Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 17:52 IST2025-05-17T17:51:04+5:302025-05-17T17:52:51+5:30

Astro Tips: पुरुषांनीं केर काढण्याचा आणि श्रीमंत होण्याचा परस्परसंबंध काय आहे? हे ज्योतिष अभ्यासकांकडून जाणून घेऊ!

Astro Tips: Men who clean the house with a broom become rich instantly; see how! | Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

स्वच्छता सगळ्यांना प्रिय असते पण ती ठेवण्याची तयारी सगळ्यांचीच असते असे नाही. सामाजिक दृष्ट्या पाहिले तर रस्ते असो वा प्रसाधनगृह ती आपल्याला स्वच्छच हवी असतात, पण व्यक्तिगतरित्या तिथे गेल्यावर आपण स्वच्छता किती पाळतो हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. तीच बाब घरातली! गृहिणीने घर स्वच्छ ठेवावे ही कुटुंबीयांची अपेक्षा असते, मात्र घरातले सदस्य त्या स्वच्छतेला किती हातभार लावतात हा प्रश्नच आहे! मात्र काही पुरुष अपवाद असतात!

Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!

काही पुरुषांना स्वच्छतेची, घरकामाची आवड असते, त्यामुळे ते स्वतः झाडूने केर काढण्यापासून घरातली धूळ झटकण्यापर्यंत सगळी कामे आनंदाने करतात. अशा लोकांबद्दल बोलतात ज्योतिष अभ्यासक अरुण कुमार व्यास सांगतात, 'जे लोक घरात केरसुणीने केर काढतात, ते सुखाने संसार करतात. त्यांच्याकडे सगळेच मंगलमय वातावरण असते. यामागचे मुख्य कारण हे, की हातात झाडू घेणे, स्वच्छता करणे हे मुळात अहंभाव विसरून समतेने वागवणे आहे. हे काम बायकांचे किंवा घरातल्या नोकरांचे आहे असे म्हणत दुय्य्मपणा न बाळगता आपणहून कामाला पुढाकार घेणे हे शुभ लक्षण आहे. ज्या घरात अहंकाराला स्थान नाही त्या घरात वाईट काहीच होऊ शकत नाही. 

झाडूने केर काढणे ही केवळ घराची स्वच्छता नाही तर मनाचीही स्वच्छता मानली जाते. अहंकाराची स्वच्छता मानली जाते. अशा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करूच शकत नाही. लक्ष्मी वास्तव्य करते. पैशांची आवक राहते आणि घरात वातावरण कायम छान राहते. 

त्यामुळे ज्यांना श्रीमंत व्हावेसे वाटते त्यांनी हातात झाडू घ्या, कामाला लागा आणि झटपट श्रीमंत व्हा असे ज्योतिष अभ्यासक सांगतात. 


Web Title: Astro Tips: Men who clean the house with a broom become rich instantly; see how!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.