Astro Tips: रोज सायंकाळी जवसाच्या तेलाचा दिवा लावा; लक्ष्मी मातेबरोबर शनी देवाचाही आशीर्वाद मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 15:46 IST2024-03-26T15:45:45+5:302024-03-26T15:46:05+5:30
Astro Tips: मोहरी आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जात असले, तरी जवसाच्या तेलाचा दिवा लावणेही फायदेशीर मानले जाते.

Astro Tips: रोज सायंकाळी जवसाच्या तेलाचा दिवा लावा; लक्ष्मी मातेबरोबर शनी देवाचाही आशीर्वाद मिळवा!
रोज सायंकाळी आपण देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावतो. हा दिवा केवळ देवघर किंवा आपले अंगण प्रकाशित करतो असे नाही, तर दिव्याच्या छोट्याशा ज्योतिमध्ये आपल्या मनातील, वास्तु मधील नाकारत्मकता दूर करण्याची शक्ति असते. म्हणून दिवा लावणे हे शुभ लक्षण मानले जाते. त्यातच ज्योतिष शस्त्राने एक खास उपाय सांगितला आहे, जो केला असता आपल्याला त्याचे सकारात्मक लाभ अनुभवता येतात. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
हिंदू धर्मात दिवा लावणे फार महत्वाचे मानले जाते. दिवा लावणे हे देवी-देवतांचे आवाहन करण्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे दिवा लावताना कोणते तेल वापरायचे हे निवडणे महत्त्वाचे आहे. मोहरी आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जात असले, तरी जवसाच्या तेलाचा दिवा लावणेही लाभदायक मानले जाते. मात्र, जवसाच्या तेलाचा दिवा लावताना त्याची दिशा किंवा स्थान लक्षात घेणे आवश्यक आहे.
जवसाच्या तेलाचा दिवा लावल्याने काय होते?
जवस हे माता लक्ष्मीचे आवडते मानले जाते. अशा स्थितीत जवसाच्या तेलाचा दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. घरात माता लक्ष्मी वास करते. घराची आर्थिक स्थिती सुधारू लागते आणि कर्ज, गरिबी, अतिरिक्त खर्च इत्यादी समस्यांपासून मुक्ती मिळते.
याशिवाय आर्थिक लाभाची संधी निर्माण होऊ लागते. संपत्तीचे नवे मार्ग खुले होतात. संपत्ती वाढते. नोकरीत प्रगती होते. याशिवाय व्यवसायातही नफा होतो. व्यवसायही भरभराटीला येऊ लागतो. जीवनात विविध क्षेत्रात प्रगती करताना यश प्राप्ती होते.
घरात जवसाच्या तेलाचा दिवा कुठे लावावा?
घराच्या पश्चिम आणि पूर्व दिशेला जवसाच्या तेलाचा दिवा लावावा. पश्चिम दिशा ही लक्ष्मी आणि शनिदेवाची मानली जाते. अशा स्थितीत या दिशेला जवसाच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदोषापासून आराम मिळतो. शनिदेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊ लागतात.
याशिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, घराच्या मंदिराच्या खोलीत आणि तुळशीच्या रोपाजवळ जवसाचा दिवा लावू शकता. या ठिकाणी जवसाच्या तेलाचे दिवे लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि संपत्तीच्या आड येणारे दोष दूर होतात. ग्रह दोषही नष्ट होतात.