शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

आपेगाव कोविड केअर सेंटरमध्ये योगाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:36 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभाग, बीड, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडिया) संस्था, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मानवलोक संस्था, अंबाजोगाई, ...

जिल्हा परिषद आरोग्य विभाग, बीड, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडिया) संस्था, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मानवलोक संस्था, अंबाजोगाई, ग्रामपंचायत आपेगाव आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या मदतीने श्री जयकिसान महाविद्यालय, आपेगाव या ठिकाणी जि. प. सदस्य राजेसाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून आपेगाव येथे उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर या ठिकाणी मोफत औषधोपचार करून रुग्णांना दररोज योगाचे धडे दिले जात आहेत.

याबाबत माहिती देताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की, अंबाजोगाईच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची दररोज वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन गरजू रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची उपचारासाठी होणारी परवड थांबावी, याच विधायक उद्देशाने आपेगाव येथे स्त्री व पुरुष रुग्णांसाठी उपचाराची स्वतंत्र व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. येथे मेडिकल स्टाफ, आवश्यक औषधे, सुविधा उपलब्ध आहेत. कोरोनाशी लढा देण्यासाठी स्वतःची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करणे आवश्यक आहे. त्यामुळे हसत-खेळत व आनंदी वातावरणात बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. सध्या कोरोना या रोगात योगाचे उपचार महत्त्वाचे ठरत आहेत.

नियमित योग व व्यायाम करण्याने सुदृढ शरीरासह सकारात्मक मानसिकता वाढीस लागते. त्याअनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अजय ठोंबरे, डॉ. धनेश्वर मेनकुदळे, डॉ. व्यंकट बेंबडे, डॉ. फड, डॉ. भारत नागरे, डॉ. गायत्री ढमाले, परिचारिका कावरे, ढाकणे, कराड, देशमुख, मुंडे, जगदाळे, शिंदे तसेच कर्मचारी अशोक राऊत, बालाजी वाघमारे, रवी सरवदे, अजित बनसोडे आदींच्या सहकार्यातून या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना योगाभ्यासाचे धडे देण्यात येत आहेत.

याकामी देशमुख यांना नीलेशराव शिंदे, जयजीतबापू शिंदे, प्रवीण देशमुख, राजाभाऊ देशमुख, बाळासाहेब जगताप, आश्रुबा करडे, बळीराजे वाघमारे, बालासाहेब तट, पिंटू शिंदे, शेख अस्लम यांचे सहकार्य लाभत आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढावी आणि श्वसनसंस्था मजबूत होऊन शरीरात अधिकाअधिक प्राणवायूचा संचार व्हावा, यासाठी योग अभ्यासक इंगळे यांच्याकडून दररोज सकाळी ७ ते ८ या वेळेत योगासने, प्राणायाम यांचे धडे दिले जात आहेत. यावेळी शासनाच्या नियमांचे योग्य पालन केले जात आहे.

===Photopath===

240521\avinash mudegaonkar_img-20210523-wa0042_14.jpg