ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राचा एक अद्भुत संयोग आज जुळून आला आहे. आज ६ फेब्रुवारी, म्हणजेच शुक्राचा अंक आणि त्यातच महिन्यातील पहिला शुक्रवार! हा योग आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीसाठी अत्यंत दुर्मिळ मानला जातो. ज्योतिष अभ्यासक यशदा क्षीरसागर यांनी सांगितलेला मिठाचा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यात कसा बदल घडवू शकतो, याची माहिती दिली आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात नशिबाचे धनी; आयुष्यभर लाभतं अमाप सुख-समाधान!
शुक्रवार हा लक्ष्मीचा वार आणि ज्योतिषशास्त्रानुसार समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या सर्व वस्तूंमध्ये माता लक्ष्मीचा अंश असतो. मीठ हे समुद्रातून मिळते, त्यामुळे त्यात प्रचंड आकर्षण शक्ती आणि नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते. आज ६ फेब्रुवारी, म्हणजे 'शुक्राचा' खास दिवस असल्यामुळे हा मिठाचा उपाय 'मॅजिकल' रिझल्ट देऊ शकतो.
मिठाचा 'तो' प्रभावी उपाय कसा करावा?
यशदा क्षीरसागर यांनी सुचवलेली ही पद्धत अत्यंत सोपी पण तितकीच शक्तिशाली आहे. हा उपाय आज दिवसभरात कधीही आपल्याला करता येईल.
१. साहित्य: आपल्या स्वयंपाकघरातील साधे मीठ. २. कृती: आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर मिठाची एक चिमूट घ्या. ३. संकल्प (Affirmation): त्या मिठाकडे एकटक पाहत मनापासून सकारात्मक विचार करा आणि खालील वाक्य तीन वेळा म्हणा:"I welcome abundance and prosperity into my life" (अर्थ: मी माझ्या आयुष्यात समृद्धी आणि भरभराटीचे स्वागत करतो/करते.) ४. विसर्जन: हे वाक्य तीनदा म्हणून झाल्यावर घराबाहेर जा आणि हातातील ते मीठ चारही दिशांना फुंकून टाका. ५. भाव: हा उपाय करताना मनात पूर्ण विश्वास ठेवा की, तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होत आहेत.
हा उपाय आजच का करावा?
अंक ६ चा प्रभाव: ६ हा अंक शुक्राचा (Venus) आहे, जो विलास, ऐश्वर्य आणि सौंदर्याचा कारक आहे.
महिन्यातील पहिला शुक्रवार: कोणत्याही महिन्याचा पहिला शुक्रवार हा नवीन सुरुवातीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो.
आकर्षण शक्ती: मीठ हे आपल्या शब्दांमधील उर्जेला शोषून घेते. जेव्हा तुम्ही 'Abundance' (समृद्धी) म्हणता, तेव्हा ती ऊर्जा विश्वात पसरते आणि शुभ फल देते.
औदुंबर पंचमी: साक्षात कल्पवृक्षाच्या पूजेचा दिवस; 'या' पद्धतीने करा साधना, मिळेल गुरूंचा आशीर्वाद
Web Summary : Astrology suggests a simple salt remedy on February 6th can boost prosperity. Hold a pinch of salt, affirm abundance, and blow it outwards. This Friday's Venus alignment amplifies the ritual's power for financial gains and positivity, removing obstacles.
Web Summary : ज्योतिष के अनुसार, 6 फरवरी को नमक का एक सरल उपाय समृद्धि बढ़ा सकता है। चुटकी भर नमक लें, समृद्धि की पुष्टि करें, और इसे बाहर की ओर उड़ा दें। इस शुक्रवार का शुक्र संरेखण वित्तीय लाभ और सकारात्मकता के लिए अनुष्ठान की शक्ति को बढ़ाता है, बाधाओं को दूर करता है।