Budh Pradosh 2025: बुध प्रदोष मुहूर्तावर म्हटलेली शिव स्तुती देते अपार लाभ, आज म्हणायला विसरू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 07:00 IST2025-12-17T07:00:01+5:302025-12-17T07:00:02+5:30

Budh Pradosh 2025: आज २०२५ या इंग्रजी वर्षातले शेवटचे प्रदोष व्रत आहे, त्यानिमित्ताने शिव पूजा करा आणि पुढे दिलेली शिव स्तुति आवर्जून म्हणा!

Budh Pradosh 2025: Shiva praise recited on Budh Pradosh Muhurta gives immense benefits, don't forget to recite it today! | Budh Pradosh 2025: बुध प्रदोष मुहूर्तावर म्हटलेली शिव स्तुती देते अपार लाभ, आज म्हणायला विसरू नका!

Budh Pradosh 2025: बुध प्रदोष मुहूर्तावर म्हटलेली शिव स्तुती देते अपार लाभ, आज म्हणायला विसरू नका!

दर महिन्याला कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील समस्या दूर करायच्या असतील तर प्रदोष काल पूजेच्या वेळी शिव स्तुती मंत्राचा जप करा. यामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो आणि सुख-समृद्धी वाढते. चला शिव स्तुती वाचूया.

Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय

सनातन धर्मात प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळले जाते. या दिवशी, प्रदोष काळात, भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. सश्रद्ध मनाने महादेवाची आराधना केल्याने मनुष्याला शुभफळ प्राप्त होते, अशी धार्मिक धारणा आहे. तसेच भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आशीर्वाद सदैव राहतो. आज १७ डिसेंबर रोजी प्रदोष आहे. ही तिथी बुधवारी आल्याने याला बुध प्रदोष व्रत म्हटले जाईल.

बुध प्रदोष व्रत शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी १९ जून २०२४ रोजी सकाळी ७:२८ मिनिटांनी सुरू होईल. आणि २० जून रोजी सकाळी ७.४९ मिनिटांनी संपेल. अशा स्थितीत १७ डिसेंबर रोजी प्रदोष व्रत सूर्यास्ताच्या वेळी अर्थात सायंकाळी सायंकाळी ०५:३५ ते ०७:४५ पर्यंत करायचे आहे आणि पुढील शिवस्तुती म्हणायची आहे. 

Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!

शिव स्तुति मंत्र (Shiv Stuti Ka Path)

पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यम।
जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरारिम।1।
महेशं सुरेशं सुरारातिनाशं विभुं विश्वनाथं विभूत्यङ्गभूषम्।
विरूपाक्षमिन्द्वर्कवह्नित्रिनेत्रं सदानन्दमीडे प्रभुं पञ्चवक्त्रम्।2।
गिरीशं गणेशं गले नीलवर्णं गवेन्द्राधिरूढं गुणातीतरूपम्।
भवं भास्वरं भस्मना भूषिताङ्गं भवानीकलत्रं भजे पञ्चवक्त्रम्।3।
शिवाकान्त शंभो शशाङ्कार्धमौले महेशान शूलिञ्जटाजूटधारिन्।
त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप: प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप।4।
परात्मानमेकं जगद्बीजमाद्यं निरीहं निराकारमोंकारवेद्यम्।
यतो जायते पाल्यते येन विश्वं तमीशं भजे लीयते यत्र विश्वम्।5।
न भूमिर्नं चापो न वह्निर्न वायुर्न चाकाशमास्ते न तन्द्रा न निद्रा।
न गृष्मो न शीतं न देशो न वेषो न यस्यास्ति मूर्तिस्त्रिमूर्तिं तमीड।6।
अजं शाश्वतं कारणं कारणानां शिवं केवलं भासकं भासकानाम्।
तुरीयं तम:पारमाद्यन्तहीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनम।7।
नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते।
नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्।8।
प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ महादेव शंभो महेश त्रिनेत्।
शिवाकान्त शान्त स्मरारे पुरारे त्वदन्यो वरेण्यो न मान्यो न गण्य:।9।
शंभो महेश करुणामय शूलपाणे गौरीपते पशुपते पशुपाशनाशिन्।
काशीपते करुणया जगदेतदेक-स्त्वंहंसि पासि विदधासि महेश्वरोऽसि।10।
त्वत्तो जगद्भवति देव भव स्मरारे त्वय्येव तिष्ठति जगन्मृड विश्वनाथ।
त्वय्येव गच्छति लयं जगदेतदीश लिङ्गात्मके हर चराचरविश्वरूपिन।11।

Web Title : बुध प्रदोष 2025: इस शुभ दिन पर शिव स्तुति के लाभ।

Web Summary : बुध प्रदोष पर प्रदोष काल में शिव स्तुति का जाप करने से सुख और समृद्धि आती है। त्रयोदशी तिथि पर रखा जाने वाला प्रदोष व्रत भगवान शिव और पार्वती को समर्पित है। शुभ समय (17 दिसंबर को शाम 05:35 बजे - 07:45 बजे) के दौरान शिव स्तुति का पाठ करना बहुत फायदेमंद है।

Web Title : Budh Pradosh 2025: Shiva Stuti benefits on this auspicious day.

Web Summary : Chanting Shiva Stuti during Pradosh Kaal on Budh Pradosh brings happiness and prosperity. The Pradosh fast, observed on the Trayodashi Tithi, is dedicated to Lord Shiva and Parvati. Reciting the provided Shiva Stuti during the auspicious time (05:35 PM - 07:45 PM on December 17th) is highly beneficial.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.