ट्रॅक्टर आणि कारच्या समोरासमोरील धडकेत तरुण जागीच ठार 

ट्रॅक्टर आणि कारच्या समोरासमोरील धडकेत तरुण जागीच ठार 

धारूर : तालुक्यातील अंबेवडगाव येथे पहाटे 3 वाजेच्या दरम्यान कार व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात एक युवक जागीच ठार झाला. राहूल सुभाष मुंडे ( 22,रा.काठेवाडी ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल मुंडे हा कारने (  एम.एच. 11 बी.बी. 0102 ) काठेवाडीकडे जात होता. दरम्यान, ऊस घेवून एक ट्रॅक्टर धारूरकडे येत होते. अंबेवडगावजवळ दोन्ही वाहनात समोरासमोर धडक झाली. यात कारमधील राहूल सुभाष मुंडे हा जागीच ठार झाला. 
अपघाताची माहिती मिळताच धारुर पोलीस घटनास्थळी पोहचले. याप्रकरणी  ट्रॅक्टर चालाकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राठोड करत आहेत.

Web Title: The young man was killed on the spot in a head-on collision between a tractor and a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.