Astro Tips: साडेसातीचा ताप कमी व्हावा म्हणून 'या' तीन राशीच्या लोकांनी करावे असे ज्योतिष शास्त्रीय तोडगे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 03:24 PM2024-04-18T15:24:21+5:302024-04-18T15:24:54+5:30

Astro Tips: साडेसातीचा काळ म्हणजे शनिदेवांचा परीक्षा बघण्याचा काळ, या काळात साडेसातीचा त्रास कमी व्हावा म्हणून दिलेले उपाय करा. 

Astro Tips: Astrological solutions that people of these three zodiac signs should do to reduce the fever of the seven and a half hours! | Astro Tips: साडेसातीचा ताप कमी व्हावा म्हणून 'या' तीन राशीच्या लोकांनी करावे असे ज्योतिष शास्त्रीय तोडगे!

Astro Tips: साडेसातीचा ताप कमी व्हावा म्हणून 'या' तीन राशीच्या लोकांनी करावे असे ज्योतिष शास्त्रीय तोडगे!

शनिदेवाला न्याय देवता मानले जाते. ही देवता प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शुभ-अशुभ फल देते. शनिदेव माणसाला रंकाचा राव आणि रावाचा रंक बनवू शकतात. त्यामुळे त्यांना प्रसन्न करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार साडेसाती दरम्यान व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर साडे सतीचा प्रभाव आहे. तर मीन राशीत शनीच्या साडे सातीचे पहिले चरण सुरू आहे.

२९ एप्रिल २०२२ पासून मीन राशीत साडे साती सुरू झाली आहे. आता अशा परिस्थितीत साडेसातीच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी अनेक प्रकारचे उपायही सांगण्यात आले आहेत. हे उपाय बाराही राशीच्या लोकांसाठी उपयुक्त आहेत. मात्र साडेसाती सुरु असल्याने वर दिलेल्या तीन राशीच्या लोकांनी ते आवर्जून करावेत. 

मीन राशीच्या लोकांना साडे सातीपासून मुक्ती कधी मिळणार?

ज्योतिषशास्त्रानुसार शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो आणि अडीच वर्षांनी त्याची राशी बदलते. साडेसातीचा एक टप्पा अडीच वर्षांचा मानला जातो. सध्या मीन राशीत साडे सातीचा पहिला टप्पा सुरू असून तो २९ मार्च २०२५ पर्यंत चालेल. यानंतर साडे सातीचा दुसरा टप्पा सुरू होईल. पंचांगानुसार ०७ एप्रिल २०३० रोजी मीन राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल.

साडेसातीच्या पहिल्या चरणाचा प्रभाव जाणून घ्या

ज्योतिष शास्त्रात शनीच्या सडे सतीच्या पहिल्या चरणामुळे मानसिक तणाव, रोग, भीती आणि आर्थिक जीवनात समस्या येतात. त्यामुळे या सर्व समस्या टाळण्यासाठी शनिदेवाची पूजा करावी.

साडे सती टाळण्यासाठी उपाय काय?

>> मीन राशीच्या लोकांनी शनीची साडेसाती टाळण्यासाठी गरजूंना दान करावे.
>> या राशीच्या लोकांनी दररोज भगवान शंकराची पूजा करावी आणि जलाभिषेकही करावा.
>>साडेसातीचा प्रकोप टाळण्यासाठी कर्म दाता शनिदेवाची यथोचित पूजा करावी. यासोबतच घरामध्ये शनियंत्राची स्थापना करा.

ज्योतीष शास्त्रीय उपाय :

>> पिंपळाच्या झाडाला रोज पाणी द्यावे.
>> मीन राशीच्या लोकांनी हनुमान चालीसा वाचावी.
>> या राशीचे लोक नीलम रत्न घालू शकतात.
>> साडेसाती टाळण्यासाठी रोज संध्याकाळी शमीच्या झाडाची पूजा करावी.

Web Title: Astro Tips: Astrological solutions that people of these three zodiac signs should do to reduce the fever of the seven and a half hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.