शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

ॲट्रॉसिटीचा कालचा फिर्यादी आज विनयभंग प्रकरणी 'पॉस्को'त आरोपी! जाणून घ्या दुहेरी प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 19:17 IST

'आय लाईक यू!' पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पवयीन तरुणीचा विनयभंग; अल्पवयीन तरुणावर 'पॉस्को'

- मधुकर सिरसट
केज (बीड):
पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीला तिच्याच गावातील आणि महाविद्यालयातील अल्पवयीन तरुणाकडून मनस्ताप आणि अत्याचाराचा सामना करावा लागल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यात उघडकीस आली आहे. मैदानावर सराव करत असताना या १७ वर्षीय तरुणाने तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (दि. ३) सकाळी ही अल्पवयीन पीडित तरुणी आपल्या मैत्रिणींसोबत शेजारच्या गावातील मैदानावर पोलीस भरतीच्या तयारीचा सराव करत होती. त्याचवेळी तिच्या गावातील आणि त्याच महाविद्यालयात शिक्षण घेणारा १७ वर्षीय तरुण दुचाकीवरून तेथे आला. तरुणाने थेट तरुणीच्या हाताला धरून ओढले आणि 'तू मला दहावीपासून आवडतेस, आय लाईक यू, तू माझ्यासोबत लग्न कर' असे बोलून तिचा विनयभंग केला.

करिअर बरबाद करण्याची धमकी
मुलीने त्याला 'तू मला आवडत नाहीस' असे सांगितल्यावर संतापलेल्या तरुणाने "तू जर मला नकार दिलास, तर मी तुझ्याबद्दल गावात अपप्रचार करून, तुझे करिअर खराब करीन," अशी धमकी दिली आणि तेथून पसार झाला. यापूर्वीही तो तिचा अनेक वेळा पाठलाग करत होता. घडलेला प्रकार मुलीने आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी केज पोलीस ठाण्यात धाव घेतली. पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अल्पवयीन तरुणाविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा (भा.दं.वि.) नोंदवण्यात आला आहे.

कालचा फिर्यादी आज आरोपी!
या घटनेला एक वेगळे वळण मिळाले आहे. पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या या १७ वर्षीय तरुणाला एक दिवस आधी याच मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण केली होती. मुलीला मोबाईल मेसेज का पाठवला, या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी या तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले होते, ज्याबद्दल तरुणाच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, पीडित तरुणी आणि आरोपी तरुण हे दोघेही १७ वर्षांचे अल्पवयीन असल्याने, आरोपीला या प्रकरणात त्वरित अटक करता येत नाही. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे या दुहेरी गुन्ह्याचा आणि या नाट्यमय घडामोडींचा पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Accuser in Atrocity Case Now Accused in Molestation Case.

Web Summary : A minor girl accused a youth of molestation after he professed his love. Relatives assaulted him earlier, leading to an Atrocity case. Both are 17; investigation ongoing.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाPOCSO Actपॉक्सो कायदा