Budh Gochar 2025: २४ ऑक्टोबर बुध गोचर; १० नोव्हेंबरपर्यंत 'वृश्चिक' राशीच्या लोकांनी घ्या 'ही' काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 12:03 IST2025-10-24T12:01:23+5:302025-10-24T12:03:50+5:30
Budh Gochar 2025: वृश्चिक रास ही मनात अढी धरणारी, गूढपणे वागणारी, यात बुध ग्रहाचा प्रवेश झाल्यामुळे संशयात भर न पडता स्वतःचा सांभाळ कसा करावा ते पाहा.

Budh Gochar 2025: २४ ऑक्टोबर बुध गोचर; १० नोव्हेंबरपर्यंत 'वृश्चिक' राशीच्या लोकांनी घ्या 'ही' काळजी!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
बुध म्हणजे संवाद, शब्द, लेखणी, वक्तृत्व, विचारशैली, गणितातील चातुर्य. थोडक्यात प्रचंड बुद्धिमान ग्रह. हे ग्रह प्रत्येक राशीत वेगवेगळे फलित प्रदान करतात. २४ ऑक्टोबर रोजी बुध(Budh Gochar 2025) हा वृश्चिक ह्या मंगळाच्या राशीत प्रवेश करत असून तिथे त्याचे वास्तव्य महिनाभर असणार आहे. मंगळाची ही शत्रूराशी गूढ आणि उर्जेची राशी आहे.
वृश्चिक राशीचे लोक आणि स्वभाव गुण :
मंगळाच्या ह्या शत्रू राशीत बुध हा अनेकदा परखड, टोचून बोलणारा, मर्मावर बोट ठेवणारा अशा प्रकारची फळे देतो. वृश्चिक ही गूढ राशी आहे. ह्यातील ग्रह विशेष परिणाम करणारे असतात. बुध ह्या राशीत खोलवर दूरगामी परिणामांचा विचार करणारा असल्यामुळे कमी बोलणे आणि अधिक विचार असा असतो. ही संशोधनाची राशी असल्यामुळे इथे गुप्तहेर, गूढ विद्येचे अभ्यासक, संशोधक, मानसोपचार तज्ञ ह्या क्षेत्रातील लोक आढळतात. प्रत्येक व्यक्ती आणि घटना ह्यांचा सखोल अभ्यास करणारे हे लोक असल्यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वात आणि बोलण्यात एक प्रकारची गूढता असते. मनातल्या मनात अनेकदा कुढत राहणे हा स्वभाव असतो. मोकळेपणा बोलण्यात दिसत नाही. काहीतरी कुठेतरी लपवा छपवी दिसते. संकुचित वृत्ती असते. सहज कुणावर विसंबून राहणे किंवा विश्वास ठेवणे त्यांना कधीही जमत नाही. प्रत्येक गोष्टीची जणू चौकशी केल्याशिवाय त्यांचे मन शांत होत नाही. गूढ विद्या, मंत्र साधना ह्यात आणि गूढ विद्यांचे वाचन ह्यात त्यांची प्रगती होते. थोडासा संशयी, एकलकोंडा, अतिविचार आणि टीका करणारा त्यांचा स्वभाव असतो. प्रत्येक गोष्टीत गुप्तता ठेवतात. मोकळेपणाने न बोलल्यामुळे मनात विचार साचून राहतात. अनेकदा त्यांना त्वचारोगाचा सामना करावा लागतो. आजारांचे मूळ विचारात असते. अशा पद्धतीची जडण घडण असलेले हे वृश्चिक राशीचे लोक!
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
बुधाचा प्रभाव :
तर हा बुध वृश्चिक राशीत २४ ऑक्टोबर पासून महिनाभर असणार आहे. त्यात १० नोव्हेंबर रोजी तो वक्री सुद्धा होणार आहे. प्रवासात आपल्या वस्तू सांभाळणे. आपल्या शब्दाचा चुकीचा अर्थ कुणी काढणार नाही आणि कुणाला दुखावेल असा शब्द आपण बोलणार नाही ह्याची काळजी घ्या. कुठलेही मोठे निर्णय शक्यतो टाळा. प्रवास टाळणे. बुध म्हणजे लेखणी. कुठल्या कागदावर विचारपूर्वक सही करा. कुठलेही करार करणे ह्या काळात टाळा. ११ नोव्हेंबर ला गुरु वक्री होत आहे, १० नोहेंबर ला बुध आणि शनी वक्री आहेच. ह्याचा अर्थ पत्रिकेतील ३ ग्रह आणि ६ भाव वक्रत्वाच्या अमलाखाली आहेत.
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
१० नोव्हेंबर पर्यंत करा पुढील उपाय:
पत्रिका बघताना ह्या इटुकल्या पण महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बुध ग्रहाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. बुध ह्या ग्रहाच्या शुभ प्रभावासाठी गाईला चारा अथवा पालक खायला घाला. श्री विष्णूचा जप करा. बुधवारी जेवणात हिरवी भाजी, चटणी ह्याचा समावेश करा. ह्यासोबत नित्य उपासना त्यात श्री स्वामी समर्थांचा जप आणि हनुमान चालीसा पठण ह्यांचा समावेश असावा. लाभ होईल.
संपर्क : 8104639230