Astro Tips: लवकर विवाह ठरावा आणि मनासारखे स्थळ यावे म्हणून शुक्रवारी करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 07:00 IST2025-12-19T07:00:00+5:302025-12-19T07:00:02+5:30

Astro Tips: वेळेत लग्न व्हावे, असे प्रत्येक विवहेच्छुकाला वाटते, मात्र लग्न ठरताना विविध अडचणी येत असतील तर दिलेले ज्योतिषीय उपाय करा आणि लाभ मिळवा.

Astro Tips: To get married soon and get to the place of your choice, do these remedies on Friday | Astro Tips: लवकर विवाह ठरावा आणि मनासारखे स्थळ यावे म्हणून शुक्रवारी करा 'हे' उपाय

Astro Tips: लवकर विवाह ठरावा आणि मनासारखे स्थळ यावे म्हणून शुक्रवारी करा 'हे' उपाय

तुमचे वैवाहिक जीवन कसे आहे यावर तुमचे करिअर यशस्वी होणार की नाही हे ही अवलंबून असते, असे एका सर्वेक्षणात आढळले आहे. व्यक्तिगत जीवनाचा व्यावसायिक जीवनाशी घनिष्ट संबंध असतो, असेही त्यात म्हटले आहे. सद्यस्थितीत लग्न जुळणे आणि लग्न टिकणे या दोन्ही गोष्टी जिकिरीच्या झाल्या आहेत. अशातच दुसऱ्यांचे लग्नाचे बार उडताना पाहून लग्नाळू मुला मुलींना घरच्यांकडून, नातेवाईकांकडून टोमणे ऐकावे लागतात हा भाग आणखीनच वेगळा. त्यामुळे  तुमचाही विवाह लवकर व्हावा असे वाटत असेल तर ज्योतिष शास्त्राने दिलेले तोडगे करा. 

ज्योतिषशास्त्रानुसार पती-पत्नीची ग्रहस्थिती बिघडणे, वास्तू दोष निर्माण होणे, परस्पर समजूतदारपणा नसणे यासह अनेक कारणे असू शकतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही सोपे तोडगे दिले आहेत, त्यांचा अवलंब केल्याने वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते.

>> तुमच्या वैवाहिक जीवनात एकाएक वादग्रस्त परिस्थिती उद्भवली असेल तर शुक्रवारी मातीच्या दिव्यात कापराचे दोन तुकडे टाका. दिवा प्रज्वलित करा.  यानंतर, संपूर्ण घरात दाखवा आणि तो दिवा बाहेर ठेवा. असे सलग काही दिवस सातत्याने करा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन वैवाहिक जीवनातील गोडवा पुन्हा वाढेल.

>> जोडीदाराची तब्येत वरचेवर बिघडत असेल, तर दर शुक्रवारी वाटीभर कणिक, डाळ, तांदूळ, गूळ असा कोरडा शिधा गरजू व्यक्तीला दान करा. त्याचे आशीर्वाद लाभतील आणि घराचे आजारपण दूर होईल. 

>> घरातील कलह दूर करण्यासाठी शुक्रवारी देवीच्या मंदिरात जाऊन तिची विधिवत पूजा करावी. खणा नारळाने ओटी भरावी. एखाद्या गरीब महिलेला शिधा, पैसे दान करावेत. तसे केल्याने देवीच्या आशीर्वादाने घरात सदैव सुख-शांती नांदते.

लग्नापूर्वी हे उपाय करा : 

>> जर तुम्ही चांगला जीवनसाथी शोधत असाल तर शुक्रवारी देवी, हनुमान यांच्याबरोबरच शुक्राचार्यांच्या या मंत्राचा १०८ वेळा जप करा - 'ॐ द्रं द्रीं द्रौंस: शुक्राय नमः' यासोबतच मंदिरात जाऊन यथाशक्ती दान करा. यामुळे तुम्हाला एक चांगला जीवनसाथी मिळेल आणि वैवाहिक जीवन आनंदी होईल.

>> रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून सूर्याला पेलाभर पाणी अर्थात अर्घ्य द्या. म्हणजेच सूर्याची बारा नावे म्हणत ते पाणी सूर्याच्या दिशेने पेल्यातून ताम्हनात टाका आणि ते पाणी तुळशीला घाला. 

>> मुलीचे वैवाहिक जीवन सुखी राहावे म्हणून लग्नात तिच्या पाठ्वणीच्या वेळी किंवा ती माहेरी आल्यावर तांब्याभर पाणी तिच्यावरून ओवाळून आड रस्त्यावरील एखाद्या झाडाला टाकावे. 

Web Title : ज्योतिष उपाय: शीघ्र विवाह और मनचाहे जीवनसाथी के लिए शुक्रवार के उपाय।

Web Summary : सुखी वैवाहिक जीवन के लिए ज्योतिषीय उपायों में कपूर के दीपक जलाना, जरूरतमंदों को दान करना और देवी लक्ष्मी की पूजा करना शामिल है। मनचाहे साथी और वैवाहिक आनंद के लिए मंत्रों का जाप करें और सूर्य को जल अर्पित करें।

Web Title : Astro Tips: Friday remedies for early marriage and desired partner.

Web Summary : For a happy married life, astrological remedies include lighting camphor lamps, donating to the needy, and worshipping Goddess Lakshmi. Chant mantras and offer water to the sun for desired partner and marital bliss.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.