शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Astrology: नवमांश कुंडली आणि धनप्राप्ती: तुमचा 'धनेश' कोणत्या ग्रहाच्या प्रभावात आहे? यावरून ठरते भाग्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 10:31 IST

Astrology: फक्त लग्न कुंडली पाहून चालणार नाही; 'नवमांश' सांगेल तुमची खरी प्रगती आणि धनप्राप्ती कशी होईल, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

जन्मलग्न कुंडलीचे नवमांश हे सूक्ष्म रूप आहे. नवमांशात ग्रहांचे बळ पाहिल्याशिवाय ग्रह नेमके कसे फळ देणार, हे सांगता येत नाही; म्हणूनच फलज्योतिषात नवमांश कुंडलीला अत्यंत महत्त्व आहे. प्रत्येक राशीत सव्वा दोन नक्षत्रे आणि प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात. अशा प्रकारे ३० अंशात ९ चरणे म्हणजेच सव्वा दोन नक्षत्रे समाविष्ट केलेली असतात. प्रत्येक चरण ३ अंश २० कलांचे असते, जो त्या राशीचा नवमांश असतो. आपला जन्मवेळचा चंद्र कोणत्या नवमांशात आहे, त्यावरून आपली अभिव्यक्ती आणि स्वभाव समजतो.

Astro Tips: सुखी वैवाहिक जीवन आणि करिअर यश: ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी करा 'हे' प्रभावी तोडगे.

आज आपण 'धनेशाचा' (द्वितीयेश) संबंध नवमांशात कशा प्रकारे येतो, याबद्दल माहिती घेऊया. धनस्थान हे तुमचे कुटुंब आणि धनप्राप्ती दर्शवते.

चंद्राचा नवमांश: धनेश जर चंद्राच्या नवमांशात असेल, तर व्यक्तीचे बोलणे अत्यंत हळुवार आणि लाघवी असते. चंद्र म्हणजेच जल, जीवन आणि लक्ष्मी होय; त्यामुळे अशा व्यक्तींकडे सदैव पैशाचा ओघ असतो. चंद्र हा वनस्पतींचाही कारक असल्याने पाणी किंवा वनस्पतींशी संबंधित व्यवसायांतून धनप्राप्ती होते. तसेच सामाजिक संस्था किंवा सामाजिक कार्यातूनही लाभ मिळतात.

रवीचा (सूर्य) नवमांश: रवीच्या म्हणजेच राजाच्या नवमांशातील ग्रह राजासारखीच फळे देतो. सन्मार्गाने आणि राजमार्गाने मिळवलेले धन येथे दिसते. उच्च अधिकार, विशाल हृदय आणि सर्वांचा विचार करणारा स्वभाव येथे पाहायला मिळतो. शिक्षण क्षेत्र, विशेषतः व्यवस्थापन (Management) क्षेत्रातून अशा व्यक्तींना धनप्राप्ती होते.

मंगळाचा नवमांश: नवमांश मंगळाचा असेल, तर वाणी उग्र असू शकते. नको तितके धाडस, क्रूरपणा आणि टीकात्मक संवादामुळे विसंवाद निर्माण होऊ शकतो. अफाट खर्च आणि टोचून बोलण्याची प्रवृत्ती येथे दिसते. जर मंगळासोबत राहू असेल, तर जुगारी प्रवृत्तीतून अर्थार्जन होऊ शकते. मंगळ म्हणजे धाडस, म्हणूनच पोलीस किंवा सैन्यदलातील नोकरीतून धनप्राप्ती होते. उष्णतेचे विकार किंवा उजव्या डोळ्याचे त्रास जाणवू शकतात.

Numerology: ना दागिन्यांची गरज, ना महागड्या कपड्यांची; तरी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडतात 'या' जन्मतारखेचे लोक!

बुधाचा नवमांश: धनेश बुधाच्या नवमांशात असेल, तर व्यक्ती उत्तम बुद्धिवान आणि बिरबलासारखी चतुर असते. उत्तम गणिती आणि उत्तम तर्कशक्ती यांच्याकडे असते. वाणीचा कारक बुध असल्याने पैशाच्या हिशोबात या व्यक्ती चोख असतात.

शुक्राचा नवमांश: शुक्रासारख्या रसिक ग्रहाच्या नवमांशामध्ये ग्रह असेल, तर आनंद आणि सौख्य प्राप्त होते. शुक्र हा माणसे जोडणारा आणि नात्यांत गोडवा जपणारा आहे. कलेचा आविष्कार आणि स्त्रियांकडून लाभ होण्याची शक्यता असते. बोलणे मधाळ असते. शुक्राशी संबंधित व्यवसायातून उत्तम अर्थार्जन होते. मात्र, शुक्र दूषित असेल तर जुगारी वृत्ती किंवा व्यसनाधीनता येऊ शकते.

गुरूचा नवमांश: धनेश गुरूच्या नवमांशात असेल, तर व्यक्ती आपल्या उत्तम वाणीतून पैसा मिळवते. गुरु हा ज्ञानाचा महासागर आहे; त्यामुळे अशा व्यक्ती वायफळ बोलत नाहीत. तर्कशुद्ध आणि विचारमंथन करायला लावणारे विचार त्यांच्याकडे असतात. गुरु अध्यापन दर्शवतो, त्यामुळे शिक्षकी पेशा किंवा महाविद्यालयात नोकरीतून लाभ होतो. लोकांच्या मदतीमुळे समाजात मानसन्मान आणि लोकसंग्रह मिळतो. मूळ पत्रिकेतील गुरु बिघडला असेल, तर केवळ पोकळ डामडौल असू शकतो.

Gudi Padwa 2026 Date: गुढीपाडवा कधी? १८ की १९ मार्च? गुढी उभारण्याचा अचूक मुहूर्त एका क्लिकवर!

शनीचा नवमांश: नवमांशात शनी असल्यास व्यक्ती शांत आणि मोजके बोलणारी असते. शनी हा कष्टकरी वर्गाचा कारक असल्याने अथक परिश्रमातूनच अर्थार्जन होते. येथे काहीही सहज मिळत नाही. आर्थिक स्थिती हळूहळू उंचावते; एका रात्रीत श्रीमंती येत नाही. शनी वक्री असेल, तर अचानक धनलाभ होतो पण ते धन टिकत नाही.

अशा प्रकारे, नवमांश कुंडली आणि जन्मलग्न कुंडली यांचा एकत्रित अभ्यास करणे परिपूर्ण फकितासाठी आवश्यक असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Astrology: Navamsa chart and wealth: How your 'Dhanesh' impacts fortune.

Web Summary : Navamsa reveals how planets influence wealth. The placement of 'Dhanesh' (lord of wealth) in Navamsa, whether influenced by the Moon, Sun, Mars, Mercury, Venus, Jupiter, or Saturn, dictates financial prospects and personality traits impacting earnings.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष