शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Ekadashi 2023: एकादशीचे वार्षिक व्रत सुरू करायचे असेल तर आषाढी एकादशीपासून करा; वाचा नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 14:33 IST

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशी ही सर्व एकादशींची महाराणी म्हटली जाते, म्हणून एकादशी व्रताचा प्रारंभही याच दिवसापासून होतो. त्याचे नियम जाणून घ्या. 

२९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे. त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी, म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करतात. याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. अनेकांना हे व्रत सुरू करावेसे वाटते, त्यांनी आषाढी पासून या व्रताची सुरुवात करायला हवी. त्याबद्दल अधिक वाचा. 

एकादशी व्रत हे आपल्याला इंद्रिय निग्रहाची सवय व्हावी यासाठी आहे. या दिवशी असत्य भाषण, मैथून, मांसाहार, अपेयपान इ. गोष्टी व्यर्ज्य कराव्यात. यासाठी मनाचा निग्रह आवश्यक असतो. म्हणून एकादशीचा उपास एक वेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो. त्यानिमित्ताने पचनक्रियेला आराम देता येतो. 

एकादशीचा संकल्प:

या दिवशी `मम कायिक वाचिक मानस सांसर्गिक पातकोपपातक दुरित क्षय पूर्वक श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थे श्रीपरमेश्वर प्रीतिकामनाया एकादशी व्रतमहं करिष्ये' असा संकल्प उच्चारून ताम्हनात पाणी सोडावे आणि जितेंद्रिय होऊन श्रद्धाभक्तिपूर्वक व यथाविधी देवतांचे पूजन करावे. एकादशीस होम हवन करण्याची पद्धत नाही.

एकादशी व्रताची समाप्ती: 

कोणत्याही वयात या व्रताची सुरुवात करता येते. मात्र हे व्रत ऐंशीव्या वर्षांपर्यंत करावे. तथापि त्यापूर्वी शरीराला दुर्बलता आली, तर व्रताचे उद्यापन करून त्याची समाप्ती करावी. 

एकादशीची नावे :

प्रत्येक मासात दोनदा एकादशी येते. याप्रमाणे वर्षाला २४ एकादशी येतात. पैकी आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उपास करतो. परंतु, दर एकादशीला सण, वार, ऋतू, मास यानुसार वेगवेगळी नावे दिलेली असतात. जसे की आज आमलकी एकादशी आहे. आजची एकादशी आवळ्याचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. अशा प्रकारे सर्व एकादशींचे पालन केले, तर आपल्याला तिथी, वार, नक्षत्र यांची माहिती राहते. तसेच संबंधित एकादशीला असलेली पूजा, व्रत केल्यामुळे आपण निसर्गाशी जोडले जातो. 

ज्यांना एकादशी व्रताची सुरुवात करायची असेल त्यांनी पुढील नियम पाळावेत असे श्रेयस कुलकर्णी लिहितात. 

आषाढी एकादशी जवळच आहे. ज्यांना एकादशी चे व्रत घ्यायचे आहे त्यांना सुरू करण्याचा हा दिवस उत्तम मानला गेला आहे. 

१. एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारिरीक, आर्थिक, कामिक प्रलोभनाला बळी पडत नाही.२. एकादशी करणाराला संकटातसुद्धा विवेकबुद्धी जागृत राहते. ३. एकादशी करणे म्हणजे कोणत्याही एका वैष्णव दैवतेशी जोडले जाणे.४. एकादशी करणाराचे पूर्वकर्म शुद्ध होते.५. एकादशी करणाराची एकाग्रता वाढते. ६. एकादशी करणाराला अन्नाची खा खा होत नाही, परिणामतः झोप सुद्धा परिसिमित राहते, विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जन वाढते. 

एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिराला वनपर्वात सांगतात. त्याने ती बारा वर्षे प्रतिवर्ष चोवीस एकादशी केल्या होत्या. एकादशी व्रत हे राजा अंबरीष, राजा हरिश्चंद्र, राजा नल, राजा युधिष्ठिर यांनी केले आहे. आपण करून आपला उत्कर्ष साधूया. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी