शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Dasbodh Jayanti 2024: समर्थ रामदास स्वामींनी दासबोध रचनेसाठी शिवथरघळ हीच जागा का निवडली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 14:35 IST

Dasbodh Jayanti 2024: दासबोधाचे जन्मस्थान आणि समर्थ रामदास स्वामींनी अनेक वर्षे वास्तव्य केलेल्या शिवथरघळीचे महत्त्व जाणून घेऊया...

Dasbodh Jayanti 2024: रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत समर्थ रामदास स्वामी. समर्थ संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबीड अरण्यात शिवथरघळ येथे समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध या ग्रंथाची रचना केली. त्यासाठी ही तिथी दासबोध जयंती म्हणून साजरी केली जाते. सन २०२४ मध्ये १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ०८ वाजून १५ मिनिटांनी नवमी तिथी सुरू होत असून, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ०८ वाजून १५ मिनिटांनी नवमी तिथीची सांगता होत आहे. 

समाजाला उपदेश करण्यासाठी समर्थांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. १७ व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो. दासबोधाच्या माध्यमातून रामदास स्वामींनी नेटका उपदेश समाजाला केले आहे. रामदास स्वामी यांनी आपले पट्टशिष्य कल्याण स्वामी यांच्याकरवी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. दासबोधाला ग्रंथराजाची उपमा दिली जाते. समर्थ रामदास स्वामी यांनी शिवथरघळ येथेच का दासबोधाची रचना केली? शिवथरघळचे वैशिष्ट्य आणि महत्त्व जाणून घेऊया...

१६४९ ते १६६० या कालावधीत रामदास स्वामींचे शिवथरघळ येथे वास्तव्य

दोन्ही बाजूंना डोंगरांचे कडे आणि मध्येच असलेली अरुंद दरी, म्हणजेच घळ. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अशा अनेक घळी आहेत. अनेक घळींना इतिहास आहे आणि त्या प्रसिद्ध आहेत. परंतु सर्वांत प्रसिद्धीला आली, ती समर्थ रामदास स्वामींची शिवथरघळ. शिवथरघळ ही तिथल्या निसर्गसौंदर्यामुळे, पावसाळ्यात तिथे कोसळणाऱ्या धबधब्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते. रामदास स्वामी १६४९ मध्ये या प्रदेशातील घळीत वास्तव्यास आले. १६६० पर्यंतचा काळ इथे व्यतीत केला. त्या काळात रामदास स्वामींनी दासबोध आणि इतर ग्रंथसाहित्याची निर्मिती केली. दक्षिण दिग्विजयासाठी जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवथर घळीत येऊन समर्थांचा आशीर्वाद घेतला होता, असे सांगितले जाते.

Dasbodh Jayanti 2024: दासबोध ग्रंथाचीही जयंती साजरी व्हावी, एवढं काय दडलं आहे त्यात? वाचा!

समर्थांच्या जीवनात घळीचे महत्त्व फार मोठे आहे

समर्थांच्या जीवनात घळीचे महत्त्व फार मोठे आहे. या घळी समर्थांच्या निसर्गरम्य एकांताची साक्ष देत आहेत. घळीचे महत्त्व म्हणजे तेथे दिवसा गारवा व रात्री उब असते. समर्थांच्या बहुतेक घळीस रामघळी म्हणतात. एकांतात चांगल्या योजना आखता येतात. आत्मपरीक्षण करून आपल्या चुका लक्षात येतात. कित्येक प्रश्न अचानक सुटतात. ग्रंथरचना व सुरक्षित राजकारण करता येते. समाधी सुख अनुभवता येते, असे सांगितले जाते. विशेष म्हणजे शिवथरघळ येथे जर्मन, चायनीज, जपानी, अमेरिकन, ब्रिटिश, कोरियन अशा सर्व बनावटीच्या एकाही यंत्राला एकाही उपग्रहाची रेंज येत नाही, असा दावाही केला जातो. उपग्रह नजरेच्या टप्प्यात येऊ शकतात, मात्र, ते यंत्रांना मात्र सापडत नाही, असेही म्हटले जाते. म्हणजे घळीभोवती असे काहीतरी क्षेत्र होते जे उपग्रहांच्या फ्रीक्वेन्सीज खाली पोहोचूच देत नाही, असे सांगितले जाते. अशा स्थितीत केवळ आपल्याच मनातले विचार ऐकू येणार! त्यात भेसळ होणे नाही! आणि म्हणूनच समर्थांनी दासबोध लिहायला ही जागा निवडली असणार, असे म्हटले जाते.

अध्यात्मविद्येचे आणि परमार्थमार्गाचे विवेचन करणारा दासबोध

ग्रंथाचा पहिला समास स्तवनाचा असून ह्याच्या अगदी आरंभीच ग्रंथाचे दासबोध हे नाव आणि भक्तिमार्गाचे विशदीकरण हा त्याचा हेतू समर्थांनी स्पष्ट केलेला आहे. त्यानुसार मनुष्यजन्माचे सार्थक होण्यासाठी भक्तिमार्गाची आवश्यकता प्रतिपादन करीत असताना देहासक्तीचा निषेध त्यांनी केलेला असला, तरी भक्तीचा आविष्कार करण्यासाठीसुद्धा देह हेच माध्यम माणसाला उपलब्ध असल्यामुळे नरदेहाची त्यांनी स्तुतीही केली आहे. विश्वाच्या आरंभी आणि अखेरीस उरणारे तत्त्व म्हणजे ब्रह्म. निर्गुण, केवल परब्रह्माचा साक्षात्कार भक्तिपूर्वक करून घेणे, हे मनुष्याचे अंतिम ध्येय समर्थांनी दासबोधात वारंवार प्रतिपादिले. हा ग्रंथ जरी अध्यात्मविद्येचे आणि परमार्थमार्गाचे विवेचन करणारा असला, तरी त्याने प्रपंचाने महत्त्वही आवर्जून मांडलेले आहे. विवेकशील, अलिप्त वृत्तीने संसारात राहावे व असा संसार किंवा प्रपंच परमार्थाला पूरक ठरतो, अशी शिकवण देण्यात आली आहे. मानवी सद्‌गुणांचे परिवर्धन घडून लोक परमार्थप्रवण आणि कर्तृत्वसंपन्न व्हावेत, ही तळमळ दासबोधातून स्पष्टपणे प्रत्ययास येते. या ग्रंथाची महाराष्ट्रात अनेकांकडे श्रद्धापूर्वक पारायणे केली जातात.

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक