शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
6
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
7
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
8
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
9
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
10
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
11
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
12
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
13
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
14
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
15
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
16
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
17
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
18
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
19
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
20
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...

Chaitra Navratri 2021 Date: कधीपासून होतोय चैत्र नवरात्रारंभ? 'या' वाहनावरून होणार देवीचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 19:05 IST

Chaitra Navratri 2021 Date: सन २०२१ मधील पहिले नवरात्र कधीपासून सुरू होणार आहे? चैत्र नवरात्राचा शुभ मुहूर्त कोणता? यंदा देवीचे आगमन कोणत्या वाहनावरून होणार आहे? जाणून घेऊया...

अवघ्या काही दिवसांनी मराठी नवीन वर्षाचा आरंभ होणार आहे. यंदाचे मराठी वर्षाचे शालिवाहन शके १९४३ असून, प्लवसंवत्सरारंभ होणार आहे. वास्तविक पाहता मराठी वर्षात चार नवरात्र साजरी केली जातात. यातील पहिले नवरात्र मराठी वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच चैत्र महिन्यात साजरे केले जाते. मराठी वर्षात येणाऱ्या दोन नवरात्रांना सर्वाधिक महत्त्व असल्याचे मानले जाते. पहिले चैत्र महिन्यातील चैत्री नवरात्र आणि दुसरे अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र. सन २०२१ मधील पहिले नवरात्र कधीपासून सुरू होणार आहे? चैत्र नवरात्राचा शुभ मुहूर्त कोणता? यंदा देवीचे आगमन कोणत्या वाहनावरून होणार आहे? जाणून घेऊया... (Chaitra Navratri 2021 Date and Time)

चैत्र नवरात्रारंभ: १३ एप्रिल २०२१

चैत्र प्रतिपदा प्रारंभ: १२ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ८ वाजून ०१ मिनिट.

चैत्र प्रतिपदा समाप्ती: १३ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० वाजून १६ मिनिटे.

चैत्र नवरात्र समाप्ती: २१ एप्रिल २०२१ 

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे चैत्र नवरात्रारंभ १३ एप्रिल २०२१ रोजी होईल, असे सांगितले जात आहे. ज्योतिषशास्त्र आणि देवी भागवत पुराणानुसार, दुर्गा देवीचे आगमन भविष्यातील घटनांविषयीचे संकेत देत असते, असे सांगितले जाते. (Chaitra Navratri 2021 Durga Devi Vahan)

Gudi Padwa 2021 : गोड वर्षाची कडू सुरुवात कडुलिंबाने का करतात, याचे धार्मिक आणि शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व!

चैत्री नवरात्र २०२१ मधील देवीचे वाहन

देवी भागवत पुराणात देवीचे आगमन कोणत्या वाहनावरून होते, याबाबत भाष्य केलेले आढळून येते. 'शशि सूर्य गजरुढा शनिभौमै तुरंगमे। गुरौशुक्रेच दोलायां बुधे नौकाप्रकीर्तिता॥' या श्लोकानुसार, आठवड्यातील सात दिवसांत देवीचे आगमन कोणत्या वाहनावरून होणार हे सांगितले गेले आहे. म्हणजेच आठवड्यातील दिवसांनुसार वेगवेगळ्या वाहनांवरून देवीचे आगमन होत असते.

अश्वारूढ देवीचे आगमन

नवरात्रारंभ रविवार किंवा सोमवार होत असेल, तर देवीचे वाहन हत्ती असते. गुरुवार किंवा शुक्रवार या दिवशी नवरात्रारंभ असेल, तर देवी डोली, पालखीतून येते. बुधवार असेल, तर देवीचे आगमन नौकारूढ होते. शनिवार आणि मंगळवारी नवरात्रारंभ होणार असेल, तर देवीचे आगमन अश्वारुढ होते. यंदा सन २०२१ मध्ये चैत्र नवरात्रारंभ मंगळवारी होत आहे. म्हणजेच यावर्षी देवीचे आगमन अश्वारूढ होईल, असे सांगितले जात आहे. विशेष बाब म्हणजे गतवर्षीच्या शारदीय नवरात्रातही देवीचे आगमन अश्वारूढ झाले होते.  

टॅग्स :Navratriनवरात्रीgudhi padwaगुढीपाडवा