुणरूप आणि पूजाविधीसाठी पादुकांना महत्त्व दिले गेलेले असते. नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर या सर्व प्रसिद्ध दत्तक्षेत्री अशा पादुकांचीच स्थापना केलेली आढळते. दत्त महाराजांचे अनेक अवतार झाल्याचे सांगितले जाते. दत्त अथर्वशीर्ष नियमित म्हणण्याचे अनेक लाभ सांगितले जातात. 

‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय अवधूताय दिगम्बरायविधिहरिहराय आदितत्त्वाय आदिशक्तये ॥ १॥

त्वं चराचरात्मकः सर्वव्यापी सर्वसाक्षी त्वं दिक्कालातीतः त्वं द्वन्द्वातीतः ॥ २॥

त्वं विश्वात्मकः त्वं विश्वाधारः विश्वेशः विश्वनाथः त्वं विश्वनाटकसूत्रधारः त्वमेव केवलं कर्तासि त्वं अकर्तासि च नित्यम् ॥ ३॥

त्वं आनन्दमयः ध्यानगम्यः त्वं आत्मानन्दः त्वं परमानन्दः त्वं सच्चिदानन्दः

त्वमेव चैतन्यः चैतन्यदत्तात्रेयः ॐ चैतन्यदत्तात्रेयाय नमः ॥ ४॥

त्वं भक्तवत्सलः भक्ततारकः भक्तरक्षकः दयाघनः भजनप्रियः त्वं पतितपावनः करुणाकरः भवभयहरः ॥ ५॥

त्वं भक्तकारणसम्भूतः अत्रिसुतः अनसूयात्मजः त्वं श्रीपादश्रीवल्लभः त्वं गाणगग्रामनिवासी श्रीमन्नृसिंहसरस्वती त्वं श्रीनृसिंहभानः अक्कलकोटनिवासी

श्रीस्वामीसमर्थः त्वं करवीरनिवासी परमसद्गुरु श्रीकृष्णसरस्वती त्वं श्रीसद्गुरु माधवसरस्वती ॥ ६॥

त्वं स्मर्तृगामी श्रीगुरूदत्तः शरणागतोऽस्मि त्वाम् । दीने आर्ते मयि दयां कुरु तव एकमात्रदृष्टिक्षेपः दुरितक्षयकारकः ।

हे भगवन्, वरददत्तात्रेय, मामुद्धर, मामुद्धर, मामुद्धर इति प्रार्थयामि । ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ७॥

॥ ॐ दिगम्बराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् ॥

॥ श्री गुरुदेव दत्त ॥

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
 

Web Title : दत्त जयंती २०२५: ‘श्री दत्त अथर्वशीर्ष’ से पाएं कृपा!

Web Summary : दत्त जयंती २०२५, ४ दिसंबर को है। इस शुभ अवसर पर ‘श्री दत्त अथर्वशीर्ष’ का पाठ करने से आशीर्वाद और पुण्य प्राप्त होता है। यह त्योहार भगवान दत्तात्रेय को समर्पित है, जिनकी पूजा में मंत्र, श्लोक और आरती शामिल हैं। अथर्वशीर्ष का नियमित पाठ कई लाभ प्रदान करता है।

Web Title : Datta Jayanti 2025: Recite ‘Shri Datta Atharvashirsha’ for blessings!

Web Summary : Datta Jayanti 2025 falls on December 4th. Reciting ‘Shri Datta Atharvashirsha’ during this auspicious time brings blessings and spiritual merit. The festival celebrates Lord Dattatreya, whose worship involves mantras, shlokas and aartis. Regular recitation of the Atharvashirsha offers numerous benefits.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.