चारा छावणीत पाणी नेणाऱ्या टँकरखाली दबून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 19:35 IST2019-05-09T19:33:42+5:302019-05-09T19:35:36+5:30
वळणावर अचानक टँकर उलटल्याने झाली घटना

चारा छावणीत पाणी नेणाऱ्या टँकरखाली दबून युवकाचा मृत्यू
बीड : चारा छावणीवर पाणी घेऊन जाणारे टँकर वळणावर पलटी झाले. पाठीमागे टाकीवर बसलेला युवक खाली पडला त्याच्या अंगावर टँकर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बीड तालुक्यातील ईटजवळ गुरुवारी सकाळी घडली.
सोमनाथ सतीश बोंगाणे (वय १८, रा.गंगनाथवाडी, ता.बीड) असे मयत युवकाचे नाव आहे. श्रीराम बबन बोंगाणे असे जखमी चालकाचे नाव आहे. ईटजवळ चारा छावणी आहे. या छावणीवर ट्रॅक्टर पाठीमागे टँकरमध्ये पाणी घेऊन जात होते. वळणावर अचानक टँकर उलटले.
सोमनाथ हा पाठीमागे बसलेला होता. ट्रॅक्टर पलटी होताच तो ट्रॅक्टर खाली दबला, यामध्येच तो मृत्यू पावला. तसेच चालकही ट्रॅक्टरच्या पुढच्या भागात दबल्याने जखमी झाला. त्याच्यावर सध्या बीडमधील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पिंपळनेर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.एम. काळे यांनी भेट देऊन पंचनामा केला.