Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 17:18 IST2025-05-16T17:17:44+5:302025-05-16T17:18:07+5:30
Astro Tips: वास्तुदोषाचे निराकरण होऊन आयुष्य सुखकर व्हावे म्हणून शनिवारी सायंकाळी दिलेले उपाय अवश्य करा.

Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
नवग्रहांमध्ये शनिवार हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण शनिवार हा शनिदेवाचा वार. त्यांची कृपादृष्टी असेल तर आयुष्यातील अनेक अडचणींना लढायचे बळ मिळते. शनी देवाला मनुष्याचा प्रामाणिकपणा, दानधर्म, नम्रता आणि सेवाभाव विशेष आवडतो. या सवयींबरोबर पुढील उपाय केले असता अडचणीतून मार्ग निघतो. यासाठी शनिवारी सायंकाळी पुढील उपाय करा. आर्थिक अडचणी, नोकरी-व्यवसायातील अडथळे, आरोग्याच्या समस्या इत्यादींवर मात करण्यासाठी शनिवारचे हे उपाय देखील खूप प्रभावी आहेत.
>>शनिवारी संध्याकाळी शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तेलात थोडे काळे तीळ टाका. या दोन्ही गोष्टी शनिदेवाला प्रिय आहेत.
>>शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने जीवनातील अडथळे आणि संकटे दूर होतात. हा उपाय खूप प्रभावी आहे. हा उपाय काही शनिवार सातत्याने केल्यास परिणाम दिसून येतो.
>>शनिदेवाला लोबान अतिशय प्रिय आहे. शनिवारी रात्री घरामध्ये धूप जाळल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातील कलह संपतो. घरातील लोकांसाठी प्रगतीचा मार्ग खुला होतो, घरात पैशाची आवक वाढते आणि आरोग्यही चांगले राहते.
>>शनिदेवाला श्वान प्रिय आहे. त्यामुळे दररोज जेवणाआधी आणि विशेषतः शनिवारी कुत्र्याला भाकरी खाऊ घाला. यामुळे शनिदेवाची कृपा तर मिळेलच, पण कुंडलीत राहू-केतू दोष असतील तर तेही दूर होतील.
>>शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली पंचदिप लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात धन, कीर्ती आणि वैभवाची कमतरता नसते.
>>शनिवारी हनुमंताची पूजा केल्यानेदेखील शनिदेव प्रसन्न होतात. हनुमान चालीसा तसेच नवग्रह स्तोत्राचे शनिवारी पठण केल्यास विशेष लाभ होतो.