शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

औदुंबर पंचमी: साक्षात कल्पवृक्षाच्या पूजेचा दिवस; 'या' पद्धतीने करा साधना, मिळेल गुरूंचा आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:46 IST

Audumbara Panchami 2026: औदुंबर पंचमीचे महत्त्व, पूजा विधी आणि त्यामागील श्रद्धेवर आधारित सविस्तर माहिती जाणून घ्या. 

माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवी तिथी ही 'औदुंबर पंचमी(Audumbara Panchami 2026) म्हणून साजरी केली जाते. दत्त संप्रदायात या दिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण औदुंबर (उंबर) हे झाड भगवान दत्तात्रयांचे विश्रामस्थान मानले जाते. यंदा शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी औदुंबर पंचमी आहे. त्यादिवशी कोणते पूजा विधी करावेत, जेणेकरून दत्त गुरूंचा कृपाशिर्वाद राहील ते जाणून घेऊ. 

संकष्ट चतुर्थी २०२६: तिजोरी कधीच रिकामी होणार नाही; संकष्टीला बाप्पाला अर्पण करा 'या' गोष्टी!

दत्त संप्रदायात औदुंबर वृक्षाला साक्षात 'कल्पवृक्ष' मानले जाते. 'औदुंबर पंचमी' हा दिवस या पवित्र वृक्षाची उपासना करून गुरुचरणांशी एकरूप होण्याचा दिवस आहे. ज्या घराच्या किंवा मंदिराच्या परिसरात औदुंबर असतो, तिथे साक्षात श्रीदत्तात्रयांचा वास असतो अशी श्रद्धा आहे.

औदुंबर पंचमीचे आध्यात्मिक महत्त्व:

शास्त्रानुसार, औदुंबर वृक्षाच्या मुळाशी भगवान विष्णू, मध्यभागी ब्रह्मा आणि अग्रभागी शिव राहतात. औदुंबराच्या सावलीत बसून केलेली साधना किंवा नामस्मरण हजार पटीने जास्त फळ देते. विशेषतः ज्यांना मानसिक शांती हवी आहे किंवा ज्यांच्या कुंडलीत गुरु ग्रह कमकुवत आहे, त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी असतो.

औदुंबर पंचमी पूजा विधी:

१. शुद्धी: या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे. २. वृक्ष पूजन: तुमच्या परिसरातील औदुंबर वृक्षापाशी जाऊन त्याची पूजा करा. जर वृक्ष उपलब्ध नसेल, तर औदुंबराच्या फांदीची किंवा दत्तात्रयांच्या फोटोची पूजा करू शकता. ३. अभिषेक: वृक्षाच्या मुळाशी दूध आणि पाणी अर्पण करावे. हळद-कुंकू, अष्टगंध आणि अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. ४. दिवा आणि धूप: वृक्षाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि उदबत्ती ओवाळावी. ५. प्रदक्षिणा: औदुंबर वृक्षाला 'श्री गुरुदेव दत्त' किंवा 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या मंत्राचा जप करत किमान ७ किंवा २१ प्रदक्षिणा घालाव्यात. ६. नैवेद्य: बाप्पाला किंवा औदुंबराला खडीसाखर किंवा दुधाचा नैवेद्य दाखवावा.

Vastu Tips: घरात सतत कटकटी? एका ग्लास पाण्यात लवंग टाकून पाहा; कळेल धक्कादायक सत्य!

या दिवशी काय करावे?

गुरुचरित्र वाचन: औदुंबर पंचमीला गुरुचरित्रातील महत्त्वाच्या अध्यायांचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते.

दानधर्म: गरीब आणि गरजू लोकांना पिवळे अन्न किंवा वस्त्र दान करावे.

मौन साधना: काही वेळ शांत बसून गुरुंचे ध्यान करावे, यामुळे आत्मिक शक्ती वाढते.

Swapna Shastra: स्वप्नात दिसणाऱ्या विचित्र गोष्टींचा तुमच्या खऱ्या आयुष्याशी काय संबंध असतो?

टॅग्स :shree datta guruदत्तगुरुshree gurucharitraसंपूर्ण श्री गुरुचरित्र अध्यायPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण