Astro Tips: 'शुक्र' बलवान करायचा असेल तर रोज सकाळी घराबाहेर पडताना खा 'हा' पदार्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:30 IST2025-04-04T13:30:30+5:302025-04-04T13:30:51+5:30

Astro Tips: शुक्र हा भौतिक सुखाचा कारक आहे, ज्याचा शुक्र बलवान त्याला सुख, संपत्ती, ऐश्वर्य मिळणारच; त्यासाठी हा उपाय ठरेल लाभदायी. 

Astro Tips: If you want to strengthen 'Venus', eat 'this' food every morning when you leave the house! | Astro Tips: 'शुक्र' बलवान करायचा असेल तर रोज सकाळी घराबाहेर पडताना खा 'हा' पदार्थ!

Astro Tips: 'शुक्र' बलवान करायचा असेल तर रोज सकाळी घराबाहेर पडताना खा 'हा' पदार्थ!

संसारी माणूस म्हटला की त्याला भौतिक सुखाची इच्छा असणारच! भौतिक सुख म्हणजे काय? तर घर, बंगला, गाडी, पैसा, संपत्ती आणि उत्तम जोडीदार व संतती! थोडक्यात सगळंच! हे मिळण्यासाठी कोणाला आयुष्य खर्च करावं लागतं तर कोणी जन्माला येतानाच चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतं. आपण पहिल्या गटात मोडत असू तर भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी कोणते उपाय प्रभावी ठरतात, ते ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊ. 

काही लोकांच्या कुंडलीत शुक्र उच्चीचा असतो. अशा लोकांना पैशांची उणीव भासत नाही. कला क्षेत्रात ते नाव कमावतात. त्यांचे वैवाहिक जीवन चांगले असते. संतती सौख्य लाभते. प्रसिद्धी मिळते, ते लोकप्रियदेखील होतात. अशा लोकांच्या कुंडलीत शुक्र त्यांच्यावर कृपावंत असतो असे समजावे. 

Vastu Shastra: तुळशीभोवती 'या' चुकीच्या गोष्टी असतील, तर वास्तू दोष निर्माण होणारच!

याउलट ज्यांच्या आयुष्यात नुसता संघर्ष असतो, मग तो आर्थिक, मानसिक, शारीरिक सुखासाठी असेल तर ते लोक भौतिक सुख मिळावे म्हणून आसुसलेले असतात. आपले नशीब बदलणार की नाही या विवंचनेत असतात. आपल्या प्रयत्नांना कधी यश मिळेल याची वाट ते बघत असतात. अशा लोकांवरही 'शुक्र' मेहरबान होऊ शकतो. ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या सांगायचे तर शुक्र अनुकूल व्हावा म्हणून उपाय केला, तर कुंडलीतील इतर ग्रहांना शुक्राचे पाठबळ मिळते, परिणामी संबंधित व्यक्तीच्या जीवनात प्रेम, पैसा, प्रसिद्धी याची उणीव राहत नाही. 

तर शुक्र बलवान व्हावा म्हणून काय करता येईल? (Astro tips to make powerful Venus)

ज्योतिष अभ्यासकी शिरीष कुलकर्णी यावर सोपा पण प्रभावी उपाय सांगतात, तो म्हणजे वेलचीचा! वेलची ज्याप्रमाणे गोड पदार्थाची चव, सुगंध आणि लज्जत वाढवते, त्याप्रमाणे रोज सकाळी घराबाहेर पडताना एका वेलचीचे केलेले सेवन आपल्या आयुष्यातील गोडी वाढवू शकते. 

Swami Samartha: स्वामींचा 'हा' मंत्र घराच्या भिंतीवर लिहून काढा; कायमस्वरूपी तणावमुक्त व्हाल!

पैसा पैशांना आकर्षित करतो, हे आपणही कुठेतरी वाचले असेलच. वेलची विकत घेणे आणि रोज खाणे हे मुळातच श्रीमंतीचे लक्षण आहे. काही दिवस खिशाला ते परवडणार नाही, मात्र या उपायाने पैसा आकर्षित होईल, असा त्यामागील अर्थ असू शकेल. त्यामुळे छोटासा वाटणारा तरी प्रभावी असणारा हा तोडगा नक्कीच वापरून बघा. याबरोबरच नीटनेटके, स्वच्छ राहा. अत्तर, परफ्युम वापरा, घर स्वच्छ ठेवा, या गोष्टी लक्ष्मी मातेला प्रिय असल्यामुळे ती तुमच्यावर कृपावंत झाल्याशिवाय राहणार नाही!


Web Title: Astro Tips: If you want to strengthen 'Venus', eat 'this' food every morning when you leave the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.