Astro Tip: ३ मिनिटांची जादू! ब्रह्ममुहूर्तावर 'असे' करा ध्यान आणि २१ दिवसांत अनुभवा स्वप्नपूर्तीचा चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:58 IST2026-02-09T12:57:23+5:302026-02-09T12:58:30+5:30

Astro Tip: सलग २१ दिवस, ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी दिलेली ३ मिनिटं तुमचं आयुष्य बदलतील आणि इच्छापूर्तीही करतील, त्याचा उचित विधी जाणून घेऊ. 

Astro Tip: 3 minutes of magic! Do this meditation during Brahma Muhurta and experience the miracle of dream fulfillment in 21 days | Astro Tip: ३ मिनिटांची जादू! ब्रह्ममुहूर्तावर 'असे' करा ध्यान आणि २१ दिवसांत अनुभवा स्वप्नपूर्तीचा चमत्कार

Astro Tip: ३ मिनिटांची जादू! ब्रह्ममुहूर्तावर 'असे' करा ध्यान आणि २१ दिवसांत अनुभवा स्वप्नपूर्तीचा चमत्कार

ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही ऋषीमुनींच्या काळापासून 'देवतांची वेळ' मानली गेली आहे. या काळात निसर्ग आणि मानवी मन यांचा समन्वय साधणे अत्यंत सोपे असते. या कालावधीत फक्त तीन मिनिटे तुमच्या आयुष्याचा कायापालट कशी करू शकतात, कसा ते जाणून घेऊ. 

Kalashtami: घराबाहेर जाईल इडा-पिडा; आज कालाष्टमीच्या सायंकाळी उंबरठ्यावर ठेवा तिळाचा दिवा!

आपल्यापैकी प्रत्येकाची काही स्वप्ने असतात, काही इच्छा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी आपण जीवापाड मेहनत करतो. पण कष्टाला जेव्हा आध्यात्मिक आणि वैश्विक ऊर्जेची (Universal Energy) जोड मिळते, तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. स्वप्नशास्त्र आणि अध्यात्मात 'ब्रह्ममुहूर्त' हे अशाच ऊर्जेचे भांडार मानले जाते.

ब्रह्ममुहुर्ताची ३ मिनिटं :

ब्रह्ममुहूर्ताची वेळ साधारण पहाटे ४ वाजल्यापासून सुरू होते, पण त्यातील ३ वाजून ४० मिनिटे ते ३ वाजून ४३ मिनिटे हा कालावधी 'गोल्डन मिनिट्स' मानला जातो. या ३ मिनिटांत:

सृष्टीशी जोडणी: मानवी मनाची शक्ती थेट ब्रह्मांडाच्या शक्तीशी जोडलेली असते.

शांत मन: या वेळी वातावरण अत्यंत शांत असते, ज्यामुळे मनाची एकाग्रता सर्वोच्च पातळीवर असते.

ऊर्जेचा प्रवाह: निसर्गात या तीन मिनिटांत प्राणवायू आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सर्वाधिक वेगवान असतो.

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीपूर्वी ७ दिवस करा 'हा' उपाय; अनुभवा महादेवाच्या शक्तीचा चमत्कार!

२१ दिवसांचा 'मॅनिफेस्टेशन' विधी

मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्या मनातली इच्छा विश्वाकडे सोपवणे. हा विधी कसा करावा? 
१. पहाटे उठा: ३:४० वाजण्यापूर्वी तयार होऊन शांत जागी बसा. 
२. ध्यान (Meditation): डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या आणि मन शांत करा. 
३. इच्छा प्रकट करा (Manifestation): ३:४० ते ३:४३ या वेळात तुमची जी काही इच्छा आहे (उदा. नोकरी, आरोग्य, यश), ती पूर्ण झाली आहे असा विचार करा. मनातल्या मनात ती इच्छा विश्वाला सांगा. 
४. सातत्य: हा प्रयोग सलग २१ दिवस न चुकता करा.

Valentine Week 2026: 'या' जन्मतारखांचे लोक असतात 'मेड फॉर इच अदर'; व्हॅलेंटाईन वीक निमित्त खास उलगडा

२१ दिवसांचाच नियम का?

मानसशास्त्रानुसार, कोणत्याही नवीन सवयीला मेंदूमध्ये रुजण्यासाठी २१ दिवस लागतात. जेव्हा तुम्ही २१ दिवस एकाच वेळी, एकाच तीव्रतेने तुमची इच्छा प्रकट करता, तेव्हा विश्वातील शक्ती ती पूर्ण करण्यासाठी मार्ग खुले करू लागतात. यालाच 'इच्छापूर्तीचे द्वार' उघडणे असे म्हणतात. 

Web Title : ज्योतिष उपाय: ब्रह्म मुहूर्त में 21 दिनों में अपने सपनों को साकार करें।

Web Summary : ब्रह्म मुहूर्त के सुनहरे मिनटों (3:40-3:43 पूर्वाह्न) की शक्ति का उपयोग 21 दिनों तक करें। ध्यान करें, अपनी इच्छाओं की कल्पना करें, और लगातार उन्हें ब्रह्मांड में प्रकट करें ताकि इच्छा पूरी हो सके।

Web Title : Astro Tip: Manifest your dreams in 21 days with Brahma Muhurta.

Web Summary : Harness the power of Brahma Muhurta's golden minutes (3:40-3:43 AM) for 21 days. Meditate, visualize your desires, and consistently manifest them to the universe for wish fulfillment.