२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 10:57 IST2025-12-31T10:55:35+5:302025-12-31T10:57:03+5:30
3 Pradosh Vrat In January 2026: २०२६ या नववर्षाच्या पहिल्याच जानेवारीत महिन्यात तीन वेळा प्रदोष व्रत आहे. जाणून घ्या...

२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!
3 Pradosh Vrat In January 2026: शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो॥ इंग्रजी नववर्ष २०२६ची सुरुवात धडाक्यात होत आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे आशेची नवी पहाट, आशा-आकांक्षांना फुटलेली नवी पालवी, नवीन संकल्प, नवे विचार, आणि नवीन स्वप्नांनी भारलेली सकारात्मकता. भारतीय संस्कृतीत अनेक व्रते केली जातात. प्राचीन परंपरेतून ही व्रते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात. २०२६ या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महादेव शिवशंकरांना समर्पित प्रदोष व्रत आहे. विशेष म्हणजे २०२६ च्या पहिल्या जानेवारी महिन्यात तीन प्रदोष व्रतांचा महासंयोग जुळून आलेला आहे.
प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला प्रदोष असतो. प्रदोषाचे व्रत हे महादेव शिवशंकराचे शुभाशिर्वाद मिळण्यासाठी केले जाते. या तिथीला केलेली महादेवांची उपासना, पूजन अत्यंत शुभ मानले जाते. अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेल्या पूजनामुळे मान, सन्मान, धन आणि वैभव प्राप्त होते. सर्व प्रकारचे दोष दूर होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. शिवभक्तांसाठी प्रदोष व्रत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. या व्रतामुळे एक सहस्र यज्ञाचे पुण्य लाभते. आर्थिक आघाडी उत्तम होते, असे सांगितले जाते. व्रताचे आचरण करणाऱ्यांना आणि त्यांच्या वारसांना दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जात आहे. प्रदोषव्रत प्रदोषकाळी म्हणजेच सायंकाळी करावयाचे असते.
जानेवारी २०२६ महिन्यात कधी प्रदोष व्रत?
- गुरुवार, ०१ जानेवारी २०२६ रोजी प्रदोष व्रत आहे. गुरुवारी प्रदोष येत असल्यामुळे याला गुरुप्रदोष असे संबोधले जाते. गुरुवार या दिवसावर गुरु ग्रहाचा अंमल असतो. नवग्रहांमध्ये बृहस्पति म्हणजे गुरु ग्रह देवांचा गुरु मानला गेला आहे. गुरुप्रदोषाच्या दिवशी महादेवांसोबत गुरुदेवांचे स्मरण करावे. कुंडलीतील गुरुची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर गुरु प्रदोष व्रत आवर्जून करावे असे सांगितले जाते.
- शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी प्रदोष व्रत आहे. शुक्रवारी प्रदोष येत असल्यामुळे याला शुक्र प्रदोष असे म्हटले जाते. शुक्रवार या दिवसावर शुक्र ग्रहाचा अंमल असतो. शुक्र प्रदोष या दिवशी महादेवांसोबत शुक्र ग्रहाशी संबंधित उपाय, उपासना करावी, असे सांगितले जाते. कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शुक्र प्रदोष व्रत आवर्जून करावे असे सांगितले जाते.
- विशेष म्हणजे शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी यंदाची पहिली मासिक शिवरात्रि आहे. प्रदोष आणि शिवरात्रि ही दोन्ही व्रते महादेवांना समर्पित असून, ही व्रते एकाच दिवशी येणे हा एक विशेष, शुभ योग मानला जातो. असा योग वारंवार येत नसल्यामुळे या दोन्ही व्रतांत जेवढी शक्य तेवढी महादेवांची उपासना, आराधना, नामस्मरण करावे, असे सांगितले जाते.
- शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ रोजी प्रदोष व्रत आहे. शुक्रवारी प्रदोष येत असल्यामुळे याला शुक्र प्रदोष असे म्हटले जाते. शुक्रवार या दिवसावर शुक्र ग्रहाचा अंमल असतो. शुक्र प्रदोष या दिवशी महादेवांसोबत शुक्र ग्रहाशी संबंधित उपाय, उपासना करावी, असे सांगितले जाते. कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शुक्र प्रदोष व्रत आवर्जून करावे असे सांगितले जाते. यंदाच्या जानेवारी महिन्यात दोन वेळा शुक्र प्रदोष येत आहे.
- प्रदोष व्रत प्रामुख्याने तिन्हीसांजेला दिवेलागणीला केले जाते. सूर्यास्तानंतर स्नानादी कार्ये उरकून प्रदोषाचे व्रताचरण करावे. शिवपूजन करावे. यथाशक्ती शिव मंत्रांचे जप करावेत. शक्य असेल तर सकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. जलाभिषेक/रुद्राभिषेक करावा, असे सांगितले जाते.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥