Astro Tips: पुनर्वसू नक्षत्रावर खरेदी वा गुंतवणूक म्हणजे दुप्पट लाभ; जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:00 IST2025-05-29T13:00:28+5:302025-05-29T13:00:54+5:30

Astro Tips: आर्थिक, प्रापंचिक सुखात वाढ करणारे पुनर्वसू नक्षत्र २९-३० मे रोजी आहे आणि डिसेंबरपर्यंत ते कोणत्या तारखांना येणार आहे, त्याची नोंद करून घ्या!

Astro Tips: Buying or investing in Punarvasu Nakshatra means double profit; Know the date and auspicious time! | Astro Tips: पुनर्वसू नक्षत्रावर खरेदी वा गुंतवणूक म्हणजे दुप्पट लाभ; जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त!

Astro Tips: पुनर्वसू नक्षत्रावर खरेदी वा गुंतवणूक म्हणजे दुप्पट लाभ; जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

पुनर्वसू म्हणजे पुन्हा पुन्हा वसवणे ,स्थापन करणे.  पुनर्वसू नक्षत्र म्हणजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. अशा स्वभावाचे म्हटले तरी वावगे ठरू नये. या नक्षत्राची देण्याची वृत्ती अधिक आहे. असे म्हणतात की विवाह वगळता अन्य कोणतेही शुभ कार्य या नक्षत्रावर केले तर ते पुनः पुनः घडत राहते. म्हणून या नक्षत्रावर घर, गाडी, भौतिक वस्तूंची खरेदी लाभदायी ठरते. 

June Astro 2025: जूनमध्ये बुधादित्य राजयोगात 'या' पाच राशींचे नशीब झळकणार, आर्थिक अडचणी दूर होणार!

आयुष्यात आनंद देणाऱ्या घटना ज्या पुन्हा अनुभवायला आवडतील, जसे घर खरेदी, परदेशगमन, वास्तू, वाहन, जमीन विकत घेणे, दागिने, FD करणे ह्या गोष्टी ह्या नक्षत्रावर कराव्यात ज्या पुन्हा पुन्हा होतील. विवाहाला हे नक्षत्र वर्जित आहे. विवाह म्हणजे शुक्र आणि गुरु अध्यात्म मोक्ष त्यामुळे ह्या नक्षत्रावर विवाह करू नये . एखादी सर्जरी केली तर पुन्हा होईल म्हणून तीही करू नये.
 
२०२५ सालातील पुनर्वसू नक्षत्र ज्या दिवशी आहे त्यांचे दिवस आणि वेळ देत आहे म्हणजे त्या दिवसाचा उपयोग तुम्ही चांगल्या कामासाठी करू शकता. जसे की  एखादा संकल्प करणे, दानधर्म करणे, घर वाहन दागिने खरेदी वगैरे .

Astrology: व्यवसाय करावा तो 'या' राशीच्या लोकांनी; मिळतो बक्कळ पैसा, प्रसिद्धी आणि अमाप यश!

२९ मे     -    रात्री १०.३८ ते ३० मे रात्री ९.२८ पर्यंत २६ 
२६ जून  -    सकाळी ८.४६ ते २७ जून सकाळी ७.२१ पर्यंत 
२३ जुलै  -    संध्याकाळी ५.५४ ते २४ जुलै संध्याकाळी ४.४३ पर्यंत 
२० ऑगस्ट - पहाटे १.०७ ते २२ ऑगस्ट १२.२७ ( मध्यरात्री ) पर्यंत 
१६ सप्टेंबर  - सकाळी ६.४६ ते १७ सप्टेंबर सकाळी ६.२५ पर्यंत 
१३ ऑक्टोबर - दुपारी १२.२६ ते १४ ऑक्टोबर सकाळी ११.५३ पर्यंत  
९ नोव्हेंबर  - रात्री ८.०४ ते १० नोव्हेंबर संध्याकाळी ६.४७ पर्यंत 
७ डिसेंबर  - सकाळी ६.१३ ते ८ डिसेंबर  पहाटे४.११ पर्यंत

पुनर्वसू ह्या गुरूच्या शुभ पवित्र नक्षत्रावर आपल्या कुलस्वामिनी, सद्गुरू, इष्ट देवतेचे नामस्मरण सुरु करावे म्हणजे ते पुन्हा पुन्हा होत राहील. कुठल्याही शुभ गोष्टी वृद्धिंगत व्हाव्यात हीच सदिच्छा!

संपर्क : 8104639230

Web Title: Astro Tips: Buying or investing in Punarvasu Nakshatra means double profit; Know the date and auspicious time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.