31 December horoscope: २०२२ च्या शेवटच्या दिवशी 'या' तीन राशींमध्ये होणार मोठे परिवर्तन; होणार घसघशीत लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 16:32 IST2022-12-30T16:22:10+5:302022-12-30T16:32:29+5:30
31 December horoscope: वर्षाचा शेवटचा दिवस कोणाच्या पदरात भरघोस दान टाकणार ते जाणून घ्या!

31 December horoscope: २०२२ च्या शेवटच्या दिवशी 'या' तीन राशींमध्ये होणार मोठे परिवर्तन; होणार घसघशीत लाभ!
नवीन वर्ष कसे असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते, पण त्याच वेळेस जुन्या वर्षाकडे सिंहावलोकन करताना काय हाती लागले हा हिशोबही मनात सुरु असतो. त्यादृष्टीने ज्योतिष शास्त्राने दिलासा दिला आहे पुढील तीन राशींना, ज्यांच्या वाट्याला या वर्षांचा शेवटचा दिवस मालामाल करणारा ठरू शकेल असे म्हटले आहे.
३१ डिसेंबर रोजी वक्री बुध धनु राशीत प्रवेश करणार आहे. बुध हा बुद्धी, सिद्धी आणि यशाचा कारक असल्याने त्याचे संक्रमण तीन राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्या तीन राशी कोणत्या आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत ते जाणून घेऊ!
मिथुन : कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदी असेल. सहकाऱ्यांकडून अनपेक्षित आनंद वार्ता मिळेल. नोकरीची नवीन संधी, मोठे पॅकेज किंवा व्यवसायात घसघशीत लाभ संभवतो. अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारे यश संपादित कराल. तुमच्या कामाला प्रतिष्ठा मिळेल आणि कौतुकही होईल. नव्या ऊर्जेने नवीन वर्षाला सामोरे जाल.
कर्क : भविष्यात परदेशात जाण्याची संधी मिळेल आणि त्याचे संकेत या दिवशी मिळतील. मोठे यश तुमची वाट बघत आहे. कामात कसूर करू नका. सचोटीने आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामाला जगमान्यता मिळेल. लौकिक मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याचा पाया रोवला जाईल. वर्षांचा शेवटचा दिवस नवीन वर्षांची आणि येत्या काळातील यशाची नांदी ठरणार आहे.
वृश्चिक : ज्या संधीची आतुरतेने वाट बघत होतात ती संधी आपणहून चालून येईल. व्यावसायिकांना भरघोस यशाचा काळ आहे. नोकरदारांना पदोन्नती तसेच पगारवाढ होण्याचे संकेत आहेत. काम प्रामाणिकपणे करत राहा, वरिष्ठ दखल घेतील आणि जाहीर कौतुकही करतील. कामानिमित्त प्रवास होतील, त्यामुळे खर्च देखील होईल, मात्र ही भविष्यातील नफ्याची गुंतवणूक ठरेल. नवीन वर्षांची सुरुवात आनंदाने होईल.