आज आपण रोज वर्तमानपत्रात किंवा बातम्यांमध्ये कोट्यवधींच्या 'स्कॅम' (Scam) बद्दल वाचतो. कधी शेअर मार्केट, कधी जमिनीचे व्यवहार, तर कधी 'कमी काळात जास्त पैसा' देणारी आमिषे. ही फसवणूक केवळ पैशांची नसते, तर ती एका माणसाने दुसऱ्या माणसावर ठेवलेल्या 'विश्वासाची हत्या' असते. ज्योतिष अभ्यासक अस्मिता दीक्षित यांनी या फसवणुकीमागचे मानसशास्त्र आणि त्याचे आध्यात्मिक परिणाम अत्यंत प्रभावीपणे मांडले आहेत.
कष्टाचा पैसा आणि फसवणुकीचे दुःख
आपण सामान्य माणसे आहोत. कोथिंबीर किंवा मिरची घेतानाही चार वेळा विचार करणारी, पै-पै जमवून संसार उभा करणारी ही माणसे. जेव्हा या कष्टाच्या पैशांवर कुणी डल्ला मारतो, तेव्हा केवळ खिसा रिकामा होत नाही, तर मन दुभंगते. फसवणूक करणाऱ्याला कदाचित त्या क्षणी मजा वाटत असेल, पण ज्याचे घर उद्ध्वस्त झाले आहे, त्याच्या तोंडातून निघणारे 'शिव्या-शाप' आणि 'तळतळाट' कधीही वाया जात नाहीत.
शनीची न्यायदेवता आणि 'वरचे कोर्ट'
फसवणूक करणारा माणूस पोलीस किंवा कायद्यापासून काही काळ वाचू शकेल, पण निसर्गाच्या न्यायदेवतेपासून (शनी) सुटका होणे अशक्य आहे.
कर्माचे फळ: जे पेरले तेच उगवणार. दुसऱ्याच्या मुलांच्या तोंडचा घास काढणाऱ्याला स्वतःच्या मुलाबाळांचे सुख कधीच लाभत नाही.
अंधार कोठडी: लोकांचा विश्वासघात करणाऱ्याच्या नशिबात शेवटी केवळ अंधार कोठडी आणि मानसिक छळच उरतो.
अंतरात्म्याचा आवाज: तुम्ही जगाला फसवू शकता, पण स्वतःच्या आरशात पाहताना जेव्हा नजर मिळत नाही, तीच सर्वात मोठी शिक्षा असते.
February Grahan 2026: १५ दिवसांत दोन मोठी ग्रहणं! दुर्मिळ योग; चुकूनही करू नका 'या' चुका!
ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन: राहू आणि बुध
फसवणुकीमागे ग्रहांची स्थितीही कारणीभूत असते:
राहूचा प्रभाव: फसवणूक होणे किंवा करणे यासाठी 'राहू' हा मुख्य ग्रह जबाबदार असतो. राहूची दशा किंवा अंतर्दशा सुरू असेल, तर व्यक्ती भ्रमित होते आणि फसवणुकीला बळी पडते.
बुधाचे कारस्थान: संवाद आणि बुद्धीचा कारक 'बुध' जर बिघडलेला असेल, तर अशी लोकं अत्यंत 'मधाळ' बोलून दुसऱ्याला आपल्या षडयंत्रात ओढतात.
सावधानता: राहूच्या नक्षत्रावर शक्यतो महत्त्वाचे व्यवहार किंवा खरेदी टाळावी.
आपण काय काळजी घ्यावी?
फसवणुकीला आपणही काही प्रमाणात कारणीभूत असतो. दुप्पट-तिप्पट पैशांच्या हव्यासापोटी आपण कागदपत्रे नीट तपासत नाही. लक्षात ठेवा, "दोन घास कमी खावे, पण कोणाची हाय घेऊ नये." कष्टाने कमावलेला पैसाच तुम्हाला सुख आणि शांती देऊ शकतो.
आपण आपल्या मुलांना केवळ संपत्तीचा वारसा देत नाही, तर आपल्या पाप-पुण्याचाही वारसा देत असतो. चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही फेडावा लागतो. कुणालाही फसवताना हजार वेळा विचार करा, कारण परमेश्वर सुतराम सोडणार नाही.
Web Summary : Astrologer Asmita Dixit explains fraud's psychology and spiritual consequences. While criminals evade earthly laws, Saturn ensures karmic justice. Dishonest gains bring suffering; honesty brings peace. Rahu and a weakened Mercury contribute to deception. Avoid important transactions during Rahu's Nakshatra.
Web Summary : ज्योतिषी अस्मिता दीक्षित धोखाधड़ी के मनोविज्ञान और आध्यात्मिक परिणामों की व्याख्या करती हैं। जहाँ अपराधी सांसारिक कानूनों से बच जाते हैं, वहीं शनि कर्मिक न्याय सुनिश्चित करते हैं। बेईमानी से लाभ दुख लाता है; ईमानदारी शांति लाती है। राहु और कमजोर बुध धोखे में योगदान करते हैं। राहु के नक्षत्र के दौरान महत्वपूर्ण लेनदेन से बचें।