Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:06 IST2026-01-09T15:04:29+5:302026-01-09T15:06:13+5:30
Chanakya Niti Personality Development Tips: वाद घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपण शक्तीने लढा देऊ शकत नाही, काही ठिकाणे युक्तीही वापरावी लागते, याबाबत आचार्यांचे मार्गदर्शन कामी येईल.

Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण
Chanakya Niti in Marathi: आपल्या आजूबाजूला अनेकदा अशी माणसे असतात जी सतत टोमणे मारतात, ओरडतात किंवा स्वतःलाच श्रेष्ठ समजतात. आचार्य चाणक्य म्हणतात की, अशा लोकांशी वाद घालून आपली ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा, त्यांना शब्दांनी नामोहरम करणे केव्हाही चांगले.
Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा
१. जेव्हा कोणी तुम्हाला बोलताना मध्येच अडवते (The Interrupter)
अनेक लोक स्वतःचेच म्हणणे रेटण्यासाठी तुम्हाला पूर्ण बोलू देत नाहीत. चाणक्य नीतीनुसार अशा वेळी शांत राहून समोरच्याला आपली चूक उमजवून द्यावी.
काय म्हणावे: "मी माझे म्हणणे पूर्ण केल्यावर तुमचे विचार ऐकायला मला नक्कीच आवडेल." (हे शब्द तुमचे धैर्य आणि मर्यादा दोन्ही स्पष्ट करतात.)
२. जेव्हा कोणी तुमच्यावर विनाकारण ओरडते (The Shouter)
काही लोक आवाजाच्या जोरावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी न ओरडता संयम राखणे हीच खरी ताकद आहे.
काय म्हणावे: "तुमचा आवाज वाढल्यामुळे मला तुमच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणे कठीण जात आहे. आपण शांतपणे बोलू शकतो का?"
१० जानेवारी: गुरु-आदित्य योग: तुमच्या आयुष्यातील अडचणी निवारणासाठी उत्तम योग; करा 'हा' उपाय
३. जेव्हा समोरचा माणूस तार्किक चर्चा करत नाही (The Irrational)
जर एखादी व्यक्ती केवळ वाद घालण्यासाठी बोलत असेल, तर तिथे तुमची शांतता हेच उत्तर आहे.
काय म्हणावे: "मला असे वाटते की या चर्चेतून आता काही निष्पन्न होणार नाहीये. आपण दोघेही शांत झाल्यावर यावर नंतर बोलूया का?"
४. जेव्हा कोणी वैयक्तिक टीका करते (The Personal Attacker)
कामाच्या ठिकाणी किंवा समाजात लोक विषयाला सोडून तुमच्यावर वैयक्तिक टिप्पणी करतात. अशा वेळी विषयाची मर्यादा आखून देणे गरजेचे असते.
काय म्हणावे: "आपण विषयावर लक्ष केंद्रित करूया, एकमेकांवर नाही. मूळ मुद्यावर तुमचे मत काय आहे?"
५. संभाषणावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी (The Controller)
जर कोणी केवळ स्वतःचेच गाणे गात असेल, तर चाणक्य नीतीनुसार तिथे 'साम' (समजावणे) वापरावे.
काय म्हणावे: "दोघांचेही म्हणणे ऐकले जाईल याची आपण खात्री करूया का? मी माझे मुद्दे मांडले आहेत, आता तुमचे सांगा."
Chanakya Niti: लोकांमध्ये तुमची किंमत शून्य आहे? चाणक्य नीतीचे 'हे' ५ नियम वापरा, जग तुमचा आदर करेल!
चाणक्य नीतीचा मूळ संदेश:
आचार्य चाणक्य म्हणतात, "मूर्खांशी कधीही वाद घालू नका, कारण ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर ओढतील आणि अनुभवाच्या जोरावर तुम्हाला हरवतील."
त्यामुळे, 'विचित्र' लोकांशी वागताना वर दिलेले शब्द वापरल्याने:
>> तुमची Image (Aura) एक सुसंस्कृत आणि शक्तिशाली व्यक्ती म्हणून तयार होते.
>> समोरच्याला त्याच्या मर्यादेची जाणीव होते.
>> तुमचा संयम हीच तुमची सर्वात मोठी 'नीती' ठरते.