विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:04 IST2025-10-29T12:03:16+5:302025-10-29T12:04:34+5:30
Auspicious Dates for Marriage: २ नोव्हेंबरपासून लग्नकार्याला सुरुवात होणार, पण मुहूर्त कमी असल्याने लग्न वेळेत उरकावे लागणार; पहा शुभ मुहूर्ताच्या तारखा!

विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
Vivah Shubh Muhurat 2025: यंदा २ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी(Prabodhini Ekadashi 2025) आहे. त्यादिवशी चातुर्मास(Chaturmas 2025) संपून तुलसी विवाहाने(Tulasi Vivah 2025) चार महिने खोळंबल्या लग्न कार्याला पुनश्च सुरुवात होते. पौषात पुन्हा महिनाभर लग्न थांबवली जातात आणि त्यानंतर थेट पुढच्या आषाढी एकादशीपर्यंत विवाहाचे आयोजन केले जाते. मात्र यंदा विवाह मुहूर्त कमी असल्याने खऱ्या अर्थाने लगीन 'घाई' करावी लागणार अशी चिन्ह आहेत.
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिलेल्या 'लोकमत'ला दिलेल्या माहितीनुसार, यंदा नोव्हेंबर 2025 ते जुलै 2026 या दरम्यान विवाहासाठी 49 दिवस आणि मुंजी, साखरपुडा यांसारख्या शुभ कार्यासाठी 0 दिवस शुभकाळ आहे.
यावर्षी विवाहयोगासाठी ग्रह फारसे अनुकूल नसण्याचे मुख्य कारण म्हणजे गुरूचा अस्त आणि शुक्राचा अस्त हे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या अस्ताच्या काळात विवाह करणे शुभ मानले जात नाही.
Marriage Astro Tips: लग्न ठरवताना घाई केली, तर भविष्यात हर्षल नेपच्युन देऊ शकतो धोका!
विवाहाचे शुभमुहूर्त (Vivah Shubh Muhurat )
- नोव्हेंबर 2025 - 22, 23, 25, 26, 27, 30
- डिसेंबर 2025 - 2, 5
- फेब्रुवारी 2026- 6, 7, 10, 11, 12, 20, 21, 22, 25, 26
- मार्च 2026 - 5, 7, 8, 14, 15, 16
- एप्रिल 2026 - 21, 26, 28, 29, 30
- मे 2026 - 1, 3, 6, 8, 9, 10, 13, 14
- जून 2026- 19, 23, 24, 27
- जुलै 2026- 1, 3, 4, 7, 8, 11
मुंजीचे शुभमुहूर्त
- फेब्रुवारी 2026- 6, 19, 22, 26, 27
- मार्च 2026 - 8, 20, 29
- एप्रिल 2026 - 3, 8, 21, 22, 28
- मे 2026- 3, 6, 7, 8
- जून 202- 16, 17, 19