Astro Tips: कर्जबाजारी होण्याची वेळच येऊ नये म्हणून ज्योतिष शास्त्राने दिलेले 'हे' उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:07 IST2025-05-02T11:07:26+5:302025-05-02T11:07:49+5:30

Astro Tips: ज्योतिष शास्त्रात काही तोडगे दिले आहेत, जे आपल्या दिनचर्येचा भाग बनवले तर आरोग्य, धन, संपत्ती यांची वास्तूमध्ये उणीव भासत नाही. 

Astro Tips: Follow these remedies given by astrology to avoid getting into debt! | Astro Tips: कर्जबाजारी होण्याची वेळच येऊ नये म्हणून ज्योतिष शास्त्राने दिलेले 'हे' उपाय करा!

Astro Tips: कर्जबाजारी होण्याची वेळच येऊ नये म्हणून ज्योतिष शास्त्राने दिलेले 'हे' उपाय करा!

घरात आपण गृहव्यवस्थेचा एक भाग म्हणून विविध नियम पाळतो. ज्योतिष शास्त्राने त्यातच काही असे तोडगे सुचवले आहेत, जे केले असता आपली वास्तू सुख-संपत्ती-आरोग्याने परिपूर्ण राहते. ते उपाय कोणते ते जाणून घेऊ. 

१) दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राह्ते.

२) 'यश्च्याय कुबेराय वैष्णवाय, धन – धान्यधिपतये धन – धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा!' ऊत्त्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा. हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा १०८ वेळा  जप करावा.

३) एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाउन १ किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून “हनुमान स्तोत्र ११वेळा म्हणावे. अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल. 

४ ) कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे.पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील.

५) दर पौर्णिमेला रात्री बारानंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात, आर्थिक अडचण कधी उद्‍भवणार नाही.

६ ) घरातील फरशी पुसताना थोडे खडे मिठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नाकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मीप्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील.

७ )घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तसवीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ  येणार नाही.

८) ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ ( नारळ ) कुंकु अर्पण करुन विसर्जीत करा नफा 
हेच त्याचे सुत्र

९) खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका. मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा. परिणाम लक्ष्मी स्थिर होते.

१०) अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्रौ दही+भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकु टाकावी व तो कागद मोरीच्या धक्क्यावर वर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचर्‍यात टाकून द्यावे. परीणाम आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुखसमृद्धी लाभते. घरात आनंदी वातावरण निर्माण होते.

११) रोज रात्री जेवताना  अन्नाचा घास बाजूला काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे परिणाम आपले वास्तू पुरूष व आपले वास्तू दैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाहीत.

१२) प्रत्येक शनिवारी व अमावास्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरठ्यावर ओढावा. परिणाम नकारात्मक शक्ति घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून वाईट शक्ति आत येऊ शकत नाही.

Web Title: Astro Tips: Follow these remedies given by astrology to avoid getting into debt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.