Astro Tip: तुमच्याच कर्माचा आरसा म्हणजे 'महादशा'! ग्रहांची सत्ता आणि मानवी आयुष्याचे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 07:00 IST2026-04-08T07:00:01+5:302026-04-08T07:00:02+5:30
Astro Tip: पत्रिकेतील महादशा आपल्या आयुष्यात विविध टप्प्यावर अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, विशेषतः विवाह संदर्भात पत्रिका जुळवताना ती पाहिली पाहिजे!

Astro Tip: तुमच्याच कर्माचा आरसा म्हणजे 'महादशा'! ग्रहांची सत्ता आणि मानवी आयुष्याचे सत्य
ज्योतिषशास्त्रामध्ये पत्रिकेचा अभ्यास करताना 'महादशा' हा अत्यंत कळीचा मुद्दा असतो. महादशा म्हणजे पत्रिकेचे हृदय! ज्याप्रमाणे एखादा राजा आपल्या कार्यकाळात राज्यावर राज्य करतो, अगदी त्याचप्रमाणे महादशेचा स्वामी ग्रह त्या ठराविक कालखंडात तुमच्या आयुष्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवतो. घटना त्याच्याच मर्जीने घडतात, म्हणूनच याला 'दशास्वामीची राजमंदी' म्हटले जाते. याचा परिणाम आपल्या आयुष्यावर कसा होतो याबाबत ज्योतिष अभ्यासक अस्मिता दीक्षित यांनी केलेले मार्गदर्शन जाणून घेऊ.
हे ही वाचा : Numerology: 'या' जन्मतारखेच्या लोकांकडे असते समोरच्याचं मन वाचण्याची दैवी शक्ती!
१. महादशा म्हणजे काय?
जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या ग्रहाची दशा तिथून सुरू होते आणि पुढे दशांचा क्रम ठरलेला असतो. प्रत्येक ग्रहाला एक विशिष्ट कालखंड दिलेला आहे. हा काळ तुमच्या आयुष्यात चांगले किंवा वाईट परिणाम घडवून आणतो.
२. ग्रहांच्या महादशा आणि त्यांचे प्रभाव (काही महत्त्वाचे अनुभव)
राहूची दशा (१८ वर्षे): राहू जीवनातील सत्य समोर आणतो. 'आपले' म्हणणारे लोक सोडून जातात, फसवणूक, बदनामी किंवा आर्थिक नुकसान होऊ शकते. पण हाच राहू ६ व्या भावात असेल तर नोकरी-धंद्यात प्रगती देतो, तर ९ किंवा १२ व्या भावात परदेशगमनाचे योग आणतो.
शनीची दशा: शनी तुम्हाला तुमचे अस्तित्व दाखवतो. इथे 'शॉर्टकट' चालत नाही; प्रचंड कष्ट करावे लागतात. शनी जर नीच राशीत असेल तर त्रासाची तीव्रता वाढते.
बुधाची दशा: या काळात सावध राहावे. विशेषतः कागदपत्रांवर सही करताना, जामीन राहताना विचार करावा. बुधाच्या दशेत पोलीस ठाणे किंवा कोर्टाची पायरी चढावी लागल्याचे अनेक अनुभव आहेत.
गुरूची दशा: गुरूच्या दशेत जातकाचे वजन वाढण्याची शक्यता असते. इथे जिभेवर ताबा (बोलणे आणि खाणे दोन्हीवर) असणे गरजेचे आहे. राहूच्या १८ वर्षांच्या संघर्षानंतर गुरूची दशा एका आशेचा किरण घेऊन येते.
चंद्राची दशा: चंद्र हा मनाचा कारक आहे. जर चंद्र दूषित असेल तर मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. आईच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.
हे ही वाचा : Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
३. विवाह आणि महादशेचे महत्त्व
आजकाल विभक्त होण्याचे किंवा वैचारिक मतभेदांचे प्रमाण वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे केवळ 'गुणमिलन' बघणे. लेखिका सौ. अस्मिता दीक्षित यांच्या मते, विवाह करताना गुणमिलनापेक्षा 'दशा' पाहणे १०००००% जास्त महत्त्वाचे आहे. लग्नाच्या वेळी चांगली दशा असेल तर लग्न जमते, पण त्यानंतर जर ६ किंवा ८ व्या भावाची वाईट दशा लागली तर सुखावर विरजण पडू शकते.
४. कर्माचा आरसा
ग्रहांचे फलित म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्याच 'कर्माचा आरसा' असतो. ग्रह ज्या नक्षत्रात असतो, त्याचे फळ तो प्रकर्षाने देतो. उच्च शिक्षण, संतती, परदेशगमन किंवा नोकरीतील बदल - हे सर्वस्वी त्या वेळच्या दशास्वामीच्या अधिकारात असते.
हे ही वाचा : Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
५. महत्त्वाचे काही योग
वृषभ आणि तूळ लग्नाला गुरूची दशा सहसा फलदायी ठरत नाही.
तृतीय आणि दशम भाव वास्तू बदल किंवा पुनर्विकासाचे संकेत देतात.
व्यय भावातील शुक्र युरोप-अमेरिकेसारख्या देशांत दीर्घकाळ वास्तव्य घडवून आणतो.
सारांश: तुमच्या आयुष्यात नेमकी कोणती घटना कधी घडणार, हे दशास्वामी ठरवतो. म्हणून मोठी गुंतवणूक, विवाह किंवा करियरमधील मोठे निर्णय घेताना आपली 'दशा' कशी आहे हे पाहणे अपरिहार्य आहे. दशा तुमच्या जीवनाची 'दशा' करू नये, यासाठी ज्योतिषीय अभ्यास आणि सावधगिरी महत्त्वाची आहे.