Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 10:33 IST2026-01-01T10:31:47+5:302026-01-01T10:33:18+5:30
Astrology: नवे वर्ष २०२६ आज सुरु झाले आहे, त्यातच पुढील ३ वर्षे आनंदात घालवण्याची संधी त्रिवेणी योगावर मिळत आहे, त्याचा लाभ कसा घ्यावा ते पाहा.

Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
ज्योतिष शास्त्रानुसार, १ जानेवारी २०२६ हा दिवस इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा दिवस ठरणार आहे. ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांच्या मते, आज अशा काही तिथी आणि नक्षत्रांचा मिलाफ होत आहे जो गेल्या १००० वर्षांत कधीही झाला नाही. या दुर्मिळ योगाचा फायदा घेऊन तुम्ही तुमचे भाग्य तुमच्या बाजूने वळवू शकता.
१००० वर्षांनंतरचा अद्भुत 'त्रिवेणी योग'
आजच्या दिवशी द्वितीया, तृतीया आणि चतुर्थी या तीन तिथींचा तसेच कृतिका, रोहिणी आणि मृगशीर्ष या तीन नक्षत्रांचा असा विलक्षण संगम होत आहे, ज्याला 'त्रिवेणी योग' म्हटले जाते. हा योग इतका दुर्मिळ आहे की, पुढच्या १००० वर्षात तो पुन्हा येईल की नाही, याची खात्री नाही. हा काळ 'भाग्य सिद्ध' करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.
भाग्यसिद्धी मुद्रा: नशीब पालटणारी एक कृती
या त्रिवेणी योगाचा लाभ घेण्यासाठी आज दिवसभरात एकदा 'भाग्यसिद्धी मुद्रा' करणे आवश्यक आहे. ही मुद्रा केल्याने केवळ २०२६ हे वर्षच नाही, तर पुढची सलग तीन वर्षे तुमचे नशीब तुम्हाला खंबीर साथ देईल.
भाग्य सिद्धी मुद्रा :
ही मुद्रा अतिशय सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला दोन्ही हाताची मधली तीन बोटं फोटोत दाखवल्याप्रमाणे एकावर एक ठेवायची आहेत. ही मुद्रा कोणत्या वेळी करायची ते पाहू.
मुद्रा करण्याची पद्धत आणि वेळ:
वेळ: हा उपाय तुम्ही आज दुपारी ३:००, संध्याकाळी ६:०० किंवा रात्री ९:०० वाजता करू शकता.
कृती: शांत बसून भाग्यसिद्धी मुद्रा धारण करा.
विशेष नियम: ही मुद्रा धरल्यानंतर ३ वेळा डोळे मिचकावत (Blink करत) या मुद्रेकडे एकटक बघायचे आहे.
Swami Samartha: नवीन वर्षाच्या पाहिल्याच दिवशी घ्या स्वामींच्या 'या' मंत्राची दीक्षा!
याचे फळ काय मिळेल?
असे मानले जाते की, ज्याचे भाग्य बलवान असते, त्याचे कोणीही वाकडे करू शकत नाही. या एका साध्या पण प्रभावी कृतीमुळे-
१. तुमच्या कामातील अडथळे दूर होतील.
२. प्रलंबित कामे वेगाने मार्गी लागतील.
३. आर्थिक आणि मानसिक स्थैर्य लाभेल.
४. पुढील ३ वर्षे भाग्याची प्रबळ साथ लाभेल. पाहा व्हिडिओ -