शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Chaturmas 2024: चातुर्मासात दानधर्म करण्याआधी 'दान' आणि 'भीक' यातला फरक जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 07:00 IST

Chaturmas 2024: चातुर्मासात गरजू व्यक्तीला दान केल्याने पुण्य मिळते, पण ते दान सत्पात्री अर्थात योग्य व्यक्तीला नसेल तर ती भीक ठरते; म्हणून जाणून घ्या फरक!

सतत घेत राहणाऱ्या हाताला देण्याची सवय लागायला हवी, म्हणून आपल्या संस्कृतीने दान ही संकल्पना आखली. ज्याप्रमाणे आपल्या गरजेच्या वेळी कोणी येऊन आपली मदत करावी, असे आपल्याला वाटते, त्याप्रमाणे आपणही कोणाच्या उपयोगी पडले पाहिजे. आपली छोटीशी मदत कोणाच्या जगण्याचा आधार बनू शकते. म्हणून यथाशक्ती दान करत राहावे आणि त्याची मोजदाद करू नये. म्हणतात ना, 'नेकी कर और दर्या मे डाल!' 

अलीकडेच चातुर्मास सुरु झाला आहे. या चार महिन्यात पुण्यसांच्यांच्या दृष्टीने दानधर्म करावा असे सांगितले जाते. परंतु दान हे सत्पात्रीच असावे असे शास्त्र सांगते. पण मग दान घेणारी व्यक्ती योग्य आहे हे कसे ओळखावे? जाणून घेऊया मुख्य फरफ! त्याबद्दल अधिक सांगताहेत पुरोहित सागर सुहास दाबके. 

मधुकर म्हणजे भुंगा, भ्रमर. भुंगा हा निरनिराळ्या फुलांतून मध सेवन करतो, पण मधमाशी प्रमाणे त्याचा संचय करत नाही. मधमाशी संचय करते त्यामुळे तिला दुःख प्राप्त होते. भुंगा जेव्हा फुलातून मध सेवन करतो, तेव्हा त्या फुलाला त्रास होऊ देत नाही, या भुंग्याच्या वृत्तीने "भिक्षा" मागावी.  गृहस्थ जे देईल ते घ्यावे, आणि मिळलेल्याचा संचय करू नये. या वृत्तीने भिक्षा मागण्याच्या पद्धतीला मधुकरी वृत्ती म्हणतात. त्याचाच अपभ्रंश माधुकरी असा झाला आहे. 

गुरुगृही राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मधुकरी वृत्तीचा अवलंब करून निर्वाह करावा. दान, भिक्षा, सहायता आणि वितरण या चार अत्यंत भिन्न गोष्टी आहेत. आजकाल जे भिकारी भीक मागतात आणि आपण त्यांना भीक घालतो त्याला "सहायता" असे नाव आहे. 

जे संपन्न आणि समृद्ध व्यक्तीला दिले जाते ते "दान" असते, उदाहरणार्थ दरिद्री व्यक्तीला तुम्ही गाय दिलीत, तर तो तिचा सांभाळ करू शकणार नाही, गाय अशा व्यक्तीला द्यावी जो समृद्ध, धनवान आहे ।

समाजातील जो घटक, काही महत्वाचे कार्य करत आहे, उदाहरणार्थ विद्यार्जन किंवा धर्मप्रसार त्याला दिलेले अन्न म्हणजे "भिक्षा" आणि आपल्या मिळकतीचे शास्त्रोक्त पद्धतीने विभाजन करून ते शास्त्रनिर्दिष्ट ठिकाणी देणे म्हणजे "वितरण" 

टॅग्स :chaturmasचातुर्मास