Career Astro Tips: मुलांचे करिअर निवडताना त्यांची आवड आणि व्यवसायाला पूरक ग्रहदशा अवश्य बघा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:41 IST2025-06-03T12:40:40+5:302025-06-03T12:41:00+5:30
Career Astro Tips: दहावी-बारावीच्या निकालानंतर 'पुढे काय?' या मुलांच्या करिअरचा मागोवा घेणारा प्रश्न उभा राहतो तेव्हा ग्रहांची साथ मार्गदर्शक ठरते (भाग १)

Career Astro Tips: मुलांचे करिअर निवडताना त्यांची आवड आणि व्यवसायाला पूरक ग्रहदशा अवश्य बघा!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
आपण घेतलेले शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय ह्याचा अनेकदा एकमेकांशी काहीही संबंध नसतो असे दिसून येते. आपण जे शिक्षण घेतले त्याला अनुसरून नोकरी नाही मिळाली म्हणून मग नोकरी मिळेल असे शिक्षण घ्यावे लागते आणि त्यातच वयाची पंचविशी उलटते. टेक्निकल आणि व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या अभ्यास पद्धतीचे शिक्षण घेणे आजकाल आवश्यक आहे. पण त्यासाठी पूरक ग्रहदशा आहे का ? हे आज आपण व्यवसाय आणि नोकरीसाठी लागणारे ग्रहयोग या अनुषंगाने बघुया.
इंजिनिअरींग हे क्षेत्र मोठे असून त्यात विविध शाखा येतात. ह्यासाठी प्रामुख्याने मंगळ पाहावा. त्याच्या राशी आणि त्याचा दशम भावाशी असलेला संबंध . ४, ५, ८ ह्या ठिकाणी मंगळाच्या राशी असतील तर चांगलेच. मंगळ हा मेकॅनिकल रसायने, रवी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, शनी सिव्हील इंजिनिअरिंग, भूगर्भ . संगणक म्हणजेच कॉम्पुटर क्षेत्रासाठी बुध , गुरु हर्शल चांगले. गुरु हा उच्च तंत्रज्ञान तसेच शनी अत्यंत संयम, चिकाटी देतो तसेच मंगळ इंजिनिअरींगशी संबंध देतो.
बुध हा उत्तम संवाद कौशल्य देतो . शब्दांच्या कोट्या करणारा हा बुध पत्रिकेत उत्तम फलित देत असेल तर कुठल्या क्षेत्रात आपण यश संपादन करू शकतो ते बघुया.
लग्न भावात किंवा धन भावात बुध तसेच २, ६, १०, ६ ह्या भावांशी जर मंगल गुरु बुध संबंधित असतील, तर व्यक्ती वकिली क्षेत्रात नाव मिळवेल. पंचम , लाभ भावातील शनी सुद्धा वकिलीसाठी पूरक ठरतो. वकील म्हणून व्यवसाय करायचा असेल तर लाभस्थान आणि लाभेश शुभ हवेत तसेच लग्नात ५, ७, ९, १० ह्या लग्न राशी हव्यात.
केंद्रात शुभ गुरु, शनी व्यक्तीला उत्तम न्यायाधीश बनवतात. न्यायाधीश होण्यासाठी लग्नेश बलवान आणि ६, १० ह्या भावात शुक्र गुरु शनी हे ग्रह परस्परांशी संबंधित असावेत. हे अधिकार देणारे ग्रह आहेत. लग्न दशम भावातील राहुसुद्धा उच्च फलित देतो. शनी ५ ,११ मध्ये असावा. ४, ९ ह्या भावांची दशा उच्च शिक्षण देईल, पण नोकरी देणार नाही .
शिक्षण घेताना पुढे नोकरीसाठी असलेल्या दशांची सांगड घालणे आवश्यक असते. दशा मार्ग दाखवतेच . जसे नवम भावाच्या दशेत पर्यटन , प्रोफेसर गुरूशी संबंधित व्यवसाय केले तर उत्तम होईल. षष्ठ भाव असेल तर घरी खाद्य पदार्थ करून त्याचा व्यवसाय करावा. पंचम भाव हा कलेचा कलात्मक आहे. मुलांच्या शिकवण्या , कला अवगत असेल तर तबला पेटी हेही शिकवता येईल.
ज्योतिष शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अशा विविध पत्रिका संग्रहित करून त्यातील नियम अभ्यासावे . कदाचित अजूनही काही नियम निघू शकतील, त्याचेही अध्ययन करावे. प्रत्येक विषयाचे मनन , चिंतन आवश्यक आहे. पुढील भागात इतर व्यवसाय बघुया.
संपर्क : 8104639230