शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराला २ वर्ष पूर्ण! १८०० कोटींचा खर्च, १० कोटी भाविकांचे राम दर्शन; ३००० कोटींचे दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 09:08 IST

Ayodhya Ram Mandir Anniversary 2026: अयोध्या रामनगरी देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी एक सुव्यवस्थित, सुसज्ज तीर्थस्थान म्हणून उदयास आले आहे.

Ayodhya Ram Mandir Anniversary 2026: २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते अयोध्येत भव्य राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याला आता दोन वर्षे होत आहेत. तत्पूर्वी, २५ नोव्हेंबर २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरावर धर्म ध्वजारोहण केले. राम मंदिर आणि परिसरातील मंदिरांचे काम पूर्ण झाल्याचे ते प्रतीक मानले गेले. गेल्या २ वर्षांत अयोध्येत भाविकांचा महासागर लोटला होता. कोट्यवधींचा खर्च करून उभारण्यात आलेल्या राम मंदिराला राम भक्तांनी दान-देणगीही भरभरून दिली. 

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रतिष्ठा द्वादशी असे नाव दिले. हिंदू कॅलेंडरनुसार या प्रतिष्ठा द्वादशीला जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. २०२५ मध्ये राम मंदिराचा वर्धापन दिन दोनवेळा साजरा करण्यात आला. ११ जानेवारी २०२५ रोजी प्रथम आणि ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुसऱ्या वेळेस प्रतिष्ठा द्वादशी साजरी केली गेली. या प्रतिष्ठा द्वादशीचे प्रमुख पाहुणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते. विशेष पाहुणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी विवाह पंचमीच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी राम मंदिरात धर्म ध्वजारोहण केले.

२ वर्षांत १० कोटी भाविक रामलला चरणी नतमस्तक

राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील भाविक अयोध्येत आले. सामान्य असो वा विशेष व्यक्ती, सर्वांनाच राम दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती. संत-महंत, ऋषी, राजकारणी, सेलिब्रिटी, क्रिकेटपटू, व्हीआयपी अयोध्येत पोहोचले. दररोज सरासरी एक लाख भाविक रामललाच्या चरणी नतमस्तक झाले. गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यात केवळ ४५ दिवसांत ४ कोटी भाविकांनी राम दर्शन घेतले. एका अंदाजानुसार, गेल्या दोन वर्षांत दहा कोटींहून अधिक भाविकांना रामाचे दर्शन झाले.

भारतासह परदेशातील राजकीय नेते राम दरबारात

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, २० राज्यांचे मुख्यमंत्री, ६ हून अधिक राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह राम दर्शन घेतले. भारत भेटीवर असलेले फिजीचे उपपंतप्रधान एका शिष्टमंडळासह अयोध्येला गेले होते. नेपाळचे परराष्ट्रमंत्री नारायण प्रसाद सौद यांनीही अयोध्येत राम दर्शन घेतले. भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे, मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलाम, नेपाळी लष्करप्रमुख अशोक राज सिग्देल यांनीही राम दर्शन घेतले. 

राम मंदिराचे स्वरुप आणखी भव्य झाले

राम मंदिरात बालकराम विराजमान असून, पहिल्या मजल्यावर श्रीरामांचा दरबार साकारण्यात आला आहे. ८०० मीटर लांबीचा तटबंदीचा बांध पूर्ण झाला आहे. राम मंदिर परिसरात भगवान शिव, गणेश, सूर्य, हनुमान, माता भगवती आणि अन्नपूर्णा या देवतांना समर्पित मंदिरे आकाराला आली आहेत. तसेच श्रीरामाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महर्षी वाल्मिकी, महर्षी विश्वामित्र, वशिष्ठ, अगस्त्य, निषादराज, अहिल्या आणि माता शबरी यांना समर्पित मंदिरे संकुलात आहेत.

१८०० कोटींचा खर्च, ३००० कोटींचे दान

राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी मिळालेल्या एकूण दान-देणग्यांची माहिती दिली. ही आकडेवारी नोव्हेंबर २०२५ च्या आसपासची आहे. आतापर्यंत एकूण ₹३,००० कोटींपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या आहेत. तसेच हजारो किलो सोने-चांदी, आभूषणे राम मंदिरासाठी दान देण्यात आली. राम मंदिर बांधकाम प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे ₹१,८०० कोटी आहे. राम मंदिरासाठी निधी संकलन मोहीम २०२२ मध्ये सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, दोन वर्षांत भाविकांच्या सोयींना प्राधान्य देऊन आधुनिक दर्शन व्यवस्था, मजबूत सुरक्षा व्यवस्था, डिजिटल माहिती प्रणाली, सुलभ मार्ग, प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी, स्वच्छता, दिव्यांगांना अनुकूल सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. अयोध्या रामनगरी आता भारत आणि परदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी एक सुव्यवस्थित आणि सुसज्ज धार्मिक शहर म्हणून उदयास आले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ram Mandir Completes 2 Years: ₹1800 Crore Spent, 10 Crore Visitors

Web Summary : Ayodhya's Ram Mandir marks two years since opening, attracting 10 crore devotees. Donations exceeded ₹3000 crore against ₹1800 crore expenses. The temple complex features shrines dedicated to various deities and figures from Ramayana. Improved facilities cater to the growing number of pilgrims.
टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरspiritualअध्यात्मिक