शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
4
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
5
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
6
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
7
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
8
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
9
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
10
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
11
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
12
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
13
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
14
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
15
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
16
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
17
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
18
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

आनंद तरंग: वैश्विक अनुभूती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 12:45 AM

व्यक्ती आणि तिचा भवताल यांच्या संयोगातून हे सर्व घडत असते. मग काही व्यक्ती शरीराच्या पातळीवर, काही लोक मनाच्या पातळीवर, तर काही लोक उन्मनी अवस्थेमध्ये राहतात.

इंद्रजित देशमुखजगणं म्हणजे दररोज शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्या अनुभवाने समृद्ध होणे आहे. प्रत्येक ज्ञानेंद्रियाची दररोजची अनुभूती आणि तिचा अर्थ वेगवेगळा आहे. व्यक्ती आणि तिचा भवताल यांच्या संयोगातून हे सर्व घडत असते. मग काही व्यक्ती शरीराच्या पातळीवर, काही लोक मनाच्या पातळीवर, तर काही लोक उन्मनी अवस्थेमध्ये राहतात. त्यामुळे ज्या पातळीवर राहतो, त्या पातळीवरचे अनुभव घनदाट होतात. प्रतिदिन हा अनुभवाचा स्तर वाढत जाऊन वैश्विक सत्याच्या अनुभूतीपर्यंत पोहोचणे, ही परिपक्वता आहे. ही परिपक्वता सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. कारण, व्यक्तीला येणारा अनुभव हा त्याची परिस्थिती, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती आणि त्याच्यासोबत घडणाºया घटना यांच्या संयोगातून येत असतो. त्यामुळे त्यावर त्याची अनुभूती ठरत असते. मी फुलांचा व्यापारी आहे आणि गुलाबांची बाग पाहिली की माझा अनुभव फुलांचा दर ठरवेल. मी गुलकंदाची निर्मिती करतो, तर त्याच फुलांचा माझा अनुभव या फुलांपासून गुलकंद किती होईल हे ठरवितो. मी भक्त आहे, तर ईश्वराच्या निर्मितीने मला आश्चर्य वाटून मी नतमस्तक होईन. परिपक्वतेसाठी समग्रतेने आकलन होणे आणि त्याच समग्रतेच्या अनुभवात अंतर्बाह्य भरून राहणे, हेच तर ज्ञान्याचे ध्येयअसते. हे अनुभवाचे सुखच विधायक अनुभूतीकडे घेऊन जाते. म्हणून माउली म्हणतात,‘‘का जे यया मनाचे एक निकेजे देखिले गोडीचिया ठाया सोके,म्हणौनि अनुभव सुखाचे कवतिकेदावीत जाईजे’’हीच व्यापक अनुभूती, हे विश्वच माझे घर आहे आणि चराचरामध्ये मीच आहे, याचा निश्चय होऊन आनंद भोगत जगतो.