परळीत नवीन थर्मलमध्ये कोळशाच्या रेल्वे वॅगनखाली चिरडून कामगाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 18:08 IST2023-05-23T18:08:47+5:302023-05-23T18:08:58+5:30
परळी औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मितीसाठी कोळसा आंध्र प्रदेशातून रेल्वे मालगाडीने पुरवला जातो.

परळीत नवीन थर्मलमध्ये कोळशाच्या रेल्वे वॅगनखाली चिरडून कामगाराचा मृत्यू
परळी (बीड) : येथील परळी नवीन औष्णिक विद्युत केंद्राच्या कोळसा हाताळणी विभागात आज सकाळी अपघात झाला. कंत्राटदाराकडील एका कामगाराचा कोळसा घेऊन येणाऱ्या रेल्वे मालगाडीच्या वॅगनखाली येऊन मृत्यू झाला. विनायक केंद्रे ( 52, रा वाघबेट) असे मृताचे नाव आहे.
परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दुपारी देण्यात आला. दरम्यान, परळी उपजिल्हा रुग्णालयास कंत्राटदार व औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मितीसाठी कोळसा आंध्र प्रदेशातून रेल्वे मालगाडीने पुरवला जातो. याच रेल्वे गाडीखाली आल्याने कामगाराचा मृत्यू झाला आहे. विद्युत केंद्रात कोळसा हाताळणी विभागात स्वच्छतेचे काम करणाऱ्या थर्मलच्या कंत्राटदाराकडे कामगार कामास होता.