शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Exclusive: आपण आपल्या पृथ्वीबाबत जागरूक आहोत?; सद्गुरू आणि विजय दर्डा यांचा संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 12:58 PM

पृथ्वीच्या संवर्धनासाठी आवश्यक विषयांवर सद्गुरू आणि विजय दर्डा करणार चर्चा

पृथ्वीचं संवर्धन करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात आध्यात्मिक गुरू, पद्मविभूषण पुरस्कार विजेते सद्गुरू जग्गी वासुदेव कायमच पुढाकार घेतात. यासोबतच इशा फाऊंडेशनच्या माध्यमातून ते अध्यात्म, शिक्षण आणि पर्यावरण विषयांमध्येही काम करतात.

विजय दर्डा हे शिक्षणतज्ज्ञ, माजी संसदपटू, 'सकल जैन समाज'चे संस्थापक आणि लोकमत मीडियाचे चेअरमन असून ते लोककल्याणासाठी काम करतात. महाराष्ट्राच्या विकासासाठी, विशेषत: विदर्भावर लक्ष केंद्रीत करून त्यांनी उचललेल्या पावलांचं सगळ्यांनीच कौतुक केलं आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी यवतमाळचा विकास करण्यास ते वचनबद्ध आहेत.

३ सप्टेंबर २०२० रोजी संध्याकाळी ५ वाजता विजय दर्डा हे सद्गुरुंना, पर्यावरण आणि त्याच्या संवर्धनासंबंधीच्या विचारांना चालना देणारे काही प्रश्न विचारतील. सद्गुरुंनी दिलेल्या माहितीमुळे प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पडेल आणि त्यांना 'कॉन्शस प्लॅनेट' चळवळीसाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल.

विजय दर्डा खालील विषयांना स्पर्श करतील:

- पर्यावरण आणि अध्यात्म यांचं सह-अस्तित्व शक्य आहे का?- कोविड १९ महामारीतून मिळालेल्या शिकवणीचा वापर करून आपण पृथ्वीसाठी कसं काम करू शकतो?- विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्य नागरिक काय करू शकतात?- पोषक वातावरण नसताना शेतकरी काय करू शकतात?- नद्यांचं संवर्धन करण्यासाठी, त्या जिवंत ठेवण्यासाठी सरकार काय करू शकतं?

महाराष्ट्र आणि पृथ्वीशी संबंधित विविध मुद्द्यांवर ते संवाद साधतील. या दोन व्यक्तिमत्वांच्या संवादातून अनेक वेगळे विचार आणि व्यावहारिक उपाय समोर येतील.

या चर्चेचा प्रीमिअर टेलिकास्ट पाहा आज, ३ सप्टेंबर २०२० रोजी संध्याकाळी ५ वाजता फक्त YouTube.com/LokmatBhakti,  YouTube.com/Lokmat या आमच्या यू-ट्युब चॅनल्सवर आणि Facebook.com/Lokmat या फेसबुक पेजवर!