Ashadhi Ekadashi: लोकमत ‘अभंगरंग’मध्ये आज बाबा महाराज सातारकर याचं कीर्तन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 06:47 IST2020-07-01T03:27:08+5:302020-07-01T06:47:33+5:30
लोकमत फेसबुक आणि लोकमत यू-ट्युब चॅनलवरून या संगीतमय वारीत सहभागी होऊन घरबसल्या पंढरीचे सुख अनुभवता येणार आहे.

Ashadhi Ekadashi: लोकमत ‘अभंगरंग’मध्ये आज बाबा महाराज सातारकर याचं कीर्तन
मुंबई : आषाढी एकादशीला बुधवारी अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय होणार आहे. त्यानिमित्ताने कीर्तनकार आणि प्रवचनकार बाबा महाराज सातारकर ‘पंढरीची वारी अन् श्री विठ्ठल लोकदेव महाराष्ट्राचा’ यांचे दर्शन ‘लोकमत’च्या ‘अभंगरंग’ या लाईव्ह कार्यक्रमातून घडविणार आहेत.
त्याचप्रमाणे गायक मंगेश बोरगावकर आणि गायिका सावनी रविंद्र हे सुश्राव्य अभंग गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. अभिनेत्री सिद्धी पाटणे कार्यक्रमाची निवेदिका असेल. संध्याकाळी पाच वाजता लोकमत फेसबुक आणि लोकमत यू-ट्युब चॅनलवरून या संगीतमय वारीत सहभागी होऊन घरबसल्या पंढरीचे सुख अनुभवता येणार आहे.
कधी : १ जुलै रोजी, संध्याकाळी ५ वाजता
नोंदणी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://bit.ly/Lokmat_Ashadhiwari
अधिक माहितीसाठी संपर्क करा shruti.chitari@lokmat.com